Home » America : फायरनाडो म्हणजे काय ?

America : फायरनाडो म्हणजे काय ?

by Team Gajawaja
0 comment
America
Share

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील आगीचे व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत. या आगीमुळे लॉस एंजेलिस या शहराला स्वाहा केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हॉलिवूडमधील मान्यवर अभिनेत्यांची घरे या आगीत जळली असून त्यांना अंगावरील कपड्यांसह घर सोडण्याची वेळ आली आहे. ही आग एवढी भीषण आहे, की अवघ्या हॉलिवूडवरच धोक्याची घंटी वाजू लागली आहे. येथील मोठे स्टुडिओही आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ रॉबर्ट लुना यांनी आगीमुळे झालेल्या विध्वंसाची तुलना अणुबॉम्ब स्फोटाशी केली आहे. त्यावरुन यामध्ये झालेल्या नुकसानीची कल्पना येते. (America)

सध्या हेलिकॉप्टर आणि विमानांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असले तरी या भागात वाहत असलेल्या जोरदार वा-यांमुळे आग आणखीनच पसरत चालली आहे. यामुळेच ही आग म्हणजे, फायरनाडो असल्याचा उल्लेख करण्यात येत आहे. हे फायरनाडो म्हणजे नेमकं काय, हे आपण पाहुया. लॉस एंजेसिसमध्ये लागलेल्या आगीनं रौद्र रुप धारण केल्यावर त्याची तुलना आता अणुबॉम्बच्या स्फोटाशी करण्यात येत आहे. ही आगीची परिस्थिती हाताळण्यासाठी नॅशनल गार्डला पाचारण करण्यात आले. जवळपास 50 हजार नागरिकांनी त्यांची घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामध्ये अनेक कलाकारांचा, उद्योगपतींचा समावेश आहे. अनेक कलाकारांची घरी आगीनं भस्मसात केली असून त्यांना अंगावर घातलेल्या कपड्यांसह घर सोडावे लागले आहे. (Latest Updates)

चार दिवस लॉस एजेलिस जळत असून शनिवारपर्यंतही ही आग आटोक्यात येऊ शकत नाही, असे इथल्या प्रशासनानं हताशपणे सांगितले आहे. या भागात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. ही आग म्हणजे, फायरनाडो असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. यामुळे अमेरिकेला झालेले नुकसान पुढच्या काही वर्षात भरुन निघणार नाही, असे तज्ञ सांगत आहेत. फायरनाडोला फायर व्हर्ल असेही म्हटले जाते. यात अग्नीचे मोठे मनोरे उठतात आणि ते हवेत वरच्या दिशेने जातात. जसा जोरदार पाऊस पडतो, तेव्हा वार आल्यावर पावसाचा झोत त्या वा-याबरोबर वाहतांना दिसतो. तशीच ही परिस्थिती असते. आगीच्या ज्वाळा या वा-यासोबत वाहत जातात. अशात या ज्वाळा आणखी पुढे पसरतात. जोरदार वा-यामुळे आपल्या आसपासच्या भागामध्येही आग पसरत जाते. शक्यतो ही आग वरच्या भागापासून लागते. (America)

तज्ञांचे म्हणणे आहे की, फायरनेडो मध्ये धुळीचे वादळही उठते. त्यामुळे हवा अधिक गरम होते. मातीचे ढग निर्माण होतात. फायरनेडो होण्यासाठी खूप गरम, कोरडी हवा आणि आग यांचा मिलाप होतो. बहुधा जंगलांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते. जंगलातील वणवेही अशाच पद्धतीनं लागतात. जंगलातील वणव्यांमध्ये उंज झाडे पेटतात, ती याच फायरनेडो परिस्थितीमुळे. 2018 मध्ये, कॅलिफोर्नियामध्ये 18000 फूट उंचीवर पोहोचणारा फायरनाडो नोंदवला गेला होता. हा वणवा जवळपास महिनाभर कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये असल्याची नोंद आहे. यामुळे मोठ्या वनसंपदेचे नुकसान झाले होते. त्याआधी 1871 मध्येही अशाच प्रकारचा फायरनेडो कॅलिफोर्नियामध्ये झाल्याची नोंद आहे. यात अग्निशामक दलातील अनेक कर्मचारी मृत्यूमुखीही पडले होते. त्यानंतर आत्ताचा सर्वात विनाशकारी फायरनेडो असल्याचे सांगण्यात येते. फायरनेडो सहसा जास्त वेळ टिकत नाही. त्याच्यावर पाण्याचा शिडकावा केला तर ही वरच्या भागात लागलेली आग लगेच विझते. मात्र ही आग झाडाच्या मुळापर्यंत गेली तर त्याला विझवणे कठिण असते. (Latest Updates)

================

हे देखील वाचा : America : कुठे आग, कुठे बर्फाचे वादळ अमेरिके त्राहिमाम

America Fire : अमेरिकेच्या जंगलांना भीषण आग ! लावली की लागली ?

===============

आत्ता लॉस एंजेलिसमध्ये तशीच परिस्थिती आहे. लॉस एंजेलिसमध्ये बघता बघता अनेक घरे या फायरनेडोमध्ये नष्ट झाली आहेत. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या घराबाबतही असेच झाले आहे. हॅरिस यांचे घर खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आता त्या भागात आगीचे साम्राज्य आहे. ही आग आता एलए या भागात पसरली आहे. अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला हा भाग आहे. येथे 1 कोटीहून अधिक लोक राहतात. या सर्वांच्याच घरांना आगीपासून वाचवण्याचे आव्हान येथील प्रशासनापुढे आहे. ही आग विझवण्यासाठी सुमारे 7500 अग्निशामक जवान तैनात आहेत. शिवाय स्थानिकही मोठ्या संख्येनं पुढे आले असून आता ज्यांची घरे जळली आहेत, किंवा रिकामी झाली आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात लुट करण्यात येत आहे. एकूणच या फायरनेडोचा विळखा पुढचे काही दिवस तरी लॉस एंजेलिसला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. (America)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.