येत्या २२ ऑगस्टला पिठोरी अमावस्या असून या दिवशी श्रावण महिन्याची समाप्ती होत आहे. पंचांगानुसार, पिठोरी अमावस्या २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:५५ वाजता सुरू होऊन २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:३५ वाजता संपेल. २२ ऑगस्टला अमावस्या मध्यान्ह काळात आहे. त्यामुळे याच दिवशी पिठोरी अमावस्या मानली जाईल. पिठोरी अमावस्येच्या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वती आणि ६४ योगिनींची पूजा करतात. पिठोरी अमवस्येच्याच दिवशी पोळा असल्याने महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी या दिवशी पोळा साजरा केला जातो. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलाची या दिवशी पूजा करून त्याच्या शेतातली मदतीसाठी कृतज्ञता व्यक्त केली जाते. (Marathi News)
पिठोरी अमावस्येच्या दिवशी नानाविध उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये त्याचा खूपच लाभ होतो अशी मान्यता आहे. पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर पांढरे कपडे घालावे. या दिवशी तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. सूर्याला दिव्यांने ओवाळावे. त्यानंतर सूर्याला नमस्कार करुन सुखी जीवनासाठी प्रार्थना करा. सोबतच ॐ सूर्य देवाय नम: या मंत्राचा जप करा. (Top Marathi News)
सूर्यास्तापूर्वी जिथे पिठोरी अमावस्येची पूजा करणार आहेत तिथे पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पीठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला. हा दिवा दरवाजाजवळ लावावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा. हे दिवे शक्य असल्यास शिवमंदिरात देखील ठेवा. यामुळे जीवनातील सर्व दु:ख आणि संकटे दूर होतात. पिठोरी अमावस्येला कुश ग्रहणी अमावस्या असेही म्हणतात, कारण या दिवशी कुश गवताचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी गोळा केलेले कुश खूप पवित्र आणि फायदेशीर असते अशी धार्मिक श्रद्धा आहे. पिठोरी अमावस्येला कुशाने पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते. (Latest Marathi News)
भाद्रपद अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या ही पितृ तर्पण, श्राद्ध आणि दान यासाठी विशेष फलदायी मानली जाते. या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी विविध विधी देखील केले जातात, जेणेकरून ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतील. पिठोरी अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते. अन्नधान्य कपडे किंवा कोणत्याही जीवनावश्यक वस्तू गोर गरिबांना दान करु शकता. असे केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुऊन जातात आणि त्याला पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. (Top Trending News)
भाद्रपद अमावस्येला कुश ग्रहण करण्याचाही एक नियम आहे. या दिवशी पूजा, श्राद्ध आणि तर्पण यासारख्या धार्मिक कार्यात कुशचा वापर केला जातो. या दिवशी धार्मिक श्रद्धेनुसार, कालसर्प दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी भादो अमावस्येच्या दिवशी पूजा देखील केली जाते. पितृदोषासाठी तुम्ही यादिवशी पिंपळाच्या झाला तुपाचा दिवा सायंकाळी लावू शकता. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला सात किंवा अकरा प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता. (Top Stories)
==============
हे देखील वाचा : Lord Shiva : महादेवाचे वाहन असणाऱ्या नंदीबद्दल रंजक माहिती
Haritalika Vrat : जाणून घ्या हरितालिका व्रताचा मुहूर्त आणि पूजा विधी
Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि शुभ वेळ
===============
पिठोरी अमावस्येला भगवद्गीतेचे पठण करावे. पिठोरी अमावस्या दिवशी गंगेत स्नान केल्याने विशेष फळ मिळते. जर तुम्ही गंगेवर जाऊ शकत नसाल तर, घरी स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळा. पूर्वजांच्या नावाने ब्राह्मणांना अन्नदान करा. या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. यादिवशी पंचडाळी एकत्र करून त्या कावळे,चिमण्या,कबुतरे किंवा तुमच्या आजूबाजूला जे पक्षी असतील त्यांना देऊ शकता. (Social News)
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics