इंस्टेट मॅसेजिंग सर्विस WhatsApp चा वापर फक्त एकमेकांशी बातचीत करण्यासाठी नव्हे तर फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी सुद्धा केला जातो. मात्र काही वेळेस जेव्हा आपण व्हॉट्सअॅपवर एखादा फोटो-व्हिडिओ शेअर करतो तेव्हा त्याची क्वालिटी बिघडते. मात्र आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपवरील अशी एक ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही उत्तम क्वालिटीचे फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकतात आणि त्याची क्वालिटी सुद्धा खराब होणार नाही.(WhatsApp Photo-Video)
व्हॉट्सअॅपवर आपण एचडी फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यासाठी बहुतांश वेळा डॉक्युमेंटचा वापर करतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही आपल्या व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्समध्ये काही बदल करु शकता. त्याचसोबत उत्तम क्वालिटीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर कर शकता. तर जाणून घेऊयात.
उत्तम फोटोंसाठी व्हॉट्सअॅपवरील या सेटिंग्समध्ये करा बदल
-सर्वात प्रथम आपल्या Android किंवा iOS डिवाइसमध्ये WhatsApp सुरु करा आणि सेटिंग्समध्ये जा
-त्यानंतर सेटिंग्स ऑप्शनमध्ये Storage and Data ऑप्शनवर क्लिक करा
-येथे तुम्हाला Media upload quality चा ऑप्शन दिसून येईल. यावर क्लिक करा
-Media upload quality वर क्लिक केल्यानंतर Auto (Recommended), Best Quality, Data Saver असे तीन ऑप्शन दिसून येतील.
-उत्तम क्वालिटीचे फोटो पाठवण्यासाठी तुम्हाला Best Quality च्या ऑप्शनवर क्लि करायचे आहे
-जर तुम्हाला फोटो पाठवताना डेटा वाचवायचा असेल तर Data Saver वर क्किल करु शकता (WhatsApp Photo-Video)
हे देखील वाचा- एखाद्या वेबसाइटवर तुमचा डेटा Save केलायं हे तपासून पाहण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा
WhatsApp वरुन अशा पद्धतीने फोटो पाठवू शकता
जर व्हॉट्सअॅपवरुन फोटो किंवा व्हिडिओ पाठवायचे असतील तर सर्वात प्रथम चॅट सुरु करा. त्यानंतर अटॅचमेंटवर क्लिक करा. येथे तुम्हाला डॉक्युमेंट ते लोकेशन असे ऑप्शन दिसतील. येथे तुम्हाला फोटो आणि व्हिडिओवर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर तुमची लाइब्रेरी सुरु होईल आणि तेथून तुम्ही फोटो निवडून तुमच्या मित्रपरिवाराला पाठवू शकतात.
तसेच व्हॉट्सअॅपवर आता प्रोफाइल फोटो म्हणून नव्या अवतारासह आपला फोटो ठेवू शकतात. त्यामध्ये तुम्हाला लाइटिंग, शेडिंग, हेअर स्टाइलसह काही गोष्टींमध्ये सुद्धा बदल करता येऊ शकणार आहेत. म्हणजेच तुम्हाला तुमचा प्रोफाइल फोटो हा 3D अवतार मध्ये ठेवता येणार आहे. त्याचसोबत त्या अवतारातील स्टिकर ही एकमेकांना फॉरवर्ड करु शकता.