Home » WhatsApp वर चॅटिंग करण्यासाठी नवे फीचर लाँच, जाणून घ्या अधिक

WhatsApp वर चॅटिंग करण्यासाठी नवे फीचर लाँच, जाणून घ्या अधिक

जर तुम्ही व्हॉट्सअॅपचा वापर करत असाल तर चॅटिंगसाठी कंपनीने तुमच्यासाठी खास फीचर्स लाँच केले आहेत. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....

by Team Gajawaja
0 comment
WhatsApp New Feature
Share

WhatsApp New Features :  व्हॉट्सअॅवर दिवसागणिक नवे फीचर्स रोलआउट केले जातात. अशातच कंपनीने एक खास सुविधा युजर्ससाठी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने अॅपमध्ये असे एक फीचर दिले आहे ज्याच्या मदतीने तुमचा चॅटिंग करण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. याआधी चॅटिंग करण्यासाठी तीन फॉर्मेट उपलब्ध होतो. पण आता यामध्ये कंपनीने आणखी चार फॉर्मेट जोडले आहेत. नवे टूल्स कंपनीने काही दिवसांपूर्वी टेस्टिंगसाठी उपलब्ध करून दिले होते. पण आता अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी रोलआउट केले आहेत. जाणून घेऊया याबद्दलच अधिक…..

Code Blocks : कोड ब्लॉक तुम्ही (`) बॅकस्टिकचा वापर करून तयार करू शकता. जेव्हा चॅटमध्ये याचा वापर केला जाईल तेव्हा टेक्स हाइलाइट होईल आणि तो समोरच्या व्यक्तीला सहज दिसू शकतो.

Quote Blocks : जेव्हा तुम्ही कोट ब्लॉक <> चा वापर कराल तेव्हा टेक्स ग्रे रंगाचा होईल. याशिवाय टेक्स वेगळाही दिसेल.

Lists : या टूलच्या मदतीने तुम्ही बुलेट किंवा नंबर पॉइंट तयार करू शकता. यासाठी टेक्स्टच्या सुरुवातीला युजर्सला एस्ट्रिक (*), hyphen (-) किंवा क्रमांकाचा वापर करावा लागणार आहे.

अॅपमध्ये आधी टेक्स्टसाठी Bold, italics, Strikethrough फॉर्मेट उपलब्ध करून दिले होते. पण आता तुम्हाला टेक्स्टसाठी सात स्टाइल्स मिळणार आहेत.

Bold कसे कराल
तुम्हाला टेक्स्ट बोल्ड करायचा असल्यास तुम्ही टेक्सच्या सुरुवातीला आणि अखेरीस *sample* असे करा. जेणेकरुन तुमचा टेक्स्ट बोल्ड होईल.

Italics कसा कराल
जर तुम्हाला टेक्स्ट इटॅलिक्समध्ये लिहायचा असल्यास तुम्ही टेक्स्टच्या सुरुवातीला आणि अखेरीस _sample_ अंडरस्कोर जोडा. (WhatsApp New Features)

Strikethrough:
जर तुम्हाला एखादी चूक सांगायची असेल किंवा ती हाइलाइट करायची असल्यास यासाठी तुम्ही टेक्स्टच्या सुरुवातीला आणि अखेरीस ~sample~ असे करा.


आणखी वाचा :
WhatsApp आणणार लवकरच नवे फीचर, व्हिडीओ कॉलिंगवेळी करता येणार हे काम
बोटाच्या आकाराचा फोन, किंमत फक्त 2 हजार रूपये
Ola-Uber बुक करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.