लवकरच आपण या इंग्रजी नवीन वर्षातला पहिला संक्रांतीचा (Makar Sankranti) सण साजरा करणार आहोत. संपूर्ण भारतामध्ये हा सण साजरा केला जातो. भारत हा कृषिप्रधान देश आहे. या दिवसांमध्ये शेतीतून पीक बाहेर आलेले असते. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी नवविवाहित महिला एकमेकींना या ऋतूंमधील गोष्टी वाण म्हणून देतात. (Makar Sankranti)
यासोबतच मकर संक्रातीचा सण साजरा करण्यामागचे एक कारण म्हणजे, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने खरमास समाप्त होतो आणि शुभ, मांगलिक कार्यांची सुरुवात होते. तसेच या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात आहे. हळूहळू सूर्य उत्तरेकडे झुकत जातो. (Marathi Top News)
संक्रांतीचा सण जरी संपूर्ण भारतमध्ये साजरा केला जात असला तरी या सणाची साजरी करण्यामागची पद्धत आणि रीती आणि नाव देखील वेगळे असते. जसे की दक्षिण भारतमध्ये या सणाला ‘पोंगल‘ (Pongal) नावाने ओळखले जाते. पोंगल सण कसा साजरा करतात आणि या दिवशी काय करतात हे आपण जाणून घेऊया. (Pongal)
तमिळ सौर दिनदर्शिकेनुसार, पोंगल हा सण ताई (Thai) या महिन्यात साजरा केला जातो. सूर्य देवाला समर्पित असणारा हा सण चार दिवस साजरा केला जातो. इंग्रजी कॅलेंडरनुसार, पोंगल सण यंदा १४ जानेवारी २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. चार दिवसाचा हा सण हा १४ जानेवारी ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत साजरा होईल.
पोंगल हा दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जाणारा एक सण आहे. पोंगल सण ‘तमिळर् तिरुनाळ्’ म्हणजेच तमिळ भाषिकांचा शुभदिवस मानला जातो. तमिळनाडू राज्यासोबतच श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, युरोपीय देश, उत्तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस इत्यादी जिथे तमिळ भाषिक लोकं आहेत तिथे पोंगल मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. (Thai Festival Of Tamilnadu)
पोंगल सण सूर्याला समर्पित आहे. या सणाच्या निमित्ताने शेतकरी लोकं सूर्याला धन्यवाद म्हणतात आणि शेतकामामध्ये उपयोगी पडणाऱ्या सर्व प्राण्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात.पोंगल सणाच्या काळात सूर्यपूजेसोबतच शिवपूजा आणि रुद्राभिषेकही केला जातो. भोगी पोंगल या दिवशी इंद्रपूजा करत गोडाधोडाचे जेवण केले जाते. तर दुसऱ्या दिवशी घराच्या अंगणात तांदळाची खीर शिजविली जाते आणि तिचा नैवेद्य सूर्याला दाखविला जातो. (Ponagl Festival Details)
=========
हे देखील वाचा : Rahul Dravid भारतीय क्रिकेट टीमची भक्कम ‘द वॉल’ राहुल द्रविड
=========
पोंगलचा शेवटचा दिवस म्हणजे ‘मट्टू पोंगल’. या दिवशी बैल, गाय, वासरू यांची पूजा केली जाते. तमिळमध्ये ‘मट्टू’ या शब्दाचा अर्थ बैल असा होतो. या दिवशी बैलांना सजवून मोत्यांच्या घंटा बांधल्या जातात. तसेच त्यांच्या शिंगांना तेल लावले जाते. या दिवशी बैलांच्या शर्यतीही होतात, ज्याला जल्लीकट्टू म्हणतात. (Pongal News)
अशी मान्यता आहे की, पोंगल सणाच्या आधी अमावस्या येते तेव्हा प्रत्येकजण वाईटाचा त्याग करून चांगले अंगीकारण्याचे व्रत घेतो, ज्याला ‘पोही’ म्हणतात. पोंगल सणाच्या निमित्ताने घराची स्वछता केली जाते आणि घरातील जुन्या खराब झालेल्या वस्तू जाळून नवीन वस्तू विकत घेतल्या जातात.