आपण अनेक मुलींच्या पायामधे काळा दोरा बांधलेला असल्याचे बघतो. मधल्या काही वर्षांपासून हा काळा दोरा पायात बांधण्याचे प्रमाण कमालीचे वाढलेले असल्याचे दिसते. अगदी सेलिब्रिटीजपासून ते सामान्य लोकांपर्यंत आणि महिलांपासून ते पुरुषांपर्यंत सर्वच अगदी बिधास्त सर्वच हा काळा दोरा पायांत बांधतात. काही लोकं तज्ज्ञ लोकांनी सांगितल्यामुळे काळा दोरा बांधतात तर काही लोकं एकमेकांचे पाहून बांधतात, काही लोकं फॅशन म्हणून बांधतात आणि काही लोकं वाईट नजरेपासून बचावासाठी काळा दोरा बांधतात. मात्र येथे प्रश्न हा येतो की काळा दोरा बांधणे हे योग्य आहे की नाही? आपण जो दोरा बांधतोय त्यामुळे आपल्याला काही चुकीचा त्रास तर होणार नाही ना? हा दोरा बांधल्याचे काय फायदे होतील? आज आपण या लेखातून अशा अनेक प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करून घेऊया. (Marathi News)
ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात की, काळा धागा बांधल्यामुळे नकारात्मक ऊर्जेपासून आपलं संरक्षण होते. काही लोकांच्या मते काळा रंग शनीचे प्रतीक आणि हा शनी देवाचा आवडता रंग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे काळ्या रंगाचे पायात काहीही घालू नये. अर्थात शनिदेवाला पायात कधीही बांधू नये. त्यामुळे पायावर काळा धागा बांधणे अशुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि शनिदेवाच्या क्रूर नजरेला सामोरे जावे लागते. काळा धागा पायात बांधल्यामुळे शनिदेव पायाजवळ येतात. त्यामुळे शनिदेव त्यांच्या आयुष्यात अनेक संकट आणतात. यामुळे आयुष्यात आर्थिक संकटासोबत आरोग्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते. शनिदेवाला कायम मान- सन्मान द्यावा. काळा बांधा हातात किंवा गळ्यात परिधान करावा. काळ्या धाग्याला शास्त्रामध्ये रक्षा सूत्र म्हणण्यात आलंय. त्यामुळे रक्षा सूत्राला पायात बांधणे अशुभ मानले जाते. (Todays Marathi Haedline)
ज्यांच्या कुंडलीत राहू केतू दोष आहे, त्यांना ज्योतिषी एका पायात काळा धागा बांधा असा सल्ला देतात. हा धागा स्तोत्रमंत्रांचे उच्चारण करून प्रभावित केला जातो. मगच तो वापरण्याचा सल्ला दिला जातो. शनिदेव हा रागीट ग्रह मानले जातात. ज्यांच्या आयुष्यात शनीची साडेसती सुरू असते त्यांनाही काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो. कारण शनी देवाला आपण काळया गोष्टी अर्पण करतो. काळा धागा देखील शनी देवाच्या प्रकोपासून बचाव करण्यासाठी बांधण्याचा सल्ला दिला जातो. (Marathi Latest News)
ज्यांना हा काळा धागा घालायचा असेल त्यांनी हा धागा मंगळवारी किंवा शनिवारी परिधान केला जावा. तसेच जो धागा परिधान करायचा आहे, तो परिधान करण्याआधी मारुतीच्या मंदिरामध्ये नेला जावा. त्यामुळे हा धागा अधिक परिणामकारक होत असल्याचे म्हटले जाते. पुरुषांनी उजव्या पायात हा धागा बांधावा तर महिलांनी डाव्या पायात धागा बांधावा. काळा धागा नेहमी ९ गाठी बांधल्यानंतरच घालावा. हा धागा बांधल्यानंतर रोज गायत्री मंत्राचा जप करावा. (Top Marathi HEadline)
=========
हे देखील वाचा : Shravan : श्रावणातल्या रविवारी करा आदित्यराणूबाईचे व्रत
=========
काळा धागा बांधण्याचे फायदे
काळा धागा परिधान केल्याने अनेक फायदे होतात. काळा धागा पायात बांधल्यास आरोग्य चांगले राहते. राहू आणि केतू या ग्रहांचा वाईट प्रभाव कमी होतो. आर्थिक चणचण दूर होते. शनीचा प्रभाव दूर होतो आणि दृष्टी मजबूत होते. पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. ज्योतिष शास्त्रानुसार पायात काळा धागा धारण केल्याने वाईट नजर लागत नाही. (Social Updates)
( टीप: या लेखातील माहिती ही सामान्य आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics