तुम्ही सुद्धा व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवता तेव्हा तुम्ही प्रायव्हसीच्या कारणास्तव सर्वांना आपले स्टेटस सर्वांसोबत शेअर करु पाहत नाहीत. यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये एक धमाकेदार फिचर दिले गेले आहे. त्याच्या मदतीने तुम्ही केवळ त्याच लोकांना आपले स्टेटस पाहण्याची परवानगी देता जे तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहेत. तुम्ही सर्व कॉन्टॅक्टसह स्टेट्स शेयर करु शकता किंवा केवळ अशा लोकांना निवडू शकता ज्यांच्यासोबत तुम्हाला स्टेटस शेअर करायचे नसते. त्यासाठी तुम्हाला सेटिंग्समध्ये जाऊन अकाउंट्सवर क्लिक केल्यानंतर स्टेट्स प्रायव्हेसी ऑप्शनवर जावे लागणार आहे. येथे तुम्हाला My Contacts-Only Share with आणि My contacts excepy सारखे ऑप्शन निवडता येतात. (WhatsApp Privacy Settings)
ऑनलाईन स्टेट्स लपवू शकता
जर तुम्ही प्रायव्हेसी संदर्भात चिंतेत असाल तर काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने त्या संदर्भातील एक महत्वाचे फिचर आणले आहे. काही वेळेस असे होते की, आपण व्हॉट्सअॅपवर एखाद्याशी चॅट करताना आपल्याला दुसरा व्यक्ती ऑनलाईन असल्याचे कळते. पण काही वेळेस स्थिती अशी असते की, आपल्याला एखाद्याने ऑनलाईन असल्याचे कळू नये असे वाटते. युजर्सची हिच समस्या दूर करण्यासाठी हे फिचर आणण्यात आले आहे.

या फिचरच्या मदतीने आता युजर्सला आपली ऑनलाईन शो होणारी अॅक्टिव्हिटी लपवता येऊ शकणार आहे. म्हणजेच आता या फिचरला एनेबल केल्यानंतर जर तुम्ही ऑनलाईन असाल तरीही कोणाला कळणार नाही.
Read Receipts
जर तुम्ही प्रायव्हेसीच्या कारणास्व अशी गोष्ट लपवू पाहता आहात की, समोरच्या व्यक्तीद्वारे पाठवण्यात आलेला मेसेज तुम्ही वाचला आहे किंवा नाही तर हे एक धमाकेदार फिचर व्हॉट्सअॅपने आणले आहे. जर तुम्हाला एखाद्याला तुम्ही मेसेज वाचल्याने कळू द्यायचे नसेल तर हे फिचर एनबेल असेल तर ते डिसेबल ही करता येते. त्यासाठी तुम्हाला सेटिंग्स>अकाउंट>प्रायव्हेसी मध्ये जाऊन Read Receipts चा ऑप्शन बंद करावा लागणार आहे. (WhatsApp Privacy Settings)
हे देखील वाचा- लोकांचा खासगी डेटा कंपन्यांना वापरणे पडणार महागात, ५०० कोटींचा लावला जाईल दंड
प्रोफाइल फोटो
आधी युजर्सला असा कोणताही ऑप्शन नव्हता की, जर तुम्हाला प्रोफाइल फोटो हा लपवायचा असेल तर डीपी म्हणजेच डिस्प्ले पिक्चर तुम्हाला काढून टाकावा लागत होता. मात्र आता युजर्सची प्रायव्हेसी पाहता व्हॉट्सअॅपने हे फिचर आणले आहे. ज्यामुळे तुम्ही फक्त स्टेटस प्रमाणेच येथे सुद्धा तुमचा डिस्प्ले एखाद्याला दिसला पाहिजे की नाही अशी सेटिंग्स करु शकता. त्यासाठी तुम्हाला सेटिंग्स>अकाउंट्स>प्रायव्हेसी मध्ये आपल्या प्रोफाइल फोटोचा ऑप्शन दिसेल यावर क्लिक करुन Everyone, My Contacts, My Contacts Expect आणि नोबडी ऑप्शन मिळेल.