Home » आपण फक्त ४% इंटरनेट वापरतो; उर्वरित इंटरनेटची ही भयाण काळी बाजू तुम्हाला माहिती आहे का?  

आपण फक्त ४% इंटरनेट वापरतो; उर्वरित इंटरनेटची ही भयाण काळी बाजू तुम्हाला माहिती आहे का?  

by Team Gajawaja
0 comment
Dark web
Share

नुकतीच क्लिअरट्रीप (Cleartrip) या वेबसाईटचा डेटा डार्क वेबद्वारे हॅक केल्याची बातमी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सुशांत सिंग राजपूतची हत्या डार्क वेब वरून सर्व बॉलीवूडने बघितल्याचा दावाही करण्यात आला होता. अर्थात त्याचं पुढे काय झालं कोणालाच माहिती नाही. पण या बातम्यांमुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न येत असेल, डार्क वेब (Dark web) म्हणजे नक्की काय आहे? 

नव्वदच्या दशकात अमेरिकेतील गुप्तचर संघटनेनं जगभरातील गुप्तचर संघटनांची माहिती देण्यासाठी आणि आपल्या सैनिकांना दुसऱ्या देशातील सैन्याबद्दल गुप्त माहिती पुरवण्यासाठी एक डार्क वेब नावाचे मायाजाल विणले. पुढे या डार्क वेबचा वापर त्याच्या नावाप्रमाणे वाईट कामांसाठी होऊ लागला. डार्क वेब म्हणजे असं मायाजाल आहे जिथे अनेक वेबसाईट्स असतात; त्याही सांकेतिक स्वरुपात. त्यातून अरबो, खरबोंचे व्यवहार चालतात. अर्थात हे सर्व व्यवहार बहुधा गुन्हेगारी स्वरुपाचे असतात आणि त्याचे चलनही वेगळ्या चलनामध्ये होते. 

गुन्हेगारांसाठी सुगीची ठरलेली ही डार्क वेबची दुनिया सर्वसामान्यांसाठी मात्र कुतूहल जागवणारी आहे.  पण मंडळी चुकूनही या दुनियेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करु नका कारण ते सर्वसामान्यांचं काम नाहीच मुळी…. का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी डार्क वेबची दुनिया कशी असते, हे जाणून घेऊया. (What is the Dark web?)

डार्क वेब या नावावरूनच हे स्पष्ट होते की हे इंटरनेटचे गडद आणि काळे जग आहे. यात प्रत्येकाला प्रवेश करणे शक्य नसल्यामुळेच बहुधा याला डार्क वेब असे नाव देण्यात आले असावे. या डार्क वेबची सुरुवात सुपरपॉवर अमेरिकेनं केली अशी प्राथमिक माहिती आहे. अमेरिकन सैन्याने जगभरातील आपल्या एजंट्ससाठी सामायिक यंत्रणा असावी म्हणून डार्क वेबची निर्मिती केली.  

डार्क वेब हा एक इंटरनेटचा एक प्रकार आहे. आपण Google, Yahoo, Facebook, Twitter आणि इतर असंख्य वेबसाइट्स सहजपणे ओपन करु शकतो. पण इंटरनेटमध्ये एक खाजगी जगही आहे, त्यालाच डार्क वेब म्हणतात. तंत्रज्ञान विश्वातील मान्यवर याला सायबर जगताचे ‘अंडरवर्ल्ड’ म्हणतात. त्याचा वापर कसा होतो, यावरच डार्कवेबची उपयुक्तता की धोका हे अवलंबून असते. कायदेशीररित्या डार्कवेबचा वापर केला, तर ती एक उपयुक्त सेवा असल्याचे सिद्ध होते. पण तरीही डार्क वेब हे प्रकरण सर्वसामान्यांचीसाठी दूरच आहे.   (What is the Dark web?)

इंटरनेटच्या आगमनाने उद्योग व्यवसायात क्रांती घडवून आणली आहे. या युगाला डिजिटल युग म्हणूनही ओळख मिळाली आहे. पण नाण्याला दोन बाजू असतात. त्या इंटरनेटची दुसरी बाजू म्हणजे डार्क वेब.  डार्क वेब वर सहजासहजी कोणालाही प्रवेश करता येत नाही यासाठी एका विशिष्ट ब्राऊझरची गरज लागते. त्याला  ‘टॉर ब्राऊजर’  म्हणतात. 

टॉर ब्राउझरच्या सुरक्षेसाठी ओनियन राऊटिंग ही यंत्रणा असते. त्यातून तुमचा आयपी ॲड्रेस कोणालाही समजत नाही.  डार्क वेब वरील सर्व वेबसाइटचे स्वतंत्र डोमेन नेम असते. या डार्कवेबवरील वेबसाईट हॅकही होत नाहीत.

इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर आपण  चार टक्के करतो हे सरफेस वेब म्हणून ओळखले जाते. त्याच वेळी, उर्वरित 96 टक्के इंटरनेट डीप वेब आणि डार्क वेब आहे. या डार्क वेबवर सामान्यपणे प्रवेश करता येत नाही. यासाठी तुमचा IP ॲड्रेस महत्त्वाचा असतो. ज्यांना डार्कवेबवर प्रवेश हवा असेल त्यांना हा IP ॲड्रेस बदलावा लागतो.  

डार्क वेबवर ज्या घडामोडी चालतात त्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. अगदी मानवी तस्करी, ड्रग्जची तस्करी, सरकारी संरक्षण गुपिते हॅक करणे, मुलांची तस्करी, शस्त्र खरेदी आणि अशा अनेक घातक गोष्टी या डार्कवेब मार्फत चालतात. सायनाइडसारखे विष डार्क वेब मार्केटमध्ये विकले जाते. डार्कवेबवर क्रेडिट कार्ड क्रमांक, फार काय एखाद्याची संगणक प्रणाली हॅक करता येतील अशी सॉफ्टवेअर देखील खरेदी करता येतात.   (What is the Dark web?)

====

हे देखील वाचा – स्वत: ची बेवसाइट तयार करताना ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा

====

डार्क वेबवर किती वेबसाइट्स आहेत याचा शोध घेणेही खूप कठिण आणि किचकट काम आहे. याद्वारे होणाऱ्या व्यवहारात आत्ता क्रिप्टोकरन्सीचा वापर होतो. ही व्यवहारांची साखळी इतकी गुप्त असते की, ती कधीही ओपन करता येत नाही. डार्क वेबवरील वेबसाइट्सची डोमेन नावे अतिशय सुरक्षित आणि एनक्रिप्टेड असतात. 

सामान्यांनी मात्र चुकूनही या डार्क वेबमध्ये प्रवेश करू नये कारण बहुधा सर्वच देशाच्या गुप्तचर संघटनांची या डार्कवेबवर नजर असते. याशिवाय अनेक प्रकारचे व्हायरसही यात असतात. त्यामुळे एखाद्या नवख्याने त्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा सर्व डाटा करप्ट होऊ शकतो, तर तांत्रिक ज्ञानाचा अभाव इथे नवख्याला मोठ्या गुन्हेगारी सापळ्यात अडकवू शकतात.   (What is the Dark web?)

असे असले तरी गोपनीय माहितीच्या देवाणघेवाणीसाठी डार्कवेबला विश्वासनीय मानले जाते. त्यामुळे काही पत्रकार आणि गुप्तचर यंत्राणा याचा वापर करतात. डार्क वेबमध्ये जे उद्योग चालतात त्यांना टॉक मार्केट म्हणतात. या डार्कवेबच्या या अपकिर्तीमुळे भारतामध्ये डार्क वेबला भेट देणे हे अवैध आहे. त्यामुळे डार्क वेब या शब्दाची माहिती ठेवावी…पण त्यात उतरु नये…कारण ही एक काळी खोल विहिर आहे….त्यात एकदा उतरलं तर त्याचा अंत मात्र नाही…पण आपला अंत ठरलेला असतो.

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.