संपूर्ण जगातील लोकांचा सर्वात आवडता मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणजे WhatsApp. WhatsApp शिवाय आजच्या काळात कोणाचेही पान हालत नाही. शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वच या WhatsApp च्या प्रेमात आहे. लहानातल्या लहान कामापासून ते मोठमोठ्या कामांपर्यंत WhatsApp चा उपयोग खूपच महत्वाचा ठरत आहे. WhatsApp देखील नेहमीच त्यांच्या ग्राहकांच्या अधिक सोयीसाठी आणि चांगल्या उपयोगासाठी त्यात विविध बदल करत असतात. (WhatsApp)
आजवर आपण पाहिले तर WhatsApp ने अनेक चांगले चांगले फीचर्स आणले आहेत, ज्यामुळे आपल्याला WhatsApp वापरणे अधिकच सोपे आणि सोयीस्कर झाले आहेत. थोड्या थोड्या कालावधीच्या अंतरावर WhatsApp मध्ये नवीन अपडेट येतच असतात. आता सुद्धा WhatsApp ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक भन्नाट आणि मस्त फिचर आणले आहे, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांना WhatsApp वापरताना अधिकच मजा येणार आहे. (WhatsApp New Update)
WhatsApp वर अनेक लोकं अनेकदा आणि काही लोकं तर अगदी दररोज न चुकता आपला स्टेटस अपडेट करत असतात. त्यांचे हे नवनवीन अपडेट मजेशीर असल्याने WhatsApp वापरताना मजा देखील येते. त्यावर विविध व्हिडिओ, फोटो, शुभेच्छा आदी अनेक पोस्ट करताना दिसतात. जेव्हा आपण WhatsApp वर स्टेटसला व्हिडिओ पोस्ट करतो तेव्हा त्याला वेळेचे बंधन असते. विशिष्ट सेकंदाचाच व्हिडिओ आपल्याला स्टेटसला पोस्ट करता येतो. त्यामुळे कधी कधी अर्धवट व्हिडिओमुळे आपला स्टेटस अपूर्णच राहतो. (Top Marathi Trending News)
अशावेळी स्टेटस पोस्ट करणारा व्यक्ती देखील निराश होतो, किंवा अशा वेळेचे बंधन असलेल्या व्हिडिओला पोस्ट करणे टाळतो. म्हणूनच WhatsApp ने अशा लोकांसाठीच हे नवीन फिचर आणले आहे. WhatsApp स्टेटसला जास्त मोठा व्हिडिओ पोस्ट करता येणार आहे. WhatsApp ने त्यांच्या युजर्ससाठी एक खास गिफ्ट आणले आहे. आतपर्यंत युजर्स त्यांच्या WhatsApp स्टेटसवर ६० सेकंदापर्यंत म्हणजेच १ मिनिटांचा व्हिडीओ शेअर करू शकत होते. (Marathi Latest NEws)
मात्र आता WhatsApp कडून व्हिडिओचा टाईम वाढवण्यात आला आहे. WhatsApp ने त्यांचे हेच फीचर अपडेट केले असून आता युजर्स त्यांच्या स्टेटसवर १ मिनिटांहून मोठा व्हिडीओ देखील अपलोड करू शकणार आहेत. मेटाने WhatsApp स्टेटसवर शेअर केल्या जाणाऱ्या व्हिडीओची मर्यादा ६० सेकंदांवरून वाढवत ९० सेकंद केली आहे. WhatsApp ने आता हे एक मोठे आणि सगळ्यांना आवडेल असे अपडेट आणले आहे. आता तुम्ही तुमच्या स्टेटसला ६० सेकंदांऐवजी ९० सेकंद लांबीचा व्हिडीओ शेअर करू शकणार आहात. (Social Media)
WhatsApp ने त्यांच्या स्टेटस फीचरची व्हिडिओ मर्यादा ९० सेकंदांपर्यंत वाढवली आहे. पूर्वी एका वेळी फक्त ६० सेकंदापर्यंतचा व्हिडिओ स्टेटसला अपलोड करता येत होता, मात्र आता ही मर्यादा ३० सेकंदांनी वाढवण्यात आली आहे. ज्या युजर्सना नेहमीच WhatsApp स्टेटसवर मोठे व्हिडीओ शेअर करायला आवडतात, त्यांच्यासाठी हे नवीन अपडेट फायद्याचं आणि त्यांना आवडणारे ठरणार आहे. (Marathi Top News)
===========
हेही वाचा :
दह्यासोबत चुकूनही खाऊ नका ह्या 5 गोष्टी, बिघडेल आरोग्य
आंब्यांच्या पानांचे सेवन केल्यास मिळतील हे 5 फायदे
===========
आता हे फीचर फक्त WhatsApp च्या बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या हे फीचर काही निवडक युजर्ससाठीच रिलीज करण्यात आले आहे. मात्र येत्या काही दिवसात किंबहुना लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी सुरु केले जाणार आहे. जर तुम्ही बीटा युजर असाल, तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून हे व्हर्जन अपडेट करून नवीन फीचर वापरू शकता. (Marathi Tech News)