उन्हाळ्याचा चांगलाच तडाखा आता जाणवू लागला आहे. जस जसं ऊन वाढू लागते तसतसं आपल्याला काहीतरी थंड खावे, थंड प्यावे असे वाटू लागते. आपल्या शरीराला थंड करणारे पेय या उन्हाळ्यात नितांत तृप्तीची अनुभूती देतात. याच उन्हाळ्यामध्ये पाणी देखील थंडच प्यावे असे वाटत असते. त्यासाठी अनेक लोकं फिजमधील पाणी पिण्यास प्राधान्य देतात. काही लोकं थेट फ्रिजमधले थंड पाणी पितात, काही फ्रिजच्या थंड पाण्यामध्ये साधे पाणी मिक्स करून पितात. एकूणच काय तर उन्हाच्या तडाख्याला कमी करण्यासाठी आणि शरीराला थंड ठेवण्यासाठी थंड पाणी उत्तम उपाय असतो.(Earthen Pot)
मात्र फ्रिजचे थंड पाणी पिणे हे आपल्या सगळ्यांच्याच शरीरासाठी खूपच अपायकारक असते. त्यासाठी अनेक जणं ‘गरिबांचा फ्रिज’ समजल्या जाणाऱ्या मठाचा थंड पाणी पिण्यासाठी वापर करतात. फार पूर्वी पासूनच आपल्या देशात पाणी पिण्यासाठी मठाचा वापर केला जातो. फ्रिज आले, फ्रिजमध्ये नवनवीन फीचर्स आले मात्र तरीही मठाची जागा, मठाची लोकप्रियता काही कमी झाली नाही. आजही सर्वच घरांमध्ये उन्हाळा सुरु झाला की पाण्यासाठी माठ काढला जातो. काही घरांमध्ये तर बाराही महिने माठ वापरला जातो.(Earthen Pot News)
उन्हाळ्यामध्ये तर मठाची विक्री देखील विक्रमी होते. आजकाल माठ देखील विविध प्रकारचे येतात. आधी माठ म्हटले की डोळ्यसमोर काळ्या रंगाचा माठ यायचा. मात्र आता लाल, पांढरे विविध नक्षीकाम केलेले विविध आकारांमध्ये असे माठ सहज बाजारांमध्ये मिळतात. आपण माठ घ्यायला जातो तेव्हा नक्कीच आपला पहिला प्रश्न असतो की, कोणत्या रंगाच्या मठामध्ये पाणी लवकर आणि जास्त थंड होते? आजकाल माठांमध्ये देखील बरेच पर्याय उपलब्ध झाल्याने अनेकांची पंचायत होते की, नक्की कोणता माठ घ्यावा? आज आम्ही तुम्हला तुमच्या या गोंधळातून बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहोत. नक्की कोणत्या माठातले पाणी पिणे चांगले असते आणि मठाचा कोणता रंग घ्यावा याबद्दल माहिती देणार आहोत.(summer health care)
======
हे देखील वाचा : Vehicles Number Plates : गाडीच्या वेगवेगळ्या रंगाच्या ‘नंबर प्लेट’ला आहे मोठा अर्थ
=======
उन्हाळा लागला की बाजारात मातीची भांडी आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसू लागतात. ही सर्व आकर्षक भांडी आपले लक्ष वेधून घेतात आणि आपल्याला देखील त्यांना घ्यायचा मोह होतो. कोणत्या रंगाचे मातीचे भांडे घ्यावे किंवा कोणत्या रंगाच्या मातीचे भांडे शरीरासाठी लाभदायक आहे? तर तज्ज्ञांच्या मते कोणत्याही मातीच्या भांड्याचा वापर करणे फायदेशीरच असते. तज्ञ सांगतात की, काळा रंग उष्णता लवकर शोषून घेतो. म्हणूनच काळ्या भांड्यातील पाणी लवकर थंड होते. ते शरीरासाठीही चांगले असते. म्हणूनच काळ्या कुंड्यांना, काळ्या माठांना मोठी मागणी असते. (marathi Top News)
तसेच लाल आणि पांढऱ्या मातीच्या भांड्यांमधील पाणी देखील शरीरासाठी चांगले असते, परंतु ही भांडी खरेदी करताना ती आधी पूर्ण तपासून पाहावीत कारण काही ठिकाणी ही भांडी बनवताना त्यात सिमेंट देखील मिसळले जाते. एकूणच काय तर कोणत्याही रंगाचे भांडे काळजीपूर्वक तपासल्यानंतरच खरेदी करावे. फ्रिजच्या पाण्यापेक्षा कोणत्याही रंगाच्या मातीच्या मडक्यातील पाणी नक्कीच लाभदायक असते. मडक्यातील पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीराला देखील अनेक लाभ होतात.(Marathi Latest News)
– मातीमध्ये शुद्धीकरण करण्याचा सर्वात मोठा गुण आहे. त्यामुळे मातीचं मडकं हे पाण्यात असलेले विषारी पदार्थ शोषून घेते. यामुळे आपल्याला शुद्ध आणि खनिजयुक्त पाणी प्यायला मिळते. असे पाणी शरीरास लाभदायक देखील असते.(Health care News)
– मडक्याचे पाणी नैसर्गिकरित्या थंड असते. हे पाणी पिताना ते थंड असल्यासोबतच चवदार देखील असते. मडक्यातील पाणी फ्रिजच्या पाण्यापेक्षा जास्त प्रमाणात पिऊ शकतो. याचा शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. हे पाणी शरीराला जास्त थंड ठेवतात, पाण्याची कमतरता भरून काढते आणि उष्माघातापासून बचाव करण्यास मदत करते.(Trending Marathi News)
– उन्हाळ्यात फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने घसा खराब होतो, पण मडकाचे पाणी प्यायल्याने काहीही त्रास होत नाही. मडकाचे पाणी शरीर थंड करते आणि वाढलेले तापमान नियंत्रित करते.(Top Stories)
======
हे देखील वाचा : Bara Motanchi Vihir : स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेली ऐतिहासिक बारामोटेची विहीर
=======
– उन्हाळ्यात गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास अनेकांना मोठ्या प्रमाणावर होतो. मडक्याचे पाणी या त्रासापासून सुटका होण्यास मदत करते. उन्हाळ्यात रोज मडक्याचे पाणी प्यायल्यास पोटाच्या समस्यांमध्ये आराम मिळतो.(Marathi News)
– उन्हाळ्यात त्वचा चिकट होते. शिवाय त्वचेवर फोड, मुरुम आणि पुरळ यांसारख्या समस्याचा देखील त्रास होतो. मात्र मडक्यातील पाणी प्यायल्यामुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते.(Summer care tips)