जगातील सर्वात विचित्र गोष्टी कुठे होत असतील तर चीन देशामध्ये. अशीच चीनची एक घटना उघडकीस आली आहे. या चीनमध्ये गाढवांपासून औषधे तयार कऱण्यात येतात. त्यासाठी चीन दरवर्षी थोडीथोडकी नव्हे तर 60 लाख गाढवांची कत्तल करत आहे. या गाढवांच्या कातडीपासून चीनमध्ये एक पारंपारिक औषध तयार केले जाते. त्याची मागणी एवढी आहे की, चीनमधील गाढवांची संख्या त्यामुळे कमी होऊ लागली आहे. (China)
आता चीन या औषधांना तयार करण्यासाठी आफ्रिकन देशांमधून गाढवांची आयात करु लागला आहे. शिवाय पाकिस्तानमधील गाढवांनाही चीनमुळे मागणी वाढली आहे. ही मागणीही एवढी आहे की, पाकिस्तान आणि आफ्रिकन देशांमधील गाढवांना सोन्याचा भाव मिळू लागला आहे. मात्र या सर्वांवर जगभरातील प्राणीमित्र संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. आजही अनेक देशांमध्ये गाढवांचा वापर शेती आणि डोंगर-द-यांमधील वाहतुकीसाठी कऱण्यात येतो. पण चीनमध्ये या गाढवांना मागणी वाढल्यामुळे आणि त्यांचे चांगले पैसे येत असल्यामुळे गाढवांना विकण्यात येत आहे. चीनमध्ये या गाढवांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मारण्यात येत आहे की, भविष्यात गाढवं ही नामशेष होण्याची भीती आहे. (International News)
चीनमध्ये दरवर्षी लाखांमध्ये गाढवांची कत्तल करण्यात येत आहे. याबाबत एका ब्रिटीश प्राणीमित्र संस्थेनं अभ्यास केला. द डोंकी सँक्चुअरी या ब्रिटीश संस्थेनं गेली काही वर्ष चीनमध्ये होत असलेल्या गाढवांच्या कत्तलीबाबत अभ्यास केला, यातून या संस्थेचा जो अहवाल प्रसिद्ध झाला, तो धक्कादायक आहे. या अहवालानुसार वर्षभरात चीन 60 लाख गाढवांची कत्तल करतो. चीन या गाढवांच्या कातडीपासून आणि त्यातील काही अवयावांपासून औषधं तयार करतो. गाढवांच्या कातडीचा वापर .एजियाओ या चिनी औषधासाठी होतो गाढवाच्या कातडीतून काढलेल्या कोलेजनपासून पारंपारिक चिनी औषधे तयार होतात. (China)
एजियाओ याला स्थानिक चिनी भाषेत ‘कोला कोरी असिनी’ किंवा ‘गाढवाच्या चामड्याचा गोंद’ असेही म्हणतात. पारंपारिक चिनी औषधांमध्ये वापरण्यात येणारे हे प्रमुख घटक म्हणून ओळखले जाते. गाढवाच्या कातडीतून काढलेल्या कोलेजनपासून एजियाओ तयार केले जाते. 2013 ते 2016 दरम्यान, एजियाओचे वार्षिक उत्पादन 3200 टनांवरून 5600 टनांपर्यंत वाढले. 2021 पर्यंत एजियाओचे उत्पादन 160 टक्क्यांनी वाढले. अर्थात यातच गाढवांची कत्तल चिनमध्ये किती वाढली याचा अंदाज लावण्यात येतोय. अशीच एजियाओची मागणी वाढली तर 2027 पर्यंत हे प्रमाण 200 टक्क्यांनी वाढणार आहे. चिनमधील औषधी कंपन्यांच्या अंदाजानुसार एजियाओची मागणी ही दरवर्षी 100 टक्यांहून अधिक वेगानं वाढणार आहे. त्यामुळे या आकडेवाडीची पूर्तता करण्यासाठी किमान 5.9 दशलक्ष गाढवांच्या कातड्याची आवश्यकता लागणार आहे. (International News)
या सर्वांमुळे चीननं अनेक देशांमधून गाढवांची आयात कऱण्यास सुरुवात केली आहे. या गाढवांना चीन मधून चांगली किंमत देण्यात येत असल्यामुळे आफ्रिकन देशांमधून मोठ्या प्रमाणात गाढवे चीनला विकण्यात येत आहेत. त्यापाठोपाठ पाकिस्तानमधूनही गाढवं चीनला पाठवण्यात येतात. केनिया या देशामधील गाढवेही चीनला पाठवण्यात येतात. मुख्य म्हणजे, चीन ज्या देशांकडून गाढवांची खरेदी करतो, त्याच देशात त्यांना मारण्यासाठी कत्तलखाना उभारला जातो. इथे गाढवांची कत्तल करुन त्यांची कातडी काढली जाते, आणि आवश्यक ते अवयव काढून चीनला पाठवले जातात. हे व्यापारासाठी सुलभ होते. मात्र ज्या देशात हे कत्तलखाने उभे राहिले आहेत, तेथील जनजीवनावर याचा मोठा परिणाम झाला आहे. मारलेल्या गाढवांची योग्यप्रमाणे विल्हेवाट न लावल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे प्रमाण आणि त्यापाठोपाठ रोगराईचे प्रमाण वाढले आहे. (China)
=========
हे ही वाचा :
Tara Bhawalkar : मराठी लोकसाहित्य आणि स्त्रीवादी साहित्य क्षेत्रातील संशोधक- डॉ. तारा भवाळकर
==========
या सर्वांचा द डोंकी सँक्चुअरी या ब्रिटीश संस्थेनं अभ्यास केला. या अभ्यासातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. चीनने अनेक गरीब आफ्रिकन देशांमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात गाढवं खरेदी करुन त्यांची कत्तल केली आहे की, या देशातील दळणवळण व्यवस्था ठप्प होण्याची भीती आहे. केनिया देशामध्ये चीनमधील अनेक कत्तलखाने असून त्या भागात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली आहे. अशीच परिस्थिती पाकिस्तानमध्येही आहे. मात्र चीनमध्ये या गाढवांवर 8.6 अब्ज डॉलर्सचा उद्योग अवलंबून आहे. भविष्यात त्यात आणखी वाढ होणार आहे, त्यामुळे चीन अधिकाधिक गाढवांची आयात करत आहे. आफ्रिकन युनियननं आता या आयातीवर बंदी घातली आहे. मात्र या बंदीमुळे फारसा फरक पडला नाही, आजही आफ्रिकन देशांमधून मोठ्या प्रमाणत गाढवांची कातडी चीनमध्ये पाठवली जात आहे. हे सर्व योग्यवेळी थांबलं नाही तर गाढवंच नामशेष होतील, अशी भीती ब्रिटीश संस्थेच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics