कित्येक दशकांच्या संघार्षानंतर दोन प्रौढ व्यक्तीमधील समलिंगी संबंधांना कायद्याने अखेर मान्यता देण्यात आली. १९६९ साली पहिल्यांदा समलिंगी लोकांनी जाहीरपणे आपल्या हक्कांसाठी निदर्शने केली होती. अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये तेव्हा दंगली उसळल्या होत्या. त्यानंतर सातत्याने समलैंगिक हक्कांसाठी लोकांनी आवाज उठवला आहे. भारतात समलिंगी संबंधांना मान्यता असली तरी अजूनही समलैंगिक विवाहाला मान्यता असावी की नाही हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. (LGBTIQ Difference)
समलैंगिक लोकांचे हक्क जाणून घेण्याअगोदार त्यांना समजून घेणे गरजेचे आहे. शारीरिक इच्छा आणि गुप्तांगाची रचना यावरून समलिंगी लोकांचे विविध प्रकार पडतात. विविध लैंगिक ओळख असतांना त्यांच्यामध्ये नेमका काय फरक असतो जाणून घेऊया. (LGBTIQ Difference)

लेस्बियन : लेस्बियन ही अशी स्त्री असते जिला लैंगिक दृष्ट्या स्त्रीच्या शरीराचं आकर्षण असत. दुसरी स्त्रीच यांचा जोडीदार होते.
गे : लेस्बियन स्त्रीच्या बाबतीत जी स्थिती असते ती जर पुरुषांच्या बाबतीत असेल तर तो गे पुरुष म्हणून संबोधला जातो. एका गे पुरुषाला दुसऱ्या पुरुषाचेच आकर्षण असते.
बायसेक्सुअल : एखाद्या व्यक्तीला दोन्ही लिंगांबद्दल आकर्षण वाटत असेल तर त्या व्यक्तीची लैंगिक ओळख बायसेक्सुअल अशी होते. या व्यक्तीला (स्त्री अथवा पुरुष) दोन्ही लिंगाच्या व्यक्तीबद्दल आकर्षण असते. स्त्री किंवा पुरुष कुणीही त्यांचा जोडीदार होऊ शकतो.
क्वेशनींग : ही अशी व्यक्ती असते ज्यांना स्वतःची लैंगिक ओळख आणि शारीरिक इच्छा निश्चीत करता आलेली नसते.
इंटरसेक्स : ज्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी त्याची मुलगी किंवा मुलगा अशी लैंगिक ओळख ठरवता येत नाही त्यांना इंटरसेक्स असे संबोधले जाते.
असेक्सुअल : शारीरिकदृष्ट्या इतर कोणाकडेही आकर्षित न होणाऱ्या व्यक्तीला असेक्सुअल असे संबोधले जाते.
पॅनसेक्शुअल : अशी व्यक्ती जी शारीरिकदृष्ट्या कोणाकडेही आकर्षित होऊ शकते.
ट्रान्सजेंडर : ज्या व्यक्तीची लैंगिक ओळख जन्माच्या वेळी त्याच्या शरीराच्या जनेंद्रीयावरून ठरवली जाते. परंतु कालांतराने त्या व्यक्तीला जन्मावेळी ठरवण्यात आलेल्या लैंगिक ओळखीच्या विरुद्ध भावांचा अनुभव व्हायला लागतो आणि ती आपल्या लैंगिक ओळखीच्या विरुद्ध वागायला लागते अशा परिस्थितीत संबंधित व्यक्ती लिंगबदलाची प्रक्रिया करून घेत आपली लैंगिक ओळख बदलून घेते अशा व्यक्तींना आपण ट्रान्सजेन्डर म्हणून संबोधले जाते.
यामध्ये ट्रान्समेन आणि ट्रान्सवूमन असे दोन प्रकार पडतात. ट्रान्सवूमन हे जन्माच्या वेळी पुरुष ही लैंगिक ओळख ठरवण्यात आलेले अन कालांतराने स्वतःमध्ये स्त्रीचे भाव असल्याची जाणीव झालेले व्यक्ती असतात. तर ट्रान्समेन हे जन्माच्या वेळी स्त्री ही लैंगिक ओळख ठरवण्यात आलेले अन कालांतराने स्वतःमध्ये पुरुषी भाव असल्याची जाणीव असणारे व्यक्ती असतात. (LGBTIQ Difference)
========
हे देखील वाचा : जपानमध्ये मिळतात चक्क भाड्यावर नातेवाईक
=======
औषधोपचार, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, सेक्स रिअसायनमेंट सर्जरी आदी प्रक्रियाद्वारे ट्रान्सजेंडर व्यक्ती त्यांच्या शरीराची रचना बदलतात अन त्यांना हवी तशी शरीररचना करून घेऊ शकतात.