Home » Pneumonia : जागतिक न्यूमोनिया दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया या आजाराची संपूर्ण माहिती

Pneumonia : जागतिक न्यूमोनिया दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया या आजाराची संपूर्ण माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Pneumonia
Share

आपण अनेकदा न्यूमोनिया या आजाराबद्दल ऐकत असतो. न्यूमोनिया झाला, म्हणजे नक्की काय झाले हे आपल्याला माहित नसले तरी ‘न्यूमोनिया’ हा शब्द मात्र आपल्या तसा परिचयाचा आहे. हा संसर्गजन्य आजार नसला तरी जीवघेणा गंभीर आजार समजला जातो. ‘न्यूमोनिया’ म्हणजे काय तर आपल्या फुफ्फुसात विषाणू किंवा बुरशीमुळे झालेला संसर्ग. सोप्या भाषेत सांगायचे तर फुफ्फुसात पाणी होणे. न्यूमोनिया हा श्वसनमार्गाचा आजार आहे. हा आजार लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणालाही ‘न्यूमोनिया’चा त्रास होऊ शकतो. जगामध्ये या आजारामुळे दरवर्षी लाखो लोकांचा जीव जातो. या आजाराबद्दल लोकांमध्ये आजही उदासीनता दिसून येते. त्यामुळे लोकांना या आजाराविषयी जागरूक करण्यासाठी जागतिक न्यूमोनिया दिन साजरा केला जातो. (Pneumonia)

दरवर्षी १२ नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगामध्ये ‘जागतिक न्यूमोनिया दिन’ साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य आणि महत्त्वाचा उद्देश म्हणजे या गंभीर आणि प्राणघातक आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना लोकांपर्यंत पोहोचवणे. न्यूमोनियाचा संसर्ग फुफ्फुसांमधील लहान हवेच्या पिशव्या अल्व्हेओली मध्ये द्रव किंवा पू भरून श्वसनक्रियेत अडथळा निर्माण करतो. त्यामुळे रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो, उच्च ताप, खोकला, आणि थकवा जाणवतो. ‘न्यूमोनिया’मध्ये फुफ्फुसातील पेशींना सूज यते. फुफ्फुसात हवेच्या अत्यंत छोट्या-छोट्या पिशव्या असतात. यांना ‘अल्वेओली’ असे म्हटले जाते. यामध्ये जंतूसंसर्ग झाल्यामुळे न्यूमोनिया होतो. (Marathi)

‘अल्वेओली’चे कार्य शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत फुफ्फुसातील या पिशव्या आणि रक्त यांच्यात ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्साईडची देवाण-घेवाण होते. ‘अल्वेओली’मधून पास झालेला ऑक्सिजन शरीरातील सर्व पेशींपर्यंत पाठवला जातो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, न्यूमोनियात जंतूसंसर्गामुळे ‘अल्वेओली’मध्ये पाणी किंवा पू साठून त्याचं कार्य मंदावते. श्वासोच्छवास करण्यासाठी खूप त्रास होतो. या पिशव्यांमध्ये पाणी साचल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि रक्तात ऑक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. न्यूमोनिया हा एक अतिशय गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. हा आजार जरी कोणालाही होऊ शकत असला तरी मुले आणि वृद्धांना याचा धोका जास्त असतो. (Health Care)

न्यूमोनियाची लक्षणे
तज्ज्ञ सांगतात, न्यूमोनियाची लक्षणे तात्काळ ओळखणे उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचं असते. जर हा आजार उशिरा लक्षात आला तर तो गंभीर आणि जीवघेणा देखील ठरू शकतो. न्यूमोनियाची लक्षणे सांगायची झाली तर (Top Marathi Headline)
– श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणे.
– जोरजोरात आणि कमी श्वास घेणे.
– हृदयाच्या ठोक्यांचे प्रमाण वाढणे.
– ताप, अंगात थंडी भरणं आणि खूप घाम येणे
– कफ, छातीत दुखणं, नॉशिया, उलट्या होणं किंवा डायरिया
– श्वास घेण्यास त्रास होणे, रुग्ण श्वास जलदपणे घेत असतो.
– ‎अंगदुखी, स्नायू दुखणे, अशक्तपणा जाणविणे, भूक मंदावणे, डोकेदुखी ही लक्षणे न्यूमोनियात दिसू लागतात. तसेच काही रुग्णाच्या खोकल्यातून रक्तही येत असते. (Todays Marathi Headline)

Pneumonia

 

न्यूमोनियाची कारणे
फुफ्फुसात जळजळ आणि संसर्ग, ओलावा थंडी, संसर्गाचा प्रसार,कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती किंवा शरीराक पोषक तत्वांची कमतरता यामुळे न्यूमोनियाचा संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. शिंकणे आणि खोकल्याने त्याचे बॅक्टेरिया आणि विषाणू इतर लोकांमध्ये पसरू शकतात.

न्यूमोनिया होण्याचा धोका कोणाला अधिक असतो?
फुप्फुसाचा आधीच काही आजार असेल तर न्यूमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय प्रामुख्याने लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला, गंभीर आजाराचे रुग्ण, हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटरवर ठेवलेले रुग्ण आणि रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असलेल्या लोकांना न्यूमोनिया होण्याचा धोका जास्त असतो. (Top Marathi News)

न्यूमोनिया रुग्णाचा आहार
न्यूमोनिया असल्यास भूक कमी होते, काहीही न खाण्याची इच्छा होत असते. तसेच न्युमोनियामध्ये शरीरातील पाणी आणि क्षार घटक कमी होऊन डिहायड्रेशन होण्याचाही धोका असतो. त्यामुळे न्युमोनिया पेशंटसाठी द्रव पदार्थ दिले पाहिजेत. अशावेळी फळांचा ताजा रस, शहाळ्याचे पाणी देऊ शकता. रुग्णाच्या आहारात दूध आणि दुधाचे पदार्थ, फळे, हिरव्या पालेभाज्या समाविष्ट कराव्यात. त्यामुळे शरीराला आवश्यक ती व्हिटॅमिन्स, खनिजे व क्षारघटक मिळत असतात. याशिवाय चरबीशिवाय मांस, मासे चांगले शिजवून रुग्णाला देऊ शकता. यामुळे शरीराला आवश्यक प्रोटिन्स मिळण्यास मदत होईल. (Latest Marathi Headline)

काय खाऊ नये..?
न्युमोनिया रुग्णांनी तळलेले पदार्थ, चरबीचे पदार्थ, फास्टफूड, कोल्ड्रिंक्स, बाहेरचे उघड्यावरील पदार्थ, शिळे अन्न, कच्चे व अर्धवट शिजलेले पदार्थ खाणे टाळावे.

न्यूमोनिया प्रतिबंधात्मक उपाय
लसीकरणाद्वारे न्यूमोनिया होण्यापासून रक्षण करता येते. न्यूमोनिया टाळण्यासाठी लस उपलब्ध आहे. लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृद्ध व्यक्ती, गंभीर आजारी रुग्ण किंवा प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना त्याचा फायदा होऊ शकतो. ६५ वर्षांवरील व्यक्तींनी आणि दीर्घकालीन आजार असलेल्यांनी ही लस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी. शिवाय दरवर्षी फ्लूची लस घेणेदेखील फायदेशीर ठरते, कारण फ्लूमुळे न्यूमोनियाचा धोका वाढतो. यासोबतच (Top Stories)
• खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल धरावा.
• वेळोवेळी आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
• सिगारेट, बिडी यासारखे व्यसने करू नका. धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
• न्यूमोनिया बाधित रुग्णाजवळ गेल्यावर अधिक काळजी घ्यावी.
• न्यूमोनियापासून बचाव होण्यासाठी लस उपलब्ध आहे. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती आपण घेऊ शकता. (Top Trending News)

===========

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी या 3 गोष्टींपासून रहा दूरच, अन्यथा उद्भवेल गंभीर समस्या

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

===========

न्यूमोनियावर उपचार
न्युमोनियावरील उपचारामध्ये डॉक्टर अँटिबायोटिक औषधे, अँटीवायरल औषधे, ऑक्सिजन थेरपी यांचा वापर करतात. जिवाणूंमुळे होणारा न्यूमोनिया दोन ते चार आठवडय़ांत बरा होतो. पण, विषाणूंमुळे होणारा न्यूमोनिया बरा होण्यास अधिक कालावधी लागतो. पल्स ऑक्सिमीटर या यंत्राने रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासले जाते. त्यानुसार त्याला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज आहे का, हे डॉक्टर निश्चित करतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.