Home » Whatsapp वर स्पॅम कॉल पासून असे ठेवा स्वत:ला सुरक्षित

Whatsapp वर स्पॅम कॉल पासून असे ठेवा स्वत:ला सुरक्षित

आजकाल व्हॉट्सअॅपवर काही अज्ञात क्रमांकावरुन तुम्हाला फोन किंवा मेसेज जरुर येत असतील. काही वेळेस अज्ञात क्रमांकावरून आलेले फोन ही आपण घेतो.

by Team Gajawaja
0 comment
WhatsApp New Feature
Share

आजकाल व्हॉट्सअॅपवर काही अज्ञात क्रमांकावरुन तुम्हाला फोन किंवा मेसेज जरुर येत असतील. काही वेळेस अज्ञात क्रमांकावरून आलेले फोन ही आपण घेतो. अथवा मेसेजला रिप्लाय करतो. कारण असे वाटते की, एखाद्या ओखळीच्या व्यक्तीचा फोन असेल. मात्र असे केल्याने तु्म्ही अज्ञातपणे तुमच्या सुरक्षिततेला धोका पोहचवत असता. सध्या असे काही स्पॅमर आले आहेत जे लोकांना व्हॉट्सअॅपवर कॉल करून मेसेजच्या माध्यमातून फसवणूक करत असतात.त्यामुळे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप प्रायव्हेसीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याच बद्दलच्या काही खास टीप्स आपण पाहणार आहोत. (WhatsApp Spam Call)

टू स्टेप वेरिफिकेशन सुरू करा
टू स्टेप वेरिफिकेशन असे एक फिचर आहे ज्याच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅपवर अकाउंट सुरक्षित ठेवू शकता. जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅप अकाउंट रीसेट किंवा वेरिफिकेशन करता तेव्हा तुम्हाला टू स्टेप वेरिफिकेशनवेळी सहा अंकी क्रमांक द्यावा लागले. याच्या मदतीने तुम्ही फिशिंगसारख्या गोष्टींपासून दूर राहू शकता.

अज्ञात क्रमांक लगेच करा ब्लॉक
आजकाल व्हॉट्सअॅपवर लोकांना ब्लॅकमेल करून घाबरवण्याचे काम काही लोक करत आहेत. ते आधीच लोकांची माहिती काढतात आणि त्याच आधारावर एखाद्याला त्रास देत राहतात. अशातच तुम्हाला सुद्धा कोणत्याही अज्ञात क्रमांकावरून फोन आल्यास, ब्लॅकमेक केल्यास अथवा खासगी माहितीवरून घाबरवण्याचा प्रयत्न केल्यास तर त्यावेळी घाबरून न जाता त्या क्रमांकाचा रिपोर्ट करून तो ब्लॉक करा.

प्रायव्हेसी सेटिंगमध्ये बदल करा
तुम्ही तुमच्या प्रायव्हेसी सेटिंग्समध्ये काही बदल करा. त्याचसोबत ग्रुपमध्ये इनवाइट करण्यासाठी सर्व ठिकाणी कॉन्टॅक्ट हा पर्याय निवडा. जेणेकरून कोणताही अज्ञात व्यक्ती तुम्हाल एखाद्या अज्ञात ग्रुपमध्ये अॅड करणार नाही. त्याचसोबत जरी केले तरीही तो लगेच एक्झिट करा आणि ब्लॉक करा. कारण असे सु्द्धा होऊ शकते की, ग्रुपमधील सदस्य तुम्हाला त्याच्या बोलण्यात अडकवून फसवण्याचा प्रयत्न करू शकतो. (WhatsApp Spam Call)

हेही वाचा- स्मार्टफोन स्लो चार्ज होत असेल कर ‘या’ ट्रिक्स वापरा

व्हॉट्सअॅपवरील कोणतीही अज्ञात लिंक क्लिक करू नका
जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर एखादी अज्ञात लिंक आली असेल किंवा त्या प्रकारचा मेसेज आला असेल तर त्यावर अजिबात क्लिक करू नका. जर केलात तर तुमच्या फोनमधील डेटा हा हॅकर्सकडे जाईल आणि तुम्ही अगदी सहज त्याच्या जाळ्यात अडकू शकता. यामुळे अशा प्रकारची चूक अजिबात करू नका.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.