व्हॉट्सअॅपचा फार मोठ्या प्रमाणात जगभरात वापर केला जातो. तर व्हॉट्सअॅपकडून आपल्या युजर्सला नवे अपडेट देण्यासह त्यामध्ये काही बदल ही केले जातात. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मेसेज पाठवणे, कॉलिंग किंवा व्हिडिओ कॉल करता येतोच. पण अन्य फिचरनुसार तुम्ही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तुमच्या फाइल्स, फोटो, ऑडिओ, व्हिडिओ ही पाठवू शकता.(WhatsApp New Features)
अशातच आता व्हॉट्सअॅपकडून नव्या फिचर संदर्भात काम केले जात आहे. हे फिचर्स अधिक फ्रेंडली आणि सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. काही रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅप काही नव्या फिचर्सवर काम करत आहे. ज्यामध्ये फॉरवर्ड मीडियासह कॅप्शन, बॅकग्राउंड ब्लर आणि ग्रुपमध्ये प्रोफाइल फोटोचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅपचे अपकमिंग फिचर्स ट्रॅक करणारी वेबसाइट WAbetaInfo यांनी काही नवे फिचर स्पॉट केले आहेत. या फिचरवर सध्या काम केले जात आहे. त्यामुळे ते लवकरच युजर्सला उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. व्हॉट्सअॅपवर लवकरत इमेज ब्लरचा ऑप्शन मिळणार आहे, जो फोटो ब्लर करण्यासाठी मदत करणार आहे. हे डेस्कटॉप वर्जनसाठी सुद्धा जारी केले जाणार आहे.
दरम्यान, काही जुन्या वर्जनच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅपने काम करणे बंद केले आहे. तर २४ ऑक्टोंबर पासून आयओएस आणि अॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमला व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही आहे. आयफोनच्या कॅटेगरीत आयफोन ५ आणि आयफोन ५ सी च्या युजर्सला व्हॉट्सअॅप त्यांच्या फोनमध्ये वापरता येणार नाही. यावर व्हॉट्सअॅपने म्हटले की, पुढे येणारे अपडेट्स हे अशा प्रकारच्या फोन मध्ये काम करु शकणार नाहीत. व्हॉट्सअॅप आता सुद्धा अशाच फोनमध्ये चालते जो आयओएस १२ किंवा त्याच्या नव्या वर्जनचे असतील. (WhatsApp New Features)
हे देखील वाचा- Apple वॉचने वाचवला जीवंत पुरलेल्या महिलेचे प्राण, पण कसे?
त्याचसोबत अॅन्ड्रॉइडच्या कॅटेगरीत ४.१ किंवा त्यापेक्षा जुन्या वर्जनमध्ये व्हॉट्सअॅप बंद झाले आहे. अशातच त्यांना ना मेसेज पाठवता येणार आहे ना कॉल, व्हिडिओ कॉल. यासाठी युजरला आपल्या फोनच्या ऑपरेटिंग सिस्टिमला अपडेट करावे लागणार आहे. व्हॉट्सअॅपकडून युजर्सला नेहमीच नव्या वर्जनचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरुन नव्या फिचर्ससह त्यांना व्हॉट्सअॅपचा वापर करता येईल. परंतु अॅन्ड्रॉइड मध्ये सिस्टिम अपडेट करुन व्हॉट्सअॅप सुरु करणे थोडे मुश्किलच आहे. अशातच तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा ऑप्शन निवडू शकता.