रामायण आपल्या सर्वांच्याच आयुष्याचाच महत्वाचा भाग आहे. या महाग्रंथाबद्दल कोणाला माहित नसेल अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. रामायणातील जरी सर्व नाही तरी प्रत्येक महत्वाच्या गोष्टी सगळ्यांचं माहित आहे. अशीच रामायणातील एक महत्वाची घटना म्हणजे लक्ष्मणला बाण लागून तो बेशुद्ध होतो आणि हनुमान त्याच्यासाठी संजीवनी बुटी आणतो.(Dronagiri Parvat)
रामायणात सांगितल्याप्रमाणे राम आणि रावणाच्या युद्धाआधी जेव्हा रावणाचा मुलगा मेघनाथ युद्धासाठी येतो, तेव्हा त्याचा बाण लागून लक्ष्मण बेशुद्ध होतो. राम लक्ष्मणाला या अवस्थेत पाहून खूपच शोक व्यक्त करतात आणि पुन्हा लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र त्यांना यश येत नाही. तेव्हा हनुमान बिभीषणाच्या सांगण्यावरून लंकेत असलेल्या सुषेन वैद्यांना लक्ष्मणाच्या उपचारासाठी घेऊन येतो. लक्ष्मणाला पाहून सुषेन वैद्य हिमालयातील ‘संजीवनी’ या औषधानेच लक्ष्मण बरा होईल असे सांगतात. मात्र एका विशिष्ट्य वेळेआधी ते औषध लक्ष्मणाला देणे आवश्यक असते. (Ramayan Story)
तेव्हा हनुमान ते औषध आणण्यासाठी जाण्याचे ठरवतात. ते हिमालय पर्वतावर तर पोहोचतात मात्र, हनुमानाला संजीवनी वनस्पती ओळखताच येत नाही. सुषेण वैद्यांनी सांगितलेल्या खुणा देखील त्यांना संजीवनी (Sanjivni Buti) ओळखण्यासाठी अपयशी ठरतात. म्हणूनच हनुमान थेट हिमालयातील संजीवनी औषध असलेला द्रोणागिरी पर्वतच उचलतात आणि लंकेमध्ये घेऊन येतात.(Marathi Latest News)
=========
हे देखील वाचा : Ramnavmi : रामनवमी खास : श्रीराम जन्म कथा
=========
हनुमान संजीवनी वनस्पती घेण्यासाठी आले होते, ते ठिकाण उत्तराखंडमध्ये आहे. द्रोणागिरी पर्वत उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जोशीमठ शहरापासून सुमारे ५० किमी अंतरावर आहे. एका जुन्या मान्यतेनुसार हनुमान संजीवनी वनस्पतीविषयी गोंधळून गेले आणि ती ओळखण्यात असमर्थ ठरले, यामुळे त्यांनी द्रोणागिरी पर्वताचा मोठा भाग उचलून घेतला. नीती गावातील लोक या पर्वताची पूजा करतात. बद्रीनाथ धामपासून सुमारे ४५ किमी अंतरावर द्रोणागिरी पर्वत आहे. आजही द्रोणागिरी पर्वताचा वरचा भाग कापलेला दिसतो. (Marathi Trending News)
संजीवनी पर्वत उचलून हनुमान श्रीलंकेत पोहोचले तेव्हा त्याचा एक तुकडा रितीगलामध्ये पडला. रितीगलाचं वैशिष्ट्य म्हणजे आजही येथे उगवणाऱ्या वनौषधी या आजूबाजूच्या परिसरामध्ये आढळणाऱ्या झाडांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. हनुमानाने आणलेल्या पर्वताचा आणखी एक मोठा भाग श्रीलंकेच्या नुवारा एलिया शहरापासून सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या हाकागाला गार्डनमध्ये पडला. या ठिकाणची माती आणि झाडे आजूबाजूच्या भागापेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत.(Social News)
वैद्य सुषेन यांनी संजीवनीचे वर्णन तेजस्वी आभा आणि विचित्र वास असलेली औषधी वनस्पती असे केले आहे. श्रीलंकेत आजही संजीवनी पर्वत आहे. असे मानले जाते की हनुमानजींनी या पर्वताचे तुकडे करून या विशिष्ट भागात ठेवले होते.(Ram Navmi Special)
असं सांगितलं जातं की, हनुमान जेव्हा आकाशात उडत – उडत द्रोणागिरी पर्वत आणत होते तेव्हा या पर्वताचे काही तुकडे आकाशातून श्रीलंकेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पडले. माहितीनुसार श्रीलंकेच्या दक्षिणी समुद्रकिनार्यावर द्रोणागिरी पर्वताचे सर्वाधिक तुकडे पडले होते. विशेष म्हणजे जिथे जिथे हे तुकडे पडले त्या ठिकाणच्या मातीत बदल झाल्याचं दिसून आलं. काही लोकं दावा करतात की येथे असणारी झाडे ही श्रीलंकेत मिळणारी नाहीत ते मूळ श्रीलंकेच्या झाडांपेक्षा वेगळ्या स्वरूपाची आहेत. यावरूनच ती झाडे मूळची हिमालयातील असल्याचं सांगितलं जातं. आहेत.(Marathi News)
=========
हे देखील वाचा : Ramnavmi : रामनवमी कधी आहे? रामनवमीचे महत्व काय?
=========
दरम्यान, हिमालयावर उड्डाण करत हनुमान यांनी आपला उजवा पाय या कसौली पर्वतावर ठेवला होता. आजही तो पर्वत हनुमानजींच्या पायाच्या आकारात आहे. यासोबतच त्या टेकडीवर हनुमानाचे एक मंदिर देखील बांधण्यात आले आहे, ज्याची पूजा करण्यासाठी लोक लांबून येतात. मात्र हे मंदिर पूर्णपणे भारतीय हवाई दलाच्या अखत्यारीत येते. म्हणूनच सर्व सुरक्षा बाबींची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला येथे जाण्याची परवानगी दिली जाईल. हे एका उंच टेकडीवर वसलेले आहे जिथे जाण्यासाठी तुम्हाला अनेक पायऱ्या चढून जावे लागते.