WhatsApp New Feature : बदलत्या टेक्नॉलॉजीच्या काळात दररोज तंत्रज्ञानात अपडेट होताना दिसून येत आहे. सध्या चॅटजीपीटी आणि आर्टिफिशिअल इंटिलेजेंसचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. याच्या माध्यमातून काही कामे करणे सोपेही झाले आहे. सोशल मीडियावर एखादी पोस्ट, व्हिडीओ कंटेट अथवा एटिडेट फोटो हवा असल्यास चॅटजीपीटी अथवा आर्टिफिशिअल इंटेलिजेंसची मदत घेऊ शकता. आता मेटा एआयटे फीचर व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याचा वापर कसा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया….
WhatsApp Meta AI च्या माध्यमातून तयार करा फोटो
व्हॉट्सअॅपचा वापर केवळ मित्रपरिवारांसोबत चॅट करण्यासाठी नव्हे तर अन्य कामांसाठीही केला जाऊ शकतो. सध्या मेटा एआयच्या मदतीने तुम्ही 10 सेकंदामध्ये कमी वेळात एआय इमेज तयार करुन मिळवू शकता. यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअॅपवर मेटा एआय सुरु करा.
-सर्वप्रथम मेटा एआयच्या चॅटबॉटवर क्लिक करा
-यानंतर /Imagine लिहून त्यावर तुम्हाला हव्या असलेल्या फोटोबद्दल लिहा
-उदाहरणार्थ, फुलपाखरु अथवा नदीचे एआ इमेज हवे असल्यास Butterfly अथवा River असे लिहा
-हे प्रॉम्प लिहिल्यानंतर Send बटणावर क्लिक करा. आता काही सेकंदांमध्ये तुमच्या स्क्रिनवर एआय इमेज तयार होऊन येईल. (WhatsApp New Feature)
WhatsApp Meta AI चा वापर करण्यासाठी करा हे काम
सध्या मोबाइलमध्ये WhatsAppMeta AI चा ऑप्शन दिला जात आहे. एखाद्या कारणास्तव तुमच्या व्हॉट्सअॅपवर मेटा एआयचे फीचर येत नसल्यास सर्वप्रथम अॅप अपडेट करा. लेटेस्ट वर्जन अपडेट केल्यानंतर तुम्हाला हे फीचर दाखवले जाईल.