Home » उत्तर प्रदेशचे नाव आर्यवर्त कधी होणार ?

उत्तर प्रदेशचे नाव आर्यवर्त कधी होणार ?

by Team Gajawaja
0 comment
Uttar Pradesh
Share

उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) राज्य आता आध्यात्मिक यात्रांचे प्रमुख केंद्र झाले आहे.  अयोध्येमध्ये रामलल्लांच्या मंदिराचे लोकार्पण झाले.  रोज लाखो रामभक्त या मंदिराला भेट देत आहेत.  सोबत मथुरा, वाराणसी येथीलही भक्तांची संख्या वाढली आहे.  उत्तरप्रदेशमधील अनेक जिल्ह्यांची नावे बदलून ती आता येथील देवस्थानांच्या नावासारखी ठेवण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. 

त्यात अलिगढचे नाव बदलून हरिगढ होण्याची शक्यता आहे. आज जी अयोध्या नगरी रामभक्तांनी फुलून गेली आहे, त्या अयोध्यानगरीचे काही वर्षापूर्वी नाव फैजाबाद होते, हे फैजाबाद आता जाऊन अयोध्या हे नाव आले.  तसेच इलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज झाले.  याशिवाय मंगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय करण्यात आले. 

उत्तरप्रदेशमध्ये अस नाव बदलण्याचा सीलसीला सुरु असतांना या उत्तरप्रदेशचे नाव कशावरुन आले आणि त्याजागी कोणते नाव आले होते, याचाही माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.  उत्तरप्रदेशचे नाव आर्यवर्त होणार होते, हे जाणून सर्वांना आश्चर्य वाटले.  या उत्तरप्रदेशचे नाव आर्यवर्त करण्यास कॉंग्रेसनं विरोध केला, आणि 1949 मध्ये या राज्याला उत्तरप्रदेश हे नाव मिळाले.  आता याच उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) प्रमुख जिल्ह्यांची नावे बदलण्यात येत असतांना उत्तरप्रदेशचे आर्यवर्त कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे.  

24 जानेवारी हा उत्तरप्रदेशचा स्थापना दिवस आहे.  याच अनुशंगानं उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा काही जिल्ह्यांची नावे बदलण्याची चर्चा सुरु झाली आहे.  त्यासोबत 5 डिसेंबर 1949 या तारखेची चर्चाही सुरु झाली होती.  कारण याच दिवशी उत्तरप्रदेशला त्याचे नाव मिळाले.  पण या नावासोबत आणखी एक नाव पुढे आले होते, ते म्हणजे, आर्यवर्त.  मात्र या नावाला तत्कालीन काँग्रेस कमिटीने विरोध केला.  आर्यवर्त म्हटले तर विशिष्ट धर्माचा उल्लेख होतो, असा आक्षेप आणला गेला. 

त्यामधून मग उत्तरप्रदेश या नावाला सर्वसंमती झाली आणि उत्तरप्रदेश राज्य झाले.  यावेळी या राज्याचे प्रमुख गोविंद बल्लभ पंत होते.   देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु होते.  11 नोव्हेंबर 1949 रोजी तत्कालीन शिक्षणमंत्री डॉ. संपूर्णानंद यांनी या राज्याच्या नावाबाबत एक प्रस्ताव मांडला.  त्या प्रस्तावात  या राज्याचे नाव आर्यवर्त असावे, असे सुचवण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले गोविंद बल्लभ पंत यांनीही आर्यवर्त नावाला पसंती दिली.   मात्र या नावावर पक्षातील काही वरिष्ठांनी आक्षेप घेतल्याचे सांगण्यात आले. (Uttar Pradesh)

5 डिसेंबर 1949 रोजी प्रदेश काँग्रेस कमिटीने आर्यवर्त नाव असलेल्या प्रस्तावाला विरोध केला. आर्यवर्त या नावातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीची झलक डोकावते असा हा आक्षेप काँग्रेस कमिटीने केला.  त्यातून विशिष्ट धर्मातील लोकांना वरिष्ठ दर्जा गेला आहे, असे व्यक्त होत असल्याचेही मत नोंदवण्यात आला.  राज्यात हिंदू आणि मुस्लिमांची संमिश्र संस्कृती आहे. आर्यावर्त असे नाव ठेवण्यास  या सलोख्याला धक्का बसेल, असे स्पष्ट करुन आर्यावर्त नाव नकारण्यास आले.  

त्यानंतर काँग्रेस कमिटीने सुचविलेल्या उत्तर प्रदेश या नावाला मान्यता देण्यात आला.  या नावाला तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी मान्यता दिली.  5 डिसेंबर 1949 रोजी कॉग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.  त्याला  तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद बल्लभ पंत यांनीही संमती दिली. त्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी संयुक्त प्रांत हा  उत्तर प्रदेश म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा करण्यात आली.  आता उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) आपला स्थापना दिवस साजरा करत असतांना परत याच घटनेची आठवण काढण्यात येत आहे.  आर्यवर्त हे नाव या राज्याला योग्य असेच होते, ते नाव पुन्हा कधी होणार याचीही चर्चा सुरु झाली आहे.

आर्यवर्त म्हणजे काय, हेही जाणून घेतले पाहिजे.  आर्यवर्त म्हणजे महान लोकांचे निवासस्थान.  हा संपूर्ण भाग सरस्वती नदीच्या किनार्‍यापासून सिंधूच्या तीरापर्यंत पसरला होता.   आर्यभूमी काबुलच्या कुंभा नदीपासून भारताच्या गंगा नदीपर्यंत आणि काश्मीरच्या खोऱ्यांपासून नर्मदेच्या पलीकडे पसरलेली होती.   येथेच आपल्या पूर्वजांनी प्राचीन सभ्यता आणि धर्माचा पाया घातला. सिंधू खोऱ्यात अनेक प्राचीन शहरे उत्खननात सापडली आहेत. (Uttar Pradesh)

============

हे देखील वाचा : वयाच्या चाळीशीनंतर चश्मा लावण्याची गरज भासणार नाही, अशी घ्या डोळ्यांची काळजी

============

यात मोहेंजोदारो आणि हडप्पा प्रमुख आहेत. सिंधू संस्कृती 3000 ईसापूर्व अस्तित्वात होती. पहिला मानव वितस्ता नदीच्या काठी जन्माला आल्याचा उल्लेख ऋग्वेदात आहे.  रामायण, महाभारतातही याच भूमीचा उल्लेख आहे. ऋग्वेदात आर्यांच्या निवासस्थानाला सप्तसिंधूप्रदेश म्हटले आहे.  प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये,  आता उत्तर प्रदेश जिथे आहे, त्या राज्याच्या भागाला आर्यवर्त म्हटले गेले आहे.  अयोध्येमध्ये श्रीराम भव्य मंदिरात विराजमान झाल्यावर हेच आर्यवर्त नाव पुन्हा चर्चेत आले आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.