WhatsApp New Feature : जगभरात व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर मेसेज, व्हिडीओ-फोटो शेअर करण्यासह कॉलिंगसाठी केला जातो. व्हॉट्सअॅपकडून सातत्याने नवे अपडेट्स आणले जातात. काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की, व्हॉट्सअॅप फोन क्रमांकाशिवाय लोकांना कनेक्ट करणे आणि डोळ्यांवर पडणारा तणाव कमी करण्यासाठी नव्या डार्क मोडवर काम करत आहे. पण आता लवकरच मेटाचे मालकी हक्क असणारे व्हॉट्सअॅप युजर्सला व्हिडीओ कॉलिंगसाठी नवे फीचर आणणार आहे.
WABetaInfoने शेअर केली अधिक माहिती
WABetaInfoच्या एका रिपोर्ट्नुसार, जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉलवर थेट म्युझिक शेअर करू शकता. यामुळे व्हॉट्सअॅप कॉलिंगवेळी मित्रपरिवारासोबत तुम्ही बातचीत करण्यासह म्युझिकही ऐकू शकता. हे फीच दोन्हीसाठी म्हणजेच व्यक्तिगत आणि ग्रुप कॉलसाठी काम करणार आहे. एका रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅप आणखी एका नव्या फीचरसंदर्भात चाचणी करत आहे. यामध्ये जेव्हा एखादा युजर व्हिडीओ कॉलवर आपली स्क्रिन शेअर करेल तेव्हा त्यामध्ये सुरू असणारे गाणे किंवा आवाज दुसऱ्या लोकांना देखील ऐकू येतील. (WhatsApp New Feature)
ग्रुप कॉलदरम्यानही काम करणार हे फीचर
हे नवे फीचर केवळ दोन लोकांच्या कॉलिंगपर्यंत मर्यादित राहणार नाही आहे. तर ग्रुप व्हिडीओ कॉलसाठी देखील काम करणार आहे. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही मित्रांसोबत बातचीत करताना गाणी ऐकू शकता. अथवा ऑफिस मीटिंग दरम्यान प्रेजेंटेशनसोबत बॅकग्राउंड म्युझिकही सुरू ठेवू शकता.
याशिवाय व्हॉट्सअॅपव व्हिडीओ कॉलवर मित्रांसोबत बसून एकत्रित सिनेमाही पाहू शकता. हे नवे फीचर कॉलवेळी म्युझिक शेअर करण्यासह आता व्हिडीओ प्लेबॅकही सिंक्रोनाइज करणार आहे. म्हणजेच सर्वजण एकाच वेळी एक गोष्ट पाहू शकतात. हे फीचर पुढील काही आठवड्यात हळूहळू रोल आउट केले जाईल असे सांगण्यात आले आहे.