Home » १.२ कोटी व्हॉट्सअॅप, १७ लाख फेसबुक युजर्सचा डेटा चोरी

१.२ कोटी व्हॉट्सअॅप, १७ लाख फेसबुक युजर्सचा डेटा चोरी

by Team Gajawaja
0 comment
Whatsapp Facebook Data Theft
Share

सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून डेटा लीक होणे ही काही नवी गोष्ट नाही. अलीकडल्या काळात डेटा चोरी होत असल्याच्या गोष्टी समोर येत राहतात. याच दरम्यान देशातील सर्वाधिक मोठ्या डेटा लीकची माहिती समोर आली आहे. सायबर पोलिसांच्या मते या डेटा लीकमध्ये शासकीय आणि नॉन-शासकीय संस्थांच्या जवळजवल १६.८ कोटी अकाउंट्सचा डेटा लीक झाला आहे. यामध्ये २.५५ लाख सैन्याच्या अधिकाऱ्यांचा डेटा सुद्धा आहे. आरोपींनी चोरी करण्यात आलेला डेटा १०० सायबर हल्लेखोरांना विक्री केला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणी ७ लोकांना अटक ही केली आहे. या संपूर्ण टोळीला तेलंगणाच्या साइबराबाद पोलिसांनी अटक केली आहे. (Whatsapp Facebook Data Theft)

पोलिसांच्या मते अटक करण्यात आलेले आरोपी १४० विविध कॅटेगरीतील डेटा विक्री करायचेय. यामध्ये लोकांचे फोन क्रमांक, NEET च्या विद्यार्थ्यांची खासगी माहिती यांचा समावेश आहे. साइबराबाद पोलिस आयुक्त एम स्टीफन रवींद्र यांनी असे सांगितले की, या प्रकरणी सात डेटा ब्रोकर्सला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी नोएडा मधील एका कॉल सेंटरच्या माध्यमातून डेटा एकत्रित करायचे. आरोपींनी याची कबुली सुद्धा दिली आहे की, चोरी करण्यात आलेला डेटा १०० सायबर हल्लेखोरांना विक्री केला आहे.

सैन्यतील जवानांच्या डेटामध्ये रँक, ईमेल आयडी, पोस्टिंगच्या जागा सुद्धा सहभागी आहेत. या डेटाचा वापर सैन्यावर पाळत ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. पोलिसांच्या रिपोर्टनुसार, आरोपींनी ५० हजार लोकांचा डेटा केवळ २ हजारांना विक्री केला आहे.

पोलिसांनी असे ही म्हटले की, डेटा चोरी मध्ये १.२ कोटी व्हॉट्सअॅप युजर्स आणि १७ लाख फेसबुक युजर्सला सुद्धा निशाण्यावर ठेवण्यात आले होते. पोलिसांचे दोन कोटी विद्यार्थी, १२ लाख सीबीएससी वर्गातील १२ वी चे विद्यार्थी, ४० लाख नोकरीच्या शोधात असणारे, १.४७ कोटी कार मालक, ११ लाख शासकीय कर्मचारी आणि १५ लाख आयटी नोकरदारांचा सुद्धा या डेटामध्ये समावेश आहे.(Whatsapp Facebook Data Theft)

हे देखील वाचा- सोशल मीडियात मुलांचे फोटो शेअर केल्यास पालकांना होणार शिक्षा

साइबराबाद पोलिस आयुक्त, क्राइम ब्रांन्च कमलेश्वर शिंगेनावर यांनी या प्रकरणी असे म्हटले आहे की, तीन कोटी लोकांचा एका मोबाईल क्रमांकावर डेटाबेस मिळाला आहे. जो टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर्सकडून लीक झालेला असावा. लीक झालेल्या संवेदनशील डेटाचा वापर महत्वपूर्ण संघटना आणि संस्थांपर्यंत अनधिकृत एक्सेस देण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यांनी असे म्हटले की, पॅन कार्ड संबंदित डेटाचा वापर गंभीर आर्थिक क्राइम करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.