Home » हापूसपेक्षाही लोकप्रिय आहे आंब्याची ‘ही’ जात! वाचाल तर थक्क व्हाल

हापूसपेक्षाही लोकप्रिय आहे आंब्याची ‘ही’ जात! वाचाल तर थक्क व्हाल

by Team Gajawaja
0 comment
Carabao Mango
Share

फेब्रुवारी संपत आला की, चाहूल लागते ती आंब्याची. यावर्षीची पहिली हापूस आंब्याची पेटी बाजारात दाखल झालीसुद्धा! पुण्यामध्ये यावर्षीच्या पहिल्या आंब्याच्या पेटीचा लिलाव करण्यात आला. रत्नागिरी हापूसच्या या पेटीला तब्बल रु. ३१००० भाव मिळाला. या लिलावाची सुरुवात ५००० रुपयांपासून करण्यात आली होती. गेल्या ५० वर्षात आंब्याच्या पेटीला मिळालेला हा सर्वाधिक भाव असल्याचा दावा करण्यात येतोय. असो. 

सर्वसामान्य माणसं मार्चच्या मध्यानंतरच आंबा खरेदी करतात. यामध्येही हापूस श्रेष्ठ की पायरी, देवगड हापूस चांगला की रत्नागिरी हापूस, याच्याही चर्चा रंगतात. तर, सर्वांचा जीव की प्राण असणारा हापूस आंबा (मग तो रत्नागिरी असो किंवा देवगड हापूस) जगामधला सर्वात गोड आंबा नाही, असं सांगितलं तर?  

विश्वास ठेवा अथवा ठेवू नका पण, पण हापूस आंब्याहूनही गोड असणारी आंब्याची जात या पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे. तिचं नाव आहे ‘काराबाओ आंबा (Carabao Mango)’! थांबा थांबा, लगेच गुगल करू नका. या लेखात या आंब्याच्या जातीची सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि ती ही पुराव्यांसकट!

‘काराबाओ आंबा (Carabao Mango) ही आंब्याची जात फिलीपिन्समध्ये आढळून येते. या आंब्याला फिलीपिन्स आंबा किंवा मनिला आंबा असेही म्हटले जाते. फिलीपिन्समध्येही भारताप्रमाणे आंब्याच्या अनेक जातींची लागवड केली जाते. भारतात जसं हापूस, पायरी, रायवळ, इ. आंब्याच्या अनेक जाती असूनही हापूसलाच विशेष मागणी असते. त्याचप्रमाणे फिलीपिन्समध्ये ‘काराबाओ आंबा’ या जातीला सर्वात जास्त मागणी असते. त्यामुळे तिथे याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. 

‘काराबाओ आंबा’ त्याच्या गोडव्यामुळे केवळ फिलीपिन्समध्येच नाही तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रिय आहे.  या आंब्याला ‘काराबाओ’ हे नवा फिलीपिन्सचा राष्ट्रीय प्राणी ‘काराबाओ’च्या  नावावरून देण्यात आले आहे. आंब्याच्या एकूण जागतिक उत्पादनामध्ये काराबाओ आंब्याचा ३.५% वाटा आहे

‘काराबाओ आंबा (Carabao Mango)’ फिलीपिन्सचे राष्ट्रीय फळ आहे इतकंच नाही तर, तो त्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. फिलीपिन्सच्या कृषी विभागाने आंब्याचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी आंब्याच्या पोस्टहार्वेस्ट प्रक्रियेसाठी विशेष निधी घोषित केला आहे. यामध्ये हिट वॉटर ट्रीटमेंट आणि vapour heat treatment यासारख्या प्रक्रियांचा समावेश आहे. यामुळे निर्यातीच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होत आहेत. सीझनमध्ये या आंब्याला जगभरातून खास करून आशिया, अमेरिका आणि युरोपियन बाजारपेठेतून मोठी मागणी असते. एकूण निर्यातीच्या जवळपास ९०% निर्यात  जपान आणि हाँगकाँग मध्ये केली जाते.  

चीन, पाकिस्तान, ब्राझील, मेक्सिको आणि भारतानंतर फिलीपिन्स जगातील सर्वोच्च आंबा उत्पादक देश आहे. आंबा उत्पादक देशांमध्ये फिलीपिन्स सहाव्या क्रमांकावर आहे. फिलीपिन्समधील जवळपास २५ लाख शेतकरी काराबाओ आंब्याचं पीक घेतात. यामध्ये ७३% शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत. फिलीपिन्सच्या जीडीपीमध्ये काराबाओ आंब्याचं फार मोठे योगदान आहे. 

पिकलेला काराबाओ आंबा चमकदार पिवळ्या रंगाचा असतो आणि त्याचा सुंगध सर्वदूर दरवरळतो. भारतीय आंब्याच्या विरुद्ध असणारी ही जात पॉलिएम्ब्रियोनिक प्रकारची असते. काराबाओ आंब्याच्या १४ वेगवेगळ्या जाती आहेत. 

====

हे देखील वाचा: ‘या’ नैसर्गिक गोष्टीच्या साहाय्याने करा बद्धकोष्टता आणि अपचनावर मात!

====

आपल्याकडे जसं आंब्याचे साठवणीचे पदार्थ केले जातात, तसेच फिलीपिन्समध्येही काराबाओ आंब्याचे साठवणीचे विविध पदार्थ केले जातात. यामध्ये प्रामुख्याने फ्रोजन मँगो, मँगो प्युरी, मँगो ज्यूस, वाळलेला आंबा, इ. विविध प्रकारच्या पदार्थांचे  उत्पादन केले जाते. हे पदार्थ फिलीपिन्समध्ये बाजारात बारमाही उपलब्ध असतात. आशियापासून युरोपपर्यंत सर्वच देशातील पर्यटक फिलीपिन्सला गेल्यावर आवर्जून ‘काराबाओ आंबा’ अथवा त्यापासून बनविण्यात आलेले विविध पदार्थ खरेदी करतात.. 

काराबाओ आंबा (Carabao Mango) साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस बाजारात दाखल होतो. म्हणजे आपल्याकडचा आंब्याचा सिझन संपताना काराबाओ आंब्याचा सिझन सुरु होतो. जुलैच्या पूर्वार्धापर्यंत हा आंबा बाजारात मिळतो. काराबाओ आंब्याचा आकार किडनीसारखा असतो. जवळपास ३.५ इंचाच्या आसपास व्यास असणाऱ्या या आंब्याची लांबी ५ इंचाच्या आसपास असते. 

====

हे देखील वाचा: Canada declares National emergency : भारतामधील कृषी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या कॅनडामध्येच राष्ट्रीय आणीबाणी घोषित!

====

काराबाओ आंबा (Carabao Mango) जगातील सर्वात गोड फळ आहे अशी मान्यता जगभरातील शेतीतज्ज्ञांनी दिली आहे. सन १९९५ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये ‘काराबाओ आंबा’ जगातील सर्वात गोड आंबा म्हणून नोंदविण्यात आला होता. 

काय मग मिळाली का सविस्तर माहिती, ती ही पुराव्यासकट! आता हा आंबा भारतात कुठे उपलब्ध असतो किंवा ऑनलाईन मागवता येतो का, या माहितीसाठी मात्र तुम्हाला गुगलचीच मदत घ्यावी लागेल. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.