प्रश्नांची उत्तरं देत करोडपती होण्याची सूवर्णसंधी देणारा खेळ म्हणजे कोण होणार करोडपती. ज्ञान आणि मनोरंजनाचा हा अद्भूत असा खेळ! याच कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचं नवं पर्व (Kon Honaar Crorepati 2022) प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. तुमचं ज्ञान तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं. यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालनही अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत.
‘प्रत्येक खेळात कोणी जिंकतं कोणी हरतं, पण या खेळात फक्त स्पर्धक जिंकतो’; असं सांगणारा कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. त्यात कोण होणार करोडपतीच्या यंदाच्या पर्वात प्रेक्षकांना कार्यक्रमात सहभागी होण्याची आणि जिंकण्याची वाढीव संधी मिळणार आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना कार्यक्रम सुरु होण्याआधी विशिष्ट कालावधीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतात. त्या प्रश्नाची उत्तरं देणाऱ्या स्पर्धकांना पुढे कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळते. यंदा हे प्रश्न २३ फेब्रुवारीपासून सुरु होतील. कोण होणार करोडपती कार्यक्रमाच्या नवीन पर्वामध्ये (Kon Honaar Crorepati 2022) काही बदल झाले आहेत. यंदाच्या पर्वाची खासियत अशी की, प्रेक्षकांना १४ प्रश्नांची उत्तरं देता येणार आहेत.
====
हे ही वाचा: हरहुन्नरी कलाकार: सचिन खेडेकर
====
यापूर्वीच्या पर्वांमध्ये स्पर्धकांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केवळ १० प्रश्नांची उत्तरं देता यायची, पण आता त्यांना १४ प्रश्नांची उत्तरं देता येणार आहेत. म्हणजेच कार्यक्रमात सहभागी होण्याचे चान्सेस आता वाढतील. तसंच ही प्रश्नावली १० दिवस प्रसारीत व्हायची आता १४ दिवस १४ प्रश्न विचारले जाणार आहेत. सोनी मराठीकडून मिळालेल्या माहितीनुसार बरेच स्पर्धक रजिस्ट्रेशन करु शकत नाही कारण रजिस्ट्रेशन करेपर्यंतच रजिस्ट्रेशनची वेळ संपायची. त्यामुळेच यंदा जास्तीत जास्त स्पर्धकांना कार्यक्रमात सहभागी होता यावं याकरता हा कालावधी १० दिवसांवरुन १४ दिवसांवर आणला आहे.
करोडपती बनण्याचं स्वप्न सगळेच पाहतात, पण प्रत्येकाला तशी संधी मिळतेच असं नाही. पण आपल्याला असलेल्या ज्ञानाच्या आधारे ते स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सामान्य प्रेक्षकांना उपलब्ध करून देत आला आहे. आता नवीन पर्वत झालेल्या बदलांमुळे (Kon Honaar Crorepati 2022) ही संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे.
====
हे ही वाचा: या महत्वाच्या कारणांसाठी आवर्जून बघा ‘शार्क टॅंक इंडिया’
====
सोनी टीव्हीवर दाखवला जाणारा रिअलिटी शो कौन बनेगाा करोडपती, प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमिताभ बच्चन करतात. त्यांचा हा अंदाज प्रेक्षकांना भावतो. त्यामुळे की काय हा शो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. याच कार्यक्रमाच्या धर्तीवर काही वर्षांपूर्वी ‘कोण होणार करोडपती’ हा मराठी रिअलिटी शो सुरू करण्यात आला होता. प्रसिद्ध अभिनेता सचिन खेडेकर यांचं सूत्रसंचालन असलेल्या या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. आता लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.