Whatsapp Call Tricks : एखाद्याचा व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करायचा असल्यास बहुतांशजण थर्ड पार्टी अॅपचा वापर करतात. अशातच काहीवेळेस थर्ड पार्टीच्या अॅपमुळे तुमच्या प्रायव्हेसीला धोका निर्माण होतो. यामुळे आता थर्ड पार्टी अॅप नव्हे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनच कॉल रेकॉर्ड करू शकता. जाणून घेऊया व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्ड करण्याची प्रोसेस सविस्तर….
व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्ड कसा करावा?
कोणत्याही व्हॉट्सअॅप कॉलचे रेकॉर्डिंग केले जाऊ शकते. यासाठी पुढील काही स्टेप्स फॉलो करा.
-ज्यावेळी तुम्हाला व्हॉट्सअॅप कॉल येईल अथवा एखाद्याला तुम्ही कॉल करण्याआधी फोनमध्ये स्क्रिन रेकॉर्डिंग सुरु करा.
-फोन रेकॉर्डिंग सुरु केल्यानंतर यामध्ये साउंड ऑप्शन दाखवला जाईल तेथे तुम्ही Media and Mic च्या ऑप्शनवर क्लिक करा.
-यानंतर स्टार्ट रेकॉर्डिंगच्या ऑप्शनवर क्लिक करा. असे केल्याने कॉल रेकॉर्डिंग सुरु होईल. एवढेच नव्हे व्हिडीओ देखील दाखवला जाईल. (Whatsapp Call Tricks)
खरंतर, स्क्रिन रेकॉर्डिंगवेळी आवाज कमी येईल. पण रेकॉर्डिंग बेसिक कामासाठी वापरु शकता. अशाप्रकारे व्हॉट्सअॅपवरील कॉल रेकॉर्ड करु शकता.