संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण किंवा दिवस साजरा केला जातो. वर्षातला पहिला सण म्हणून मकरसंक्रांतीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतो. मकरसंक्राती अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. या वर्षी भोगी १३ तारखेला मंगळवारी आहे. या सणाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण आपल्या घरातील वयस्कर लोकांच्या तोंडून कायम ऐकत आलो आहे. मात्र भोगी या सणाचे महत्त्व नक्की काय आहे?, या शब्दाचा अर्थ नक्की काय आहे? भोगी सणांचं महत्त्व आणि माहिती जाणून घेऊ या. (Bhogi)
भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा करण्यात येतो. भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे, असे कळते. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणार. भोगी साजरी करण्याची पद्धत भोगीचा दिवस मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी येतो. हा दिवस उपभोग आणि उपभोगाचे प्रतीक मानला जातो. भोगीमागे धार्मिक श्रद्धा आहे आणि ती योग्य पद्धतीने साजरी केल्याने जीवनात सकारात्मकता येते. त्यामुळे या सणाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. भोगीला भोगीची भाजी बनवली जाते. यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात. भोगीच्या भाजीसोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी खाण्याची प्रथा आहे. (Todays Marathi Headline)

मकर संक्रांतीपासून थंडीचा जोर वाढतो. तेव्हा भोगी आणि मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो आणि या भाजीचा आपल्याला हिवाळ्यातही फायदा होतो. कारण हिवाळ्यातील या भाज्या एकत्र खाल्ल्यास रोगराईपासून आपले संरक्षण होते. त्यामुळे नात्यांतील गोडव्यासह, आरोग्यही चांगले राहावे यासाठी या भाजीची महत्त्व आणि या सणाचा महत्त्व आहे. असे सांगितले जाते की, भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवले जाते. त्यांना स्मरूनच पूजा करणं शुभ मानले जाते. इंद्रदेवाकडे पृथ्वीवर अमाप पिक पिकावीत अशी या दिवशी प्रार्थना केली जाते. पिकं आजपर्यंत अनेकांचीच भूक भागवत आली आहेत, अनेकांना समृद्ध करत आली आहेत. हेच चक्र अविरतपणे चालत रहावं या हेतूनं भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. (Marathi News)
संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण “पोंगल” तर आसाममध्ये “भोगली बिहू” नावाने ओळखा जातो. पंजाबमध्ये “लोहिरी “, तर राजस्थानमध्ये “उत्तरावन” म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगिकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगूळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहवा अश्या शुभेच्छा दिल्या जातात. (Latest Marathi News)
काही जाणकारांच्या माहितीनुसार शास्त्रात सांगितले आहे की, भोगीच्या दिवशी केस धुवावेत. यामागचे कारण म्हणजे, आजच्या दिवशी केस धुतल्याने शरीरातील नकारात्मक शक्तींवर मात केली जाते. शिवाय शरीरात असणाऱ्या विविध रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी देखील याचा फायदा होतो. या दिवसांमध्ये शेताला नवीन बहार आलेला असतो. शेतीची कामं करून शेतकरी ठाकतो. त्यामुळे तो या दिवशी कामातून सुट्टी घेत आराम करतो. सोबतच भोगीच्या दिवशी जेवणात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी खातात. या पदार्थांमधून मिळणारी ऊर्जा आणि उष्णता शेतकऱ्यांना वर्षभर शेतात काम करण्यासाठी प्रोत्साहित करते. (Top Trending Headline)
=========
Makar Sankranti : वर्षातला पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीची माहिती आणि महत्त्व
Ekadshi : जाणून घ्या नवीन वर्षातल्या पहिल्या षटतिला एकादशीची माहिती आणि मुहूर्त
=========
अनेक ठिकाणी भोगी देण्याची देखील प्रथा आहे. भोगीच्या दिवशी खास जेवण तयार केले जाते आणि सवाष्णीला जेवायला बोलावले जाते. काही ठिकाणी या सर्व पदार्थांचा शिधा सवाष्णीच्या घरी दिला जातो. यालाच “भोगी देणे” म्हणतात. भोगी अनेक राज्यांमध्ये विविध पद्धतींनी साजरी करण्यात येते. महाराष्ट्रातच भोगीचा सण साजरा करण्याच्या विविध भागानुसार वेगवेगळ्या पद्धती दिसतील.कोकण, मराठवाडा, विदर्भ या सर्व भागांमध्ये भोगी मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या प्रकारे साजरी होते. अगदी भोगीची भाजी करण्याची पद्धतीही वेगवेगळी आहे. (Social News)
(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
