Home » दोन मोबाईल मध्ये अशा पद्धतीने सुरु करा एकच WhatsApp, इंटरनेटशिवाय ही करेल काम

दोन मोबाईल मध्ये अशा पद्धतीने सुरु करा एकच WhatsApp, इंटरनेटशिवाय ही करेल काम

by Team Gajawaja
0 comment
WhatsApp Spam Message
Share

सोशल मीडियातील इस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे जगभरात कोटींच्या संख्येने युजर्स आहेत. अशातच व्हॉट्सअॅपकडून आपल्या युजर्सला वेळोवेळी नवे अपडेट्स ही दिले जातात. तर काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंगसाठी लिंक तयार करण्याचा ही ऑप्शन आणला आहे. तर आता एकाच क्रमांकावरुन एकच व्हॉट्सअॅप सुरु ठेवण्याचे दिवस गेले. आता तुम्ही एकाच फोन क्रमांकावरुन दोन स्मार्टफोनमध्ये एकच व्हॉट्सअॅप सुरु करु शकता. म्हणजेच एकाच स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप क्रमांकाशिवाय चालवू शकता. खरंतर व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी WhatsApp Companion Mode नावाचे एक फिचर रोलाआउट केले आहे. सध्या याचे बीटा वर्जन जारी आहे. कंपनी लवकरच सामान्य युजर्ससाठी हे फिचर लॉन्च करु शकते. (WhatsApp Tips)

WhatsApp Companion Mode च्या माध्यमातून दोन फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालवायचे असेल तर दुसऱ्या डिवाइसमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणे गरजेचे आहे. तुमच्या दुसऱ्या डिवाइसला लिंक करण्याचा ऑप्शन रजिस्ट्रेशनवेळी मिळेल. या मोडच्या माध्यमातून तुमच्या प्रायव्हसीला सुद्धा कोणताही धोका नाही. खासगी मेसेज आणि कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील. कोणीही तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मेसेज केल्यास तर तो सर्व लिंक्ड असलेल्या डिवाइसवर जाणार आहे.

WhatsApp  Tips
WhatsApp Tips

कसे चालेल दोन मोबाईलवर एकच व्हॉट्सअॅप?
जर तुम्ही व्हॉट्सअॅपचे नवे फिचर WhatsApp Companion Mode चा वापर करु इच्छिता तर सर्वात प्रथम तुम्हाला मेसेजिंग अॅपच्या बीटा वर्जनसाठी साइन अप करावे लागणार आहे. खरंतर बीटा प्रोग्राम नेहमीच सुरु असतो. तरीही तुम्ही येथे एक ट्राय देऊ शकता. व्हॉट्सअॅपच्या बीटा वर्जनसाठी तुम्हाला फक्त गुगल प्ले वर जाऊन व्हॉट्सअॅप सर्च करावे लागणार आहे. ते सुरु केल्यानंतर पेजवर बीटा प्रोग्राम लिहिलेले दिसेल. जर मेसेज दिसतो Beta program is full तर त्याचा अर्थ तुम्ही यासाठी साइन अप करु शकत नाहीत. (WhatsApp Tips)

हे देखील वाचा- हॅक झालेले तुमचे इंस्टाग्राम अकाउंट ‘अशा’ पद्धतीने करा रिकव्हर

कशा पद्धतीने एकाच क्रमांकावरुन दोन डिवाइसमध्ये व्हॉट्सअॅप सुरु ठेवाल?
-तुमच्या प्रायमरी मोबाईल फोनवर व्हॉट्सअॅप सुरु करा
-आता डाव्या बाजूला दिसत असलेल्या ३ डॉटच्या आयकनवर क्लिक करा
-आता Linked Devices ऑप्शनवर क्लिक करा
-पुन्हा एकदा link a device च्या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर एक क्यूआर कोड सुरु होईल
-दुसऱ्या फोन मध्ये सुद्धा याच स्टेप्स वापरुन क्यूआर कोड सुरु करुन प्रायमरी फोनच्या माध्यमातून क्यु आर कोड स्कॅन करा


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.