Home » Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ghibli
Share

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय हटके मात्र कमालीचे आकर्षक फोटो. ॲनिमेटेड प्रकारातले हे फोटो सध्या सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घालताना दिसत आहे. अगदी व्हाट्सअँपच्या डीपी पासून ते फेसबुक इंस्टावरील स्टेटसपर्यंत सर्वच ठिकाणी हे फोटो, व्हिडिओ गाजत आहे. केवळ तरुणाईलाच नाही तर सर्वच वयोगटातील आणि आमपासून खासपर्यंत सर्वच क्षेत्रातील लोकांना भुरळ घालणाऱ्या या तंत्रज्ञानाचे नाव आहे, ‘Ghibli’ (घिबली). नक्की काय आहे हे ‘घिबली’ ज्याने सर्वांच्याच सोशल मीडियावर अक्षरशः कब्जा केला आहे. चला जाणून घेऊया.(Trending News)

तसे पाहिले तर सोशल मीडियावर दर काही दिवसांनी नवनवीन ट्रेंड येतच असतात. एक ट्रेंड जुना होत नाही तोवर दुसरा तयारच असतो. सध्या या सोशल मीडियाच्या जगात ‘घिबली’ हा नवीन ट्रेंड आला आहे. जपानी ॲनिमेशन शैलीच्या ‘घिबली’ किंवा ‘जिब्ली’ शैलीतील ‘एआय’ चित्रांची मोठी लाट सोशल मीडियावर आली आहे. ओपन-एआय चॅटजीपीटीच्या नवीन अपडेटद्वारे यूजर्सला त्यांचे फोटो ‘घिबली’ शैली ट्रान्सफर करून घेता येतात. ओरीजिनल फोटो आणि घिबली मधील फोटो असे कोलाज करून सर्वच लोकं त्यांचे फोटो पोस्ट करत आहे.(Ghibli)

Ghibli

काय आहे Ghibli ट्रेंड?
ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी आपल्या सोशल मीडियावर त्यांचा प्रोफाइल फोटो म्हणून Ghibli मध्ये तयार केलेली एक इमेज ठेवली आहे. मात्र त्यांच्यानंतर हळूहळू अनेक दिग्गज आणि प्रसिद्ध लोकांनी हा ट्रेंड फॉलो केला आहे. आता तर सोशल मीडियावर सर्वच लोकं हा ट्रेंड डोळे झाकून फॉलो करत आहे. Ghibli OpenAI च्या GPT-4o मॉडेलच्या माध्यमातून हा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. या नवीन इन-बिल्ट इमेज जनरेशन टूलद्वारे स्टिकर्स, साइनबोर्ड, मीम्स आणि खरे वाटावे असे फोटो तयार करत होतात.(Top News)

Ghibli आर्टचा निर्माता आहे कोण?
या ‘घिबली’ अॅनिमेशनचा जपानशी संबंध आहे. हे घिबली’ आर्ट बनवण्याचे पूर्ण क्रेडिट ‘हायाओ मियाझाकी’ आणि त्यांचा स्टुडिओ घिबलीला जाते. हायाओ मियाझाकी यांच्या स्टुडिओचे नाव घिबली असून, ते या स्टुडीओचे संस्थापक देखील आहेत. मियाझाकी यांना तर जपानी ॲनिमेशनच्या जगातील बादशाह मानले जाते. आजवर त्यांनी जे जे सिनेमे तयार केले ते संपूर्ण जगात भरपूर गाजले. त्यांनी जवळपास २५ पेक्षा अधिक ॲनिमेटेड चित्रपट आणि टीव्ही मालिका तयार केल्या आहेत. (Top Trending News)

स्पिरिटेड अवे’ हा त्याचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात २३००० कोटींहून अधिक कमाई केली होती. घिबली स्टुडिओने चित्रपटांमधून भरपूर पैसे कमावले आहेत. यामुळे हा जगातील सर्वात मोठ्या ॲनिमेशन स्टुडिओपैकी एक आहे. घिबली स्टुडिओ ना फक्त ॲनिमेशनमधून तर त्याच्या खेळणी, कपडे, डीव्हीडी विक्री, ऑनलाइन स्ट्रीमिंग अधिकार आदी उत्पादनांमधून बक्कळ पैसा कमावते. (Top Stories)

मियाझाकी यांची संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मियाझाकी यांच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचे झाले तर, त्यांची एकूण संपत्ती सुमारे ५० दशलक्ष डॉलर्स भारतीय रुपयांमध्ये सांगायचे झाले तर सुमारे ४२८ कोटी रुपये इतकी आहे. सध्या ChatGPT प्लॅटफॉर्मवर यूजर्स Ghibli ॲनिमेशन तयार करत आहे. घिबली आर्ट असलेली अनेक छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (Social News)

Ghibli

Ghibli इमेज कशी करावी?

chat.openai.com ला भेट द्या आणि तुमच्या OpenAI खात्याच्या क्रेडेंशियल्सने लॉग इन करा.

लॉग इन केल्यानंतर, “New Chat” बटणावर क्लिक करून नवीन संभाषण सुरू करा.

मेसेज इनपुट फील्डमध्ये, तुम्हाला जनरेट करायच्या असलेल्या इमेजसाठी एक वर्णन टाइप करा.

=======

हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !

Hiroo Onoda : युद्ध संपलं तरी तो २९ वर्ष लढत होता!

=======

तुमचा प्रॉम्प्ट सबमिट करण्यासाठी एंटर दाबा. ChatGPT तुमच्या त्यावर प्रक्रिया करेल आणि तुम्हाला हवी असलेली इमेज जनरेट करेल.

फोटो तयार झाल्यानंतर, तुम्ही त्यावर उजव्या बाजूला-क्लिक करून तुमच्या डिव्हाइसवर डाउनलोड करण्यासाठी “सेव्ह इमेज म्हणून…” पर्याय निवडू शकता.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.