Home » सामंथाला नेमकं झालं तरी काय ?

सामंथाला नेमकं झालं तरी काय ?

by Team Gajawaja
0 comment
Samantha Prabhu
Share

दाक्षिणात्य चित्रपट सुंदरी म्हणून जिचा उल्लेख केला जातो, ती सामंथा रुथ प्रभू तिच्या चित्रपटाच्या दुनियेतून एक वर्षासाठी ब्रेक घेणार आहे.  सामंथाचा शकुंतलम हा चित्रपट काही महिन्यापूर्वी प्रदर्शित झाला आहे. 3 डी असणा-या शकुंतलमला प्रेक्षकांनी अपेक्षित असा प्रतिसाद दिला नाही. मात्र त्यामुळे सामंथाच्या लोकप्रियतेचा ग्राफ कमी झाला नाही. उलट सामंथाला दाक्षिणात्य सिनेमांसोबत हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांच्याही मोठ्या ऑफर येत आहेत. सध्या ती या तीनही चित्रपट दुनियेत काम करत आहे. यात तिच्याकडे मोठ्या बॅनरचे चित्रपट आहेत.  या चित्रपटांचे चित्रिकरण पूर्ण झाल्यावर आपण एक वर्षाचा ब्रेक घेणार असल्याचे सामंथानं जाहीर केले आहे. यशोदा या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सामंथाला पहिल्यांदा काही त्रास असल्याचे उघड झाले होते. मायोसिटिस नावाच्या स्वयंप्रतिकार रोगाचे निदान झाल्याचे तिने चाहत्यांना सांगितले. यावर तिनं अमेरिकेत जाऊन उपचारही घेतले होते. मात्र याच आजारानं पुन्हा डोकं वर काढलं असून सामंथाला आता उपचार करण्यासाठी एक वर्षाचा ब्रेक घ्यावा लागणार आहे. (Samantha Prabhu) 

सामंथा रुथ प्रभू (Samantha Prabhu) हे चित्रपट क्षेत्रातील अग्रगण्य असे नाव आहे. अनेक महत्त्वकांक्षी चित्रपट करणारी सामंथा ब्रेक घेणार ही बातमी आल्यानं पुन्हा सोशल मिडीयावर सामंथाच्या प्रकृतीची चौकशी करण्यात येऊ लागली आहे. सामंथानं आपल्यासाठी आरोग्य पहिल्या क्रमांकावर आहे. आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची सध्या गरज असल्याचे सांगून हा ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले आहे.

सामंथा (Samantha Prabhu) तिच्या शकुंतलम या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. या थ्रीडी चित्रपटासाठी सामंथानं आपलं वजन कमी केलं होतं. पण सामंथाचा हा चित्रपट पडद्यावर अपेक्षित अशी जादू करु चालवू शकला नाही. अर्थात यानं सामंथाच्या बकेटमधले चित्रपट कमी झाले नाहीत, उलट तिच्याकडे हॉलीवूडमधील चित्रपटांचीही रांग लागली. अॅक्शन पॅक्ड गुप्तचर मालिका ‘सिटाडेल’ मध्ये सामंथाची महत्त्वाची भूमिका आहे.  अभिनेता वरुण धवनसोबत सामंथा पुरी जी जान से या मालिकेसाठी शूटिंग करत आहे. यासोबतच तिच्याकडे विजय देवरकोंडा यांचा ‘कुशी’ हा चित्रपटही आहे. हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर सामंथा एक वर्षाचा ब्रेक घेणार आहे. यामुळे सामंथानं अन्य कुठलाही नवीन चित्रपट घेतलेला नाही. यातील कुशी या विजय देवरकोडा सोबतच्या चित्रपटाचे शुडींग शेवटच्या टप्यात आलं आहे. साधारण आठवड्याचे हे शुटींग बाकी असून सामंथानं सिटाडेलचेही काम पूर्ण केल्याची माहिती आहे.  

गेल्या वर्षी सामंथाने तिला मायोसिटिस नावाच्या स्वयंप्रतिकार रोगाचे निदान झाल्याचे जाहीर केले होते. यावर अमेरिकेतून तिने उपचार केले होते. तिचा शकुंतलम मधला वावर आणि सिटाडेलसाठी ती घेत असलेली मेहनत बघून चाहत्यांना सामंथा आता बरी झाल्यासारखे वाटत होते.  मात्र या आजारासाठी किमान वर्षभराची विश्रांती घेण्याची गरज असल्याचे सामंथानं सांगितलं आहे. मायोसिटिस नावाच्या आजारामध्ये शरीरातील स्नायूंवर अतिरिक्त ताण पडतो. शिवाय अतिशय तीव्र वेदनाही सहन कराव्या लागतात. सामंथा (Samantha Prabhu) गेली दोन वर्ष या आजारानं पिडीत असून त्यातील वेदना कमी करण्यासाठी ती वेदनाशामक गोळ्यांचा आधार घेत आहे. अलीकडेच बेलग्रेडमध्ये ‘सिटाडेल’चे शूटिंग करत असताना सामंथा तिच्या आजारपणात आराम पडावा म्हणून सेंट सावा चर्चमध्ये प्रार्थना कऱण्यासाठी गेली होती. 

===========

हे देखील वाचा : ‘ही’ अभिनेत्री सलमानचा करायची तिस्कार… पण सोहेल सोबत होते रिलेशन !

===========

किशोरवयात मॉडेलिंग करत सामंथानं दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देऊन सामंथा प्रभू हे नाव दाक्षिणात्य चित्रपटात पहिल्या क्रमांकावर असतांना तिने सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्यसोबत लग्न केले. मात्र हा विवाह फार दिवस टिकला नाही. नागा चैतन्य आणि सामंथा यांचा विवाह सोहळा जितका गाजला तितकाच त्यांचा घटस्फोटही गाजला. त्यानंतर सामंथानं पुन्हा आपल्या चित्रपट दुनियेत प्रवेश करत हिटची माळ चालू ठेवली. (Samantha Prabhu)  

सामंथा अतिशय गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ज्या भूमिकेत ती असते, त्याला पूर्ण न्याय देण्याचा तिचा प्रयत्न असतो. त्यामुळेच फॅमेली मॅन सारख्या वेबसिरीजमध्ये तिने केलेली नक्षलवाद्यांची भूमिका तिच्या चाहत्यांना अजिबात आवडली नाही. इतकी सामंथानं ती समर्थपणे केली आहे. याच सामंथाकडे आता हॉलिवूडचेही मोठे प्रोजेक्ट आहेत. मात्र सामंथा एक वर्षानंतर त्यावर काम करायला सुरुवात करणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.