असे म्हणतात व्यक्तीचे डोळेच सर्वप्रथम लोकांचे लक्ष वेधून घेतात. डोळ्यांचे सौंदर्य सर्वात महत्वाचे असून डोळे आपल्या मनाचे प्रतिबिंब असतात. बोलके आणि पाणीदार डोळे नेहमीच लोकांच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय असतो. प्रत्येक व्यक्ती समोरच्या व्यक्तीमध्ये डोळेच आधी बघते. जेव्हा जेव्हा डोळ्यांचा विषय येतो तेव्हा तेव्हा फक्त एकाच व्यक्तीचे नाव समोर येते आणि ते म्हणजे ऐश्वर्या राय(Aishwarya Rai). बॉलिवूडलाचं नव्हे तर संपूर्ण जगाला आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या विश्वसुंदरी असणाऱ्या ऐश्वर्या रायच्या सौंदर्यात देखील तिचे डोळे अधिक भर घालतात. अनेक मुलींची इच्छा असते की त्यांना ऐश्वर्या सारखे डोळे असावे. यासाठी काही मुली तर लेन्सचा देखील वापर करताना दिसतात. ऐश्वर्या डोळ्यांच्या बाबतीत खरंच नशीबवान आहे. तिला डोळ्याची दैवी देणगी असल्याची सर्वांचीच भावना आहे.
जेव्हा कधी ऐश्वर्याच्या सौंदर्याच्या विषय निघतो तेव्हा तिच्या डोळ्यांबद्दल कोणी बोलणार नाही असे होणार नाही. तिच्या डोळ्यांचे चाहते संपूर्ण जगात सर्वच जणं आहेत. ऐश्वर्या खरंच सौंदर्याचं बाबतीत आणि डोळ्यांच्या बाबतीत ऐश्वर्यवान आहे. ऐश्वर्याला लहानपणापासूनच तिच्या डोळ्यांमुळे लोकांचे अधिक अटेन्शन मिळाले. आजच्या या लेखातून जाणून घेऊया ऐश्वर्याच्या(Aishwarya Rai) डोळ्यांच्या सौंदर्याबद्दल.
वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की, गुगलवर नेहमीच ऐश्वर्याच्या(Aishwarya Rai) डोळ्यांबद्दल आणि तिच्या डोळ्यांच्या विशेषतेबद्दल सर्च केले जाते. अनेकदा तर लोकं ऐश्वर्याच्या डोळ्यांचा रंग नक्की कोणता आहे याबद्दल देखील सर्च करताना दिसतात. काही लोकांना तिचे डोळे निळे, काहींना करडे, तर काहींना हिरवे वाटतात. मात्र तिच्या डोळ्यांचा नक्की रंग कोणता याचा प्रश्न अनेकांना नेहमीच पडतो. लोकांच्या या प्रश्नावर खुद्द तिने एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली होती.
====
हे देखील वाचा – Viral Video: आराध्याला कॅमेरासमोर भरभरून पोझ देताना पाहून ऐश्वर्या भारावली
====
ऐश्वर्याला(Aishwarya Rai) एका मुलाखतीदरम्यान तिच्या डोळ्यांवर प्रश्न विचारला गेला, सोबतच तिच्या डोळ्यांचा खरा रंग नक्की कोणता आहे हे देखील विचारले गेले. त्यावर तिने सांगितले होते की, तिचे डोळे नैसर्गिक हिरव्या रंगाचे असून, प्रकाशानुसार तिचे डोळे कधी जास्त हिरवे तर कधी जास्त निळे वाटतात. तिच्या डोळ्यांचा रंग समुद्रासारखा ग्रीन ग्रे आहे. तिने सांगितले की, मादाम तुसादमध्ये तिच्या स्टॅचूमधील डोळ्यांचा जो रंग आहे तोच खरा तिच्या डोळ्यांचा रंग आहे. तिच्या डोळ्यांच्या रंगावरून तिने या मुलाखतीमध्ये एक मजेशीर किस्सा देखील सांगितला. तिच्या सरबजीत या चित्रपटासाठी तिला ब्राऊन रंगाच्या लेन्स लावायच्या होत्या. तिने एका डोळ्याला लेन्स लावली तर एक डोळा बाकी असताना तिच्या मुलीने आराध्याने तिला पाहिले आणि ती लगेच म्हणाली ‘ओ मिनियन’. ओ मिनियन हे असे कार्टून कॅरेक्टर आहे ज्याचा एक डोळा हिरवा तर एक ब्राऊन आहे.
सध्या ऐश्वर्या (Aishwarya Rai) कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये व्यस्त आहे. या सोहळ्यातील तिचे नुकतेच काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये तिने काळ्या रंगाचा रफल फ्लॉवर गाऊन घालून त्यावर न्यूड मेकअप केला होता. तिच्या या गाऊनवर पुढच्या बाजूला प्लंज नेकलाइन दिसली. तर उजव्या हातावर खूप रंगबेरंगी फुलं लावलेले दिसले. तर गाऊनच्या डाव्या बाजूला एका पूर्ण ओळीत फुलं लावलेले होते. तिचा हा लूक सर्वांनाच आवडत आहे.