व्हॉट्सअॅपकडून आपल्या युजरला अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक उत्तम सुविधा पुरवण्यासाठी वेळोवेळी नवे अपडेट आणले जातात. यामध्ये काही फिचर्स असे असतात की त्याबद्दल युजर्सच्या प्रायव्हसीसंदर्भात पुरेपुर काळजी घेतली जाते. यामधीलच एक फिचर म्हणजे ब्लॉक. खरंतर तुम्हाला एखाद्याने व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले असेल तर तुम्हाला पटकन कळत नाही. कारण तुम्हाला ब्लॉक करण्याचे अधिकार हे युजर्सचे असतात त्यामध्ये समोरचा व्यक्ती काहीही करु शकत नाही. अशातच तुम्हाला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलेय हे शोधून काढण्यासाठी पुढील काही ट्रिक्स तुमच्या कामी येणार आहेत. (WhatsApp Tricks)
प्रथम जाणून घेऊयात ब्लॉक कसे करतात
जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर एखाद्याला ब्लॉक करायचे आहे तर प्रथम सेटिंग्समध्ये जाऊन अकाउंटच्या ऑप्शनमध्ये प्रायव्हेसी सेक्शनमध्ये ब्लॉक कॉन्टॅक्टवर टॅप करावे लागणार आहे. येथे सर्व तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट दाखवली जाईल. आता तुम्ही तुम्हाला ज्या व्यक्तिला ब्लॉक करायचे आहे त्याच्या नावावर क्लिक करा.
व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलेय ते कसे शोधाल
-लास्ट सीन
जर तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीचा लास्ट सीन किंवा त्याचे ऑनलाईन स्टेटस पाहू शकत नाही तर तुम्हाला त्याने ब्लॉक केलेले असावे. मात्र याच्या माध्यमातून तुम्हाला लगेच कळणार नाही की नक्कीच ब्लॉक केले आहे की तुमच्यापासून व्हॉट्सअॅपचा डीपी आणि स्टेटस लपवले आहे. कारण व्हॉट्सअॅपमध्ये यासाठी सुद्धा एक वेगळा ऑप्शन सेटिंग्समध्ये दिला गेला आहे.
-व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करा
जर तुम्हाला वाटत असेल की, समोरच्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे तर एक ग्रुप बनवा. जर तुम्हाला खरंच त्याने ब्लॉक केले असेल तर तुम्ही त्याला ग्रुप मध्ये अॅड करु शकत नाहीत.(WhatsApp Tricks)
-मेसेज पाठवून पहा
समोरच्या व्यक्तीला मेसेज पाठवा आणि जर डबल टिक मार्क न आल्यास याचा अर्थ असा होतो की, तुमचा मेसेज डिलिव्हर झालेला नाही. काही तासांसाठी किंवा २-३ दिवसांपर्यंत मेसेज पोहचलाच नाही तर समजून जा समोरच्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे.
हे देखील वाचा- स्मार्टफोनच्या अधिक वापरामुळे आरोग्य धोक्यात, डिजिटल डिटॉक्सची का आहे गरज?
-डीपी आणि स्टेटस तपासून पहा
जर एखाद्याचा तुम्हाला प्रोफाइल फोटो किंवा स्टेटस दिसत नसेल तर असे असू शकते की, त्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे. मात्र काही गोष्टी समोरच्या व्यक्तीपासून लपवण्यासाठीचा सुद्धा ऑप्शन हा व्हॉट्सअॅपने दिला आहे.
-व्हॉट्सअॅप कॉल करुन पहा
नॉर्मल फोन करण्याऐवजी तुम्ही समोरच्या व्यक्तीला व्हॉट्सअॅप कॉल करुन पहा. जर तुमच्या स्क्रिनवर त्या क्रमांकासाठी नेहमीच रिंगिंग ऐवजी कॉलिंग येत असेल तर समजून जा तुम्हाला त्याने ब्लॉक केले आहे.