Home » Metaverse म्हणजे काय आणि कसे काम करते?

Metaverse म्हणजे काय आणि कसे काम करते?

by Team Gajawaja
0 comment
Metaverse
Share

सध्याच्या काळात मेटावर्स (Metaverse) शब्दाची खुप चर्चा होत आहे. कामाच्या ठिकाणी असो किंवा चर्चा करताना असो मेटावर्स हा शब्द हमखास वापरला जातो. मेटावर्स येणाऱ्या काळात संपूर्ण जगाला बदलणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, मेटावर्स म्हणजे काय आणि ते कसे काम करते? तर मेटावर्स हे एक वर्च्युअल जग आहे. वर्चुअल जग म्हणजे आभासी जग, जेथे आपण एकमेकांना अनुभवू शकतो आणि आपल्याला असे वाटते की, ज्या व्यक्तीशी आपण बोलतोय तो अगदी आपल्या बाजूला बसला आहे. जसे की, व्हिडिओ कॉलमध्ये आपण फक्त व्यक्तीचा चेहरा पाहू शकतो. मात्र आभासी जगात आपल्याला व्यक्तीचा भास होतो.

मेटावर्स हे एक आभासी जग जरी अससले तरी खऱ्या जगासारखी वाटणार आहे. कारण येथे तुम्हाला जगातील कानाकोपऱ्यातील व्यक्तीचा, गोष्टीचा भास होणार आहे. येत्या काळात तंत्रज्ञान अधिक प्रगती करणार आहे. मेटावर्स ऐवढे शक्तीशाली तंत्रज्ञान होणार आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक गोष्ट ही खऱ्या पद्धतीने अनुभवता येणार आहे. जसे की, आपला एखदा मित्र दुसऱ्या शहरात असून तो तेथे पार्टी करतोय तर आपण मेटावर्सच्या माध्यमातून त्याच्यासोबत सहभागी होऊ शकतो. आपल्याला ही तसाच भास होणार की, आपण त्याच्या पार्टीत सहभागी झालो आहोत. थोडक्यात सांगायचे झाल्यास, आभासी जगात तुम्हाला सगळ्या गोष्टी खऱ्या असल्याचे भासणार आहे.

हे देखील वाचा- Shangri-La Dialogue: आशियाई देशांच्या संरक्षण परिषदेबद्दल तुम्हाला माहित आहे का?

 

Metaverse
Metaverse

Metaverse शब्द हा कोणी आणि कसा तयार केला?
मेटावर्स हा शब्द Neal Stephenson यांच्या द्वारे तयार करण्यात आला होता आणि ते एक लेखक होते. त्यांनी सर्वात प्रथम मेटावर्स शब्दाचा वापर 1992 मध्ये आपल्या पुस्तकात केला होता. त्यावेळी मेटावर्स हा शब्द केवळ काल्पनिक रुपात त्या पुस्तकात लिहिला होता. मात्र आज महान संशोधक आणि बड्या कंपन्यांनी मिळून मेटावर्स शब्दाचे सत्यात रुपांतर करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

फेसबुक आणि मेटावर्सचा काय संबंध?
तुम्हाला माहिती असेल की, फेसबुकने आपल्या नावात बदल करत मेटा असे ठेवले आहे. अशातच मेटावर्स आणि फेसबुकचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच ना? याचे उत्तर सोप्पे आहे. कारण जसे की, मेटावर्सच्या जगात दोन लोक एकमेकांना भेटण्याचे काम करतात आणि समोरचा व्यक्ती आपल्या सोबत असल्याचे भासते. अशाच प्रकारे फेसबुक असे मानते की, जगभरातील व्यक्ती सुद्धा फेसबुकच्या माध्यमातून सहज जोडली जातात. त्यामुळेच फेसबुकने आपले नाव मेटा ठेवले आहे.

भविष्यात आपण मेटावर्सच्या जगात जगताना दिसणार आहोत. कारण ज्याप्रकारे आपण सध्याच्या काळात आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे देऊन काही गोष्टी खरेदी करतो. मात्र मेटावर्सच्या जगात आपण पैसे देऊच पण त्याला क्रिप्टो कॉइन्स नावाने ओळखले जाईल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.