चॉकलेट हा एक शब्द ऐकला की लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांचेच डोळे चमकतात. प्रत्येकालाच आवडणारे चॉकलेट कुठे तयार होते, हे आपल्याला माहित आहे का, अर्थातच चॉकलेट आधी तयार होत नाही, तर त्या चॉकलेटसाठी कोको बीन्स लागतात. अवघ्या जगभरात हे कोको बीन्स तयार करणारा पश्चिम आफ्रिकेतील एक देश म्हणजे, आयव्हरी कोस्ट. या आयव्हरी कोस्ट देशातून जगभरात जे चॉकलेट होते, त्यासाठी लागणा-या कोको बीन्सपैकी 70 टक्के कोको बीन्स तयार होतात. हाच आयव्हरी कोस्ट आता ख-या अर्थांने स्वतंत्र होणार आहे. गेल्या 150 वर्षापासून हा आयव्हरी देश फ्रान्सची वसाहत म्हणून ओळखला जात होता. या देशामध्ये फ्रान्सचे काही सैनिक कायमस्वरुपी रहात होते. मात्र आता आयव्हरी कोस्ट सरकारनं या फ्रान्सच्या सैनिकांना आपला देश सोडून परत जा, असा आदेश दिला आहे. त्यामुळे जगाला चॉकलेटची चव देणारा आयव्हरी कोस्ट हा देश 150 वर्षांनी ख-या अर्थांने स्वतंत्र होणार आहे. (Chocolate)
संपूर्ण जगाला चॉकलेट खायला देणारा देश म्हणून पश्चिम अफ्रिकेच्या आयव्हरी कोस्ट या देशाला ओळखले जाते. येथेच मोठ्या प्रमाणाक कोको बीन्सचे उत्पादन होते आणि त्यापासून तयार झालेले चॉकलेट दर्जात आणि चवीमध्ये सर्वोत्तम असते. हा देश स्वतंत्र असला तरी फ्रान्सचे या देशावर वर्चस्व होते. आयव्हरी कोस्टमध्ये फ्रान्सचे सैनिक सदैव तैनात असत. आता याच सैनिकांना आयव्हरी कोस्ट सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे हा देश ख-या अर्थानं 150 वर्षांनी स्वातंत्र्याची गोडी चाखणार आहे. जगाला चॉकलेटची गोड चव देणारा हा देश गुलामगिरीतच होता. जवळपास 100 वर्षे फ्रान्सची वसाहत म्हणून आयव्हरी कोस्ट देशाचे अस्तित्व होते. फ्रान्सने 1960 मध्येच आयव्हरी कोस्टला स्वातंत्र्य दिले होते. परंतु ते नावापुरतेच होते. (International News)
कारण फ्रान्सचे लष्कर अद्यापही आयव्हरी कोस्टमध्ये उपस्थित आहे. याच फ्रेंच सैनिकांना तात्काळ देश सोडण्याचे आदेश देण्याचे साहस या देशांनी दाखवले आहे. पश्चिम आफ्रिकेतील घानाजवळ कोट डी’आयव्हरी किंवा आयव्हरी कोस्ट हा छोटासा देश नकाशामध्ये दिसतो. हा देश जेवढा लहान आहे, तेवढेच अधिक त्यात कोको बिन्सचे उत्पादन होते. आपल्या सर्वांना आवडणा-या चॉकलेटमध्ये हे कोको बिन्स गरजचे असते. या कोको बिन्सची पारंपारिक पद्धतीनं येथे शेती केली जाते. लांब पपईसारखी दिसणारी कोको बीनची वनस्पती परिपक्व होण्यासाठी चार वर्षे लागतात. ही फळे वर्षातून दोनदा फळे तयार होतात आणि त्याच्या या कोको बिन्सला त्याच्या आकारानुसार वेगळे करत ज्या देशात सर्वाधिक मागणी आहे, त्या देशात पाठवले जाते. आत्तापर्यंत फक्त कोको बिन्ससाठी हा आयव्हरी कोस्ट देश ओळखला जात होता. (Chocolate)
मात्र हा देश फ्रान्सची एक वसाहत होता, याची फारशी कुणाला माहिती नव्हती. पण आयव्हरी कोस्टचे अध्यक्ष अलासने ओउतारा यांनी फ्रान्स सरकारला आपल्या सैन्याबाबत निर्णय घ्या, असा निर्वाणीची इशारा दिल्यामुळे आयव्हरी कोस्टच्या गुलामगिरीची माहिती जगभर होत आहे. आता या देशातून फ्रान्सचे सैन्य माघारी जाण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. संपूर्ण आयव्हरी कोस्टमध्ये 600 फ्रेंच सैनिक उपस्थित आहेत. हे सैन्य आता नियोजनबद्ध पद्धतीने मागे घेण्यात येत आहेत. या फ्रान्सच्या सैनिकाकडे ज्या पोर्ट बोएटच्या लष्करी बटालियनवर ताबा होता, त्याची कमांड आता आयव्हरी कोस्टच्या सैन्याकडे सोपविला जाणार आहे. मुख्य म्हणजे, आयव्हरी कोस्ट व्यतिरिक्त पश्चिम आफ्रिकेच्या अनेक देशांनी फ्रेंच सैनिकांना त्यांचे देश सोडण्यास सांगितले आहे. (International News)
====================
हे देखील वाचा :
America : अमेरिका यातही नंबर वन !
Uttar Pradesh : महाकुंभमध्ये 12 ज्योतिलिंग !
====================
यामध्ये सेनेगल, माली, चाड, नायजर आणि बुर्किना फासो या देशांचा समावेश आहे. त्यानुसार फ्रेंच सैनिक आता 70 टक्क्यांहून अधिक आफ्रिकन देश सोडून गेले आहेत. फ्रेंच सैन्य आता फक्त जिबूतीमध्ये उरले आहे जेथे त्यांचे 1,500 सैनिक आहेत. शिवाय गॅबॉनमध्ये फ्रान्सचे 350 सैनिक आहेत. या देशांमध्येही लवकरच पूर्ण स्वातंत्र्य मिळेल अशी आशा आहे. आयव्हरी कोस्ट हा देश म्हणजे, चॉकलेट निर्मितीची पहिली पायरी आहे. या देशात चॉकलेट बनवण्यासाठी आता मोठा कारखानाही स्थापन झाला आहे. त्यामुळे अनेक स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. या कारख्यान्याची क्षमता प्रतिवर्षी 10,000 टन एवढी आहे. आयव्हरी कोस्टमधील हवामान कोकोच्या लागवडीसाठी अतिशय अनुकूल आहे. यात महिला शेतक-यांची संख्या मोठी आहे. (Chocolate)
सई बने