Home » BODMAS चा नियम करतोय भल्याभल्यांची दांडी गुल! नक्की काय आहे हा नियम?

BODMAS चा नियम करतोय भल्याभल्यांची दांडी गुल! नक्की काय आहे हा नियम?

by Team Gajawaja
0 comment
BODMAS
Share

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे शाळा बंद झाल्या. जवळपास पावणे दोन वर्ष शाळा बंद होत्या. त्यावेळी मुलांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान झाले. २०२२ च्या सुरुवातीला अचानक शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा तर सुरु झाल्या पण शिकवलेलं सगळंच मुलांच्या डोक्यावरून जाऊ लागलं. पण आता परीक्षा जवळ आल्यामुळे मुलांना अभ्यास तर करावाच लागणार आहे. 

गणिताच्या नावाने आधीच बोटे मोडणाऱ्या मुलांची मात्र आता खरी फजिती झाली आहे. त्यात BODMAS पद्धतीची (मराठीमध्ये ‘कंचेभागूबेव’) गणितं येतात तेव्हा भल्या भल्यांचा गोंधळ होतो. खरंतर BODMAS एक साधा, सरळ गणिती प्रकार आहे. या पद्धतीमुळे मुलांना गणित विषय समजायला सोपा जातो. BODMAS चा नियम नक्की आहे तरी काय? त्याची पद्धत आहे तरी कशी? 

BODMAS चा नियम म्हणजे गणितातील पदावली पद्धतीचा वापर करून गणिते सोडवणे. पदावलीच्या मदतीने कमी वेळेत जास्त गणिते सोडवून होतात. या पदावलीलाच मराठीमध्ये ‘कंचेभागूबेव’ पद्धत असे म्हटले जाते. 

BODMAS चा नियम अनेकांना कठीण वाटतो. या पद्धतीची गणिते सोडवताना आजही अगदी उच्चशिक्षित तरुणांचीही दांडी गुल होते. याचे कारण  म्हणजे या पद्धतीबद्दल पुरेशी माहिती नसणे. त्यामुळे आपण आधी ‘BODMAS’ म्हणजे नेमकं काय, हे समजून घेऊया. 

BODMAS – Brackets, Orders (powers/indices or roots), D-Division, M-Multiplication, A-Addition, S-Subtraction 

‘कंचेभागूबेव’ – कंसाचे/चा/ची  (वर्ग किंवा वर्गमूळ), भागाकार,  गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी

====

हे देखील वाचा: Canada declares National emergency : भारतामधील कृषी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या कॅनडामध्येच राष्ट्रीय आणीबाणी घोषित!
====

BODMAS (कंचेभागुबेव) पद्धतीचा वापर नेमका कुठे आणि कशासाठी केला जातो? 

ज्या एखाद्या गणिताच्या उदाहरणात दोनपेक्षा जास्त क्रिया असतील त्याठिकाणी आपण BODMAS चा वापर करून गणिताची उदाहरणे सहज सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. थोडक्यात ज्या गणितामध्ये बेरीज, वजाबाकी आणि गुणाकाराच्या क्रिया एकाच वेळी सोडवायच्या असतील त्यावेळेस आपल्याला या पद्धतीचा वापर करावा लागतो.

या पद्धतीचा वापर करून अवघडातील अवघड प्रश्न पण सोप्या पद्धतीने सोडवता येतात. या पद्धतीचा वापर करून आपण कशा पद्धतीने उदाहरणे सोडवू शकता हे आपण उदाहरणाच्या मदतीने पाहणार आहोत. आपण जर पर्यायी उत्तरे सोडवताना या पद्धतीचा वापर केला, तर कमी वेळेत आपण  प्रश्न सोडवू शकतो. 

६० + ३० × २० ÷ २५ – ७० = ?

= ६० + [(३० × २०) ÷ २५] – ७० 

= [६० + (६०० ÷ २५)] – ७० 

= (६० + २४) – ७० 

= ८४ – ७०

= १४ 

या उत्तराला आपण एका एका पाऊलाने समजून घेऊयात 

१. दिलेल्या गणिताला BODMAS च्या नियमानुसार मांडून घेतलं – ६० + [(३० × २०) ÷ २५] – ७०

२. सर्वात आधी साधा  कौस () सोडवून घेतला – [६० + (६०० ÷ २५)] – ७० 

३. त्यानंतर स्क्वेअर कंस [] सोडवला – (६० + २४) – ७० 

४. अंतिम उत्तर –  ८४ – ७० = १४

====
हे देखील वाचा: हापूसपेक्षाही लोकप्रिय आहे आंब्याची ‘ही’ जात! वाचाल तर थक्क व्हाल
====

अशाप्रकारे अवघड गणिती क्रियांना आपण सहज सोप्या पद्दतीने सोडवू शकता. आपण दुसरी उदाहरणे पण  BODMAS (कंचेभागुबेव) या पद्धतीने सहज सोडवू शकता. त्यासाठी आपल्याला या पद्धतीचा गणिती क्रम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण एक  क्रिया जरी इकडची तिकडे झाली तरी शेवटी येणारे उत्तर चुकू शकते. 

BODMAS पद्धतीने आपण जास्तीत जास्त गणिती क्रियांचा सराव करायला हवा. जी गणिते सोडवायला किचकट आणि अवघड आहेत अशांचा सराव जर आपण जास्तीत जास्त वेळा केला, तर परीक्षेच्या वेळेला कमी वेळेत गणिते सोडवता येऊ शकतील. त्यामुळे आपल्या डोक्यातील गणिताच्या भीतीचे भूत उतरू शकतं. चला तर मग पुस्तक घेऊन बसुयात, BODMAS (कंचेभागुबेव) पद्धतीची गणिते सोडायला! 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.