Home » मेजर ध्यानचंद (Dhyan Chand) यांच्या नावाचा गंमतीदार किस्सा तुम्हाला माहितेय का? वाचा सविस्तर

मेजर ध्यानचंद (Dhyan Chand) यांच्या नावाचा गंमतीदार किस्सा तुम्हाला माहितेय का? वाचा सविस्तर

by Team Gajawaja
0 comment
Dhyan Chand
Share

भारतातील नागरिक जसे खेळाला सन्मान देतात, तसेच खेळाडूंनाही अगदी देवाची उपमा द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. जसं क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर तसंच हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद आहेत (Dhyan Chand), हे आपणा सर्वांना माहीत आहे. 

भारत देशात अनेक भाषा, संस्कृती, आणि रूढी, परंपरा असणारे लोक राहतात. याचसोबत देशातील लोक मैदानी खेळाचेही तितकेच शौकिन आहेत. क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, फुटबॉल आणि हॉकी हे भारतीय नागरिकांचे जिवाळ्याचे विषय आहेत. या खेळांविषयी इथले नागरिक एकदा बोलायला लागले की अगदी बसल्या जागी मैफिल रंगलीच म्हणून समजा असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

वडील ‘समेश्वर सिंह’ हे ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये होते. सैन्यात असल्याने सतत वडिलांची बदली होत असल्याने ध्यान सिंह सहावीपर्यंतच शिकू शकले. त्याचे वडील ब्रिटीश आर्मीच्या हॉकी संघात खेळायला होते. मात्र तरी सुद्धा ध्यान सिंह यांना हॉकी खेळ खेळायला आवडत नसे. ते कुस्तीचे  खूप चाहते होते. त्यामुळे त्यांचा कुस्ती खेळण्याकडे जास्त कल होता. मात्र नंतर त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी आर्मी जॉईन केली आणि बघता बघता त्यांची हॉकीबद्दलची आवडही वाढू लागली.

Know Hockey Great Major Dhyan Chand Who Has Had the Khel Ratna Award Named  After Him

आर्मी जॉईन केल्यानंतर ध्यान सिंह यांना दिवसा हॉकी सरावासाठी वेळ मिळत नसे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस ते हॉकीचा सराव करत. त्यावेळी लाईट नसल्याने त्यांना चंद्राच्या प्रकाशात सराव करावा लागे. ज्यामुळे मित्र मस्तीत त्यांना ‘चंद’ म्हणू लागले. त्यानंतर त्याचं नावच ‘ध्यानचंद’ (Dhyan chand) पडले.

 पुढे जाऊन याच हॉकी खेळाच्या जीवावर त्यांनी, १९२८, १९३२ आणि १९३६ या सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात भारताला विजय मिळवून दिला होता. १९२६ च्या सामन्यात ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. कारण त्यांनी न्यूझीलंड दौऱ्यात एकूण २१ सामने खेळणाऱ्या भारतीय संघातर्फे १९२ गोल झाले. त्यातील १०० गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते.

पुढे १९३६ मध्ये बर्लिन येथे ऑलिम्पिक खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भारत आणि जर्मनी हे संघ आमने-सामने असताना तब्बल ४० हज़ार प्रेक्षकांसह जर्मनीचा हुकमशहा अँडॉल्फ हिटलर देखील त्याठिकाणी होता. पहिल्या हाफमध्ये भारत केवळ एकच गोल करु शकला होता. पण नंतर ध्यानचंद यांनी असं काही केलं की संपूर्ण मैदान आश्चर्यचकीत झाले होते.

दुसऱ्या हाफमध्ये त्यांनी थेट शूज काढून खेळू लागले. त्यानंतर मात्र भारताने सामना तब्बल ८-१ अशा तगड्या फरकानं जिंकला. त्यांच्या या खेळीचा हिटलरही दिवाना झाला. त्याने ध्यानचंद यांना जर्मनीकडून खेळण्याची व जर्मनीचे नागरिकत्व तसेच जर्मन सैन्यात बढतीची ऑफर दिली होती. पण मनात भारत देशाविषयी देशप्रेम असल्याने ध्यानचंद यांनी ही ऑफर नाकारली.

Dhyan Chand in Berlin 1936: Captaincy test in Nazi Germany, Adolf Hitler  myth | Olympics News,The Indian Express

आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी तब्बल ४०० हून अधिक गोल केले आहेत. बर्लिन येथे १९३६ मध्ये अखेरची ऑलम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या ध्यानचंद यांनी त्यांच्या या अखेरच्या ऑलिम्पिकमध्ये १३ गोल केले होते. त्यांनी अमस्टर्डम, लॉस एंजेलिस आणि बर्लिन ऑलिम्पिकमध्ये मिळून ३९ गोल केले होते.

ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळले. त्यानंतर वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतली. यानंतरही ध्यानचंद सैन्यात हॉकी सामने खेळत राहिले. भारत सरकारने ध्यानचंद यांना १९५६ साली पद्मभूषण देऊन गौरवले होते.

हे ही वाचा: या महत्वाच्या कारणांसाठी आवर्जून बघा ‘शार्क टॅंक इंडिया'(Shark Tank India)

दिल्ली दंगलीतील आठवणींचे ग्रहण!

मात्र जगात हॉकी खेळातून देशाची वेगळी ओळख निर्माण करणारे, मेजर ध्यानचंद (Dhyan Chand) यांचे शेवटचे दिवस फार चांगले नव्हते. ऑलिम्पिक सामन्यात भारताला सुवर्णपदक मिळवूनही भारत देश त्यांना विसरला होता. त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांना पैशांची कमतरता जाणवत होती. यकृत कर्करोगाचे निदान झाल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या सामान्य वॉर्डात दाखल केले होते व अखेर ३ डिसेंबर १९७९ मध्ये त्यांचे निधन झाले.

हे देखील वाचा: अरे बापरे! जगातील सर्वात लहान सिरीयल किलर आहे अवघ्या आठ वर्षाचा…

अलीकडेच भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावांमध्ये रूपांतर केलं. यावरून खूप मोठं राजकारण रंगले होते. मात्र तरी सुद्धा भारत सरकारने मेजर ध्यानचंद यांना न्याय मिळवून दिलाच.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.