दोन भावांची भांडणं पण त्यात अख्ख्या शहाराने उडी घेतली! शहरात लोकं फक्त एकमेकांच्या शूजकडे पहायचे आणि त्यांना कळायचं समोरचा माणूस कोणत्या भावाच्या बाजूने आहे. या भावांच्या भांडणांमुळे जगातील सर्वात मोठ्या दोन शूज कंपन्यांचा जन्म झाला. कॉर्पोरेट जगात या भावांच्या भांडणाची ही सगळ्यात फेमस स्टोरी आहे. कोण होते हे दोघं भाऊ काय आहे त्यांची स्टोरी जाणून घेऊ. (Adidas vs Puma)
ही गोष्ट आहे जर्मनीतल्या औरख नदीच्या किनारी असलेल्या Herzogenaurach गावातील. याच शहरात रुडॉल्फ म्हणजे रुडी आणि अॅडॉल्फ म्हणजे अॅडी हे आपले भाऊ-बहीण आणि आई-वडील क्रिस्टोफ डॅसलर आणि पॉलिना डॅसलर यांच्यासोबत राहायचे. त्यांचे वडील क्रिस्टोफ शूज बनवणाऱ्या कंपनीत काम करायचे आणि आई लॉन्ड्री चालवायची. हे भाऊ नेहमी आईला लॉन्ड्रीत मदत करायचे, म्हणून सगळ्या शहरात त्यांना लॉन्ड्री बॉईज म्हणून ओळखलं जायचं.
लवकरच पहिल्या महायुद्धाचा काळ सुरू झाला आणि या भावांना सैन्यात भरती व्हावं लागलं. काही काळाने युद्ध संपलं पण युद्ध सुरू होण्याआधी अॅडी वडिलांकडून शूज बनवायला शिकला होता. म्हणून युद्धावरुन परतल्यानंतर त्याने आईची बंद पडलेली लॉन्ड्री शूज बनवण्याच्या कारखान्यात बदलली आणि शूज बनवायला सुरुवात केली. त्याच्या या कामात त्याचा भाऊ रुडी सुद्धा जॉइन झाला. मग हे शूज बनवण्यासाठी हे भाऊ रद्दीतील चामडं, जुन्या हेल्मेटचे पट्टे, पॅराशूटच कापड जे मिळेल त्यातून प्रयोग करत राहिले. १९२४ मध्ये रुडी आणि एडी यांनी डॅसलर ब्रदर्स शू नावाची कंपनी सुरू केली.
दोघांनाही स्पोर्ट्सची प्रचंड आवड होती, म्हणून त्यांनी ठरवलं की त्यांच्या कंपनीत फक्त स्पोर्ट्स शूज बनवले जातील. नवीन कंपनीसाठी हा मोठा निर्णय होता. पण या भावांना नशिबाने साथ दिली आणि कंपनी जोरात चालू लागली. त्यांनी एक नवी फॅक्टरी टाकली, आणि त्याचं फॅक्टरी जवळ एक मोठा बंगला बांधला. दोघांची lifestyle बद्दलली होती.

तो काळ असा होता की समाजात त्यांचा दबदबा वाढत होता. १९३६ मध्ये जर्मनीच्या बर्लिन शहरात झालेल्या ऑलिम्पिक होणार होतं. यासाठी अॅडी डॅसलरने जेसी ओव्हन्सला आपल्या कंपनीचे शूज स्पॉन्सर केले. जेसी ओव्हन्स हा त्यांच्या कंपनीचा पहिला ब्रँड अँबेसेडर होता. अमेरिकेच्या जेसी ओव्हन्सने या ऑलिम्पिकमध्ये ४ गोल्ड मेडल जिंकले आणि हवा केली त्यासोबत चर्चा झाली ती अॅडी आणि रुडी या भावांच्या शूजची. जगातील सर्वच प्रसिद्ध खेळाडू डॅसलर बंधुच्या शूजबद्दल चर्चा करत होते. यानंतर दोघांचं नशीब चमकलं दुसऱ्या महायुद्धापूर्वी डॅसलर बंधूंनी दरवर्षी सुमारे दोन लाख जोडी शूज विकले. पण काळाच्या ओघात दोन्ही भावांमध्ये फुट पडली. झालं काय की दोघेही हिटलरच्या नाझी पक्षात सामील झाले. पण रुडॉल्फचे पक्षाशी थोडे जास्त जवळचे संबंध होते आणि ही गोष्ट अॅडॉल्फला खटकायची. हळूहळू या गोष्टीमुळे दोघांमध्ये दुरावा वाढत गेला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हा दुरावा खूप वाढला. (Adidas vs Puma)
त्यात युद्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतर हिटलरने आत्महत्या केली. त्यानंतर नाझी पक्षाशी संबंध असलेल्या सगळ्या लोकांना अमेरिकन सैन्याने चौकशीसाठी बोलावलं. यात हे दोन्ही भाऊही होते. अॅडीने १९३६ च्या ऑलिम्पिक्समध्ये जेसी ओव्हन्स या कृष्णवर्णीय खेळाडूला दिलेल्या मदतीचा दाखला देऊन स्वतःचा जीव वाचवला. पण रुडॉल्फ फरार होता. मात्र त्याचा शोध घेऊन त्याला एका वर्षासाठी नजर कैद करण्यात आलं.
त्या काळात रुडीला समजलं की अमेरिकन सैन्याला त्याच्याबद्दलची सगळी माहिती त्याच्या घरातल्याचं कोणीतरी दिली होती. त्याचा संशय थेट आपल्या भावावर अडॉल्फवर गेला. यामुळे दोघांमधलं भांडण आणखी भडकत गेलं. नजरकैदेतून सुटल्यानंतर दोघांच्या कुटुंबांमधलं तणाव थोडा कमी झाला, पण मनातील दरी कायम राहिली. अखेर १९४८ मध्ये दोघांनी आपला कंपन्या वेगळ्या करण्याचा निर्णय घेतला. अॅडीने स्वतःची स्पोर्ट्स वियर कंपनी सुरू केली. त्याने आपल्या टोपणनावातील “अॅडी” आणि आडनाव “डॅसलर”मधील पहिली तीन अक्षरं “डास” एकत्र करून कंपनीचं नाव ठेवलं — अॅडीडास. (Adidas vs Puma)
आणि जेव्हा अॅडीने असं केलं, तेव्हा रुडीही मागे राहिला नाही. त्यानेही स्वतःची कंपनी सुरू केली आणि “रुडॉल्फचे “रुडॉल्फमधील “रु” आणि “डॅसलर”मधील “डा” घेऊन कंपनीचं नाव ठेवलं रुडा. नंतर या कंपनीचं नाव बदलून पुमा ठेवलं गेलं आणि जगातील सर्वात दोन स्पोर्ट्स wear ब्रॅंडसचा जन्म झाला. दोघेही भाऊ एकमेकांची competition झाले होते. ते दोघे एकमेकांना मागे टाकण्यात इतके गुंतले की त्यांच्या वैयक्तिक वैरामुळे त्यांनी मोठ्या opportunities हातातून जाऊ दिल्या. एक उदाहरण म्हणजे — अॅडीडासला प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू मायकेल जॉर्डनसोबत करार करण्याची संधी मिळाली होती, पण त्यांनी ती गमावली. आणि त्या संधीचा फायदा नाइकीने घेतला. (Adidas vs Puma)
================
हे देखील वाचा : Champawat Tiger : नेपाळपासून भारतापर्यंत दहशत तिने अख्खं गाव खाल्लं…
================
पुढे भांडण इतकं वाढलं की केवळ ते भावांपुरतंच मर्यादित राहिलं नाही. त्यांच्या शहरातील लोकही दोन गटात विभागले गेले. कारण अॅडीडास आणि पुमा या दोन्ही कंपन्यांची कारखाने एकमेकांपासून फक्त ५०० मीटर अंतरावर होते आणि शहरातील बहुतेक लोक या दोन्ही ठिकाणी काम करत होते. त्यामुळे शहरात कोण कोणत्या कंपनीत काम करतो यावरूनच लोकांचं वर्तन ठरायचं. लोक एकमेकांशी बोलण्याआधी समोरच्याच्या शूजकडे पाहायचे — अॅडीडास की पुमा आहे बघायचे! म्हणूनच तेव्हा या छोट्या जर्मन शहराला “झुकलेल्या मानेचं शहर” असं टोपणनाव मिळालं होतं. काळ इतका विचित्र होता की तिथे लग्नसुद्धा शूजवरून ठरायचं! अॅडीडास घालणारे फक्त अॅडीडास घालणाऱ्याशीच लग्न करायचे, आणि पुमा घालणारे पुमा वाल्यांशीच म्हणजेच शूज तिथे धर्म बनले होते. पण शेवटी, भांडण करूनही दोघे जास्त काळ जगले नाहीत. चार वर्षांच्या आत दोघेही मरण पावले. त्यांच्या भांडणांमुळे दोघांच्या कबराही स्मशानभूमीच्या दोन टोकांना बनवण्यात आल्या. (Adidas vs Puma)
पुढे १९८० मध्ये रुडॉल्फच्या कुटुंबाने पुमामधील आपला ७५ टक्के हिस्सा फ्रान्समधील केरिंग कंपनीला विकला. आणि त्यानंतर दहा वर्षांनी, म्हणजे १९९० मध्ये, ज्या दिवशी जर्मनीची फुटबॉल टीम वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली, त्याच दिवशी अॅडीडास डॅसलर कुटुंबाच्या हातातून निघून गेली.
अशा प्रकारे दोन भावांनी मेहनतीने उभ्या केलेल्या या दोन्ही साम्राज्यांचा शेवट त्यांच्या हातातूनच झाला. काळ पुढे सरकला आणि २००९ मध्ये दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी आपापसातील जुनी दुशमनी विसरून एक मैत्रीपूर्ण फुटबॉल मॅच खेळली. त्यानंतर रुडॉल्फचा नातू फ्रँक डॅसलर याने दुशमनी विसरून अॅडीडासमध्ये मुख्य कायदेशीर सल्लागार म्हणून काम केलं. भावांच्या भांडणांतून उभ्या राहिलेल्या या कंपन्या आज जगातील उत्तम स्पोर्ट्सवियर ब्रँड आहेत.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
