पांढरे मीठ आणि सैंधव मीठ याबद्दल अनेक लोकांमध्ये खुप गैरसमज आहेत. काहींचे म्हणणे आहे की सैंधव मीठ आरोग्यासाठी चांगले आहे, तर काही चे म्हणणे आहे की पांढऱ्या मीठात आयोडीन असते त्यामुळे ते जास्त चांगले आहे. पांढरे मीठ सामान्यत: स्वयंपाकासाठी वापरले जाते. मात्र काही लोक स्वयंपाकासाठी सुद्धा सैंधव मीठाचा वापर करतात. पांढरे आणि सैंधव मीठ या दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत. आणि आजच्या लेखात आपण तेच जाणून घेणार आहोत.(White Salt & Pink Salt)
पांढरे मीठ
पांढरे मीठ हे जवळजवळ सगळीकडेच खुप सहज उपलब्ध आहे. हे सर्वात सामान्य मीठ आहे, जे जगभरात सर्वात जास्त वापरले जाते. टेबल मीठ, कॅाशर मीठ आणि सी-मीठ हे त्याचे काही प्रकार आहेत. पांढरे मीठ जास्त का वापरले जाते आणि बहुतेक ठिकाणी ते का मिळते तर याचे एक महत्वाचे कारण म्हणजे ते खूप स्वस्त आहे. हे मीठ कोणत्याही किराणा दुकानात किंवा ऑनलाइन स्टोअरमध्ये १२ ते १५ रुपये किलो इतक्या कमी किमतीत सहज उपलब्ध आहे. पांढरे मीठ खाण्याचा सल्ला देखील दिला जातो कारण त्यात आयोडीन असते.
=====================================
हे देखील वाचा: वजन वाढवायचयं? मग केळी बरोबर खा ‘हे’ पदार्थ ; वजन झपाट्याने वाढायला होईल मदत
=====================================
आयोडीन हे अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. विशेषत: थायरॉईड फंक्शन आणि मेंदूच्या विकासासाठी आयोडीन खूप महत्वाचे आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईडचे विकार होऊ शकतात. आयोडीनयुक्त मीठ खाल्ल्याने आपल्या दैनंदिन आयोडीनच्या गरजा पूर्ण होऊ शकतात. म्हणूनच, बहुतेक लोक पांढरे मीठ वापरून त्यांची आयोडीनची कमतरता पूर्ण करतात.

पांढरे मीठ मुख्यतः स्वयंपाकासाठी वापरले जाते. बहुतेक पदार्थ पांढऱ्या मिठानुसार तयार केले जातात. त्याचा बारीक पोत आणि विरघळण्यास सोपे गुणधर्म यामुळे ते वापरणे सोपे होते.पांढऱ्या मीठाला शुद्धीकरण प्रक्रियेतून जावे लागते. या रिफायनिंग प्रक्रियेत ब्लिचिंग सह अँटी-कॅकिंग एजंट जोडले जातात. त्यामुळे पांढरे मीठ हे नैसर्गिक राहत नाही. पांढऱ्या मिठात मोठ्या प्रमाणात सोडियम ही असते. आणि जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. विशेषत: हृदयाच्या आरोग्यासाठी, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी, हे प्राणघातक ठरू शकते.
सैंधव मीठ
सैंधव मीठ किंवा गुलाबी मीठाला आपल्या देशात उपवासाचे मीठ असेही म्हणतात.सैंधव मीठात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारख्या खनिजे असल्याचे बोलले जाते. ही खनिजे आरोग्यासाठी फार चांगली असतात. मात्र या मिठात आढळणारी ही खनिजे अत्यंत कमी प्रमाणात असल्याने त्यांचा आरोग्याला फारसा फायदा होत नाही. पांढऱ्या मिठाप्रमाणे याचा वापर केला तर ते खायलाही कमी लागते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.(White Salt & Pink Salt)

सैंधव मीठावर क्वचितच प्रक्रिया केली जाते. पांढऱ्या मिठाप्रमाणे त्याला अनेक प्रक्रियेतून जावे लागत नाही. डोंगरातून सैंधव मीठ खोदून मग त्यात काही वस्तू टाकून आपल्या घरी पोहोचवले जाते. हेच कारण आहे की काही लोकांना सैंधव मीठ आवडते आणि त्याचच सेवन करणे ते पसंत करतात. सैंधव मीठाला स्वतःची चव आणि गुलाबी रंग असतो. सैंधव मीठ आपल्या अन्नाला, इतर पदार्थांना तसेच अगदी कोशिंबीराला सुद्धा वेगळी चव देते. बर्याच वेळा सलाडमध्ये याचा वापर केला जातो.