Home » Nitish Kumar : हिजाब म्हणजे काय? मुस्लिम महिला का स्वतःला झाकतात?

Nitish Kumar : हिजाब म्हणजे काय? मुस्लिम महिला का स्वतःला झाकतात?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Nitish Kumar
Share

सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे एका वादामुळे चांगलेच गाजत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका कार्यक्रमामध्ये असल्याचे दिसते. या कार्यक्रमामध्ये डॉक्टरांना नियुक्तीपत्र देण्यात येत होती. हे नियुक्तीपत्र देताना एका महिला डॉक्टरचा हिजाब खाली ओढताना नितीश कुमार दिसत आहेत. संबंधित महिला डॉक्टरचे नाव नुसरत परवीन आहे. (Nitish Kumar)

मुख्यमंत्री नितीश कुमार हे महिला डॉक्टरला नियुक्तीपत्र देतात. त्यानंतर तिच्या डोक्यावर असलेल्या हिजाबबाबत ते काहीतरी विचारतात. त्यानंतर ते स्वतःच हाताने तो हिजाब खाली ओढतात. या प्रकारामुळे नितीश कुमार यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अनेक राजकारणी लोकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मात्र या प्रकरणानंतर मुस्लिम महिलांच्या हिजाबबद्दल बऱ्याच चर्चा होताना दिसत आहे. आपण या लेखातून या हिजबाबद्दलच काही माहिती जाणून घेऊया. (Marathi)

आपण पाहिले असेल अनेक मुस्लिम महिला बुरखा घालतात, कधी कधी त्या असा हेडस्कार्फ वापरतात जो पूर्ण त्यांचे डोके आणि चेहरा झाकतो मात्र त्यात डोळे उघडे असतात तर काही महिला त्यांचा हेडस्कार्फ फक्त डोक्यावरूनच घेतात. हिजबाबद्दल सांगायचे झाले तर आधुनिक इस्लाममध्ये हिजाबचा अर्थ पडदा आहे. कुराणमधील हिजाब कपड्यांशी संबंधित नाही, तर महिला आणि पुरुषांमधील पडदा म्हणून आहे. कुराणात मुस्लिम पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सभ्य कपडे घालण्याची सूचना देण्यात आली आहे. येथे खिमर (डोके झाकण्यासाठी) आणि कपड्यांसाठी जिल्बाब (लबादा) हे शब्द सांगितले आहेत. हिजाब अंतर्गत, पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सैल आणि आरामदायक कपडे घालण्यास तसेच डोके झाकण्यास सांगितले आहे. (Todays Marathi Headline)

हिजाब म्हणजे चेहरा झाकणे तर बुरख्यामध्ये संपूर्ण शरीर झाकले जाते. पर पुरुषाने स्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नये म्हणून मुस्लिम धर्मानुसार स्त्रियांनी बाहेर पडताना बुरखा परिधान करावा असं सांगितले जाते. परपुरूष आपल्याकडे आकर्षित होऊ नये यासाठी बुरखा घातला जातो. असे नियम केवळ मुस्लिम महिलांना नाही, तर मुस्लिम पुरुषांना देखील आहेत. मुस्लिम पुरुषांनी पर स्त्रीकडे नजर वर करून पाहू नये असे देखील धर्मात सांगण्यात आले आहे. थोडक्यात काय तर हिजाब म्हणजे फक्त चेहरा झाकण्यासाठी वापरलेली गोष्ट तर बुरखा म्हणजे संपूर्ण शरीर झाकलं जाईल अशी गोष्ट. हिजाब हा बुरख्याचा एक भाग आहे. कोणत्याही परपुरुषाची नजर आपल्यावर पडू नये, परपुरुष महिलांकडे पाहून उत्तेजीत होऊ नये, यासाठी बुरखा घालण्याची प्रथा सुरु झाली. हिजाब व्यतिरिक्त मुस्लिम स्त्रिया अजून वेगवेगळ्या पद्धतीने स्कार्फचा वापर करत आपला चेहरा लपवत असतात. (Top Marathi News)

Nitish Kumar

अनेक मुस्लिम महिला नकाब देखील घालतात. निकाब म्हणजे चेहरा झाकण्यासाठी वापरण्यात येणारे कापड. यामध्ये डोके पूर्णपणे झाकलेले असते. इस्लाममध्ये कोठेही चेहरा झाकण्यास सांगितलेले नाही, परंतु फक्त डोके आणि केस कापडाने झाकले पाहिजेत. पण कट्टरतावादी देशांमध्ये महिलांनाही तोंड लपवणे बंधनकारक आहे. त्यामुळे डोके, चेहरा झाकणे आणि फक्त डोळे उघडे ठेवणे हे मुखवटाचे काम आहे. नकाबचे हे कापड महिलांच्या मान आणि खांद्यापर्यंत छातीपर्यंत येते. सामान्यतः हे काळ्या रंगाचे कापड असते जे पिनच्या मदतीने सुरक्षित केले जाते. (Latest Marathi Headline)

भारतात, मुस्लिम महिलांना बहुतांश वेळा बुरख्यात पाहिले आहे. काळ्या रंगाचा बुरखा हा संपूर्ण शरीर झाकतो. नकाबचा पुढचा भाग म्हणजे बुरखा. जिथे नकाबमध्ये डोळे सोडून संपूर्ण चेहरा झाकलेला असतो, तिथे बुरख्यात डोळेही झाकलेले असतात. डोळ्यांच्या समोर स्त्रीला दिसण्यासाठी खिडकीसारखी जाळी तयार केली जाते किंवा कापड हलके असते जेणेकरुन दिसेल. यासोबतच संपूर्ण शरीरावर सैलसर एक झगा असतो. जेणेकरून कोणतेही पुरूष आकर्षित होऊ नयेत. (Top Marathi News)

बाहेरच्या मुस्लिम देशांमधील स्त्रिया या अल-अमिरा देखील आपला चेहरा झाकण्यास वापरतात. आता अल-अमिरा म्हणजे काय तर दोन कपड्यांचा संच आहे. यातले एक कापड डोक्यावर टोपीसारखे घातले जाते. दुसरे कापड थोडे मोठे आहे, जे डोक्याभोवती गुंडाळलेले आहे आणि छातीवर लिपलेले आहे. हा असा पोशाख आहे ज्याला भारतात बुरखा म्हणतात. वास्तविक मिडल इस्ट देश याला अबाया म्हणतात. हा एक लांब झाकलेला पोशाख आहे जो स्त्रिया आत परिधान केलेल्या कोणत्याही कपड्यांवर घालतात. डोक्यासाठी एक स्कार्फ आहे ज्यामध्ये फक्त केस झाकलेले आहेत आणि चेहरा उघडा आहे. आता फॅशननुसार त्यात अनेक रंग येऊ लागले आहेत. (Top Trending Headline)

=======

Nargis Mohammadi : शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या नर्गिसला चाबकाचे फटके !

=======

पाकिस्तान आणि भारतात मुस्लिम स्त्रिया सलवार-कमीजने डोके झाकण्यासाठी देखील दुपट्ट्याचा वापर करतात. दुपट्टा हा सलवार-कमीजचा एक भाग आहे. डोके झाकणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. इस्लामशिवाय भारतात अनेक ठिकाणी हिंदू महिलांनाही डोक्यावर कापड बांधावे लागते. राजस्थान आणि हरियाणामध्ये अनेक ठिकाणी महिलांना तोंड झाकून घरातील सर्व कामे करावी लागतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.