Home » Ashadh : आषाढ तळणीच्या खास परंपरेबद्दल तुम्हाला माहित आहे का?

Ashadh : आषाढ तळणीच्या खास परंपरेबद्दल तुम्हाला माहित आहे का?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ashadh | Top Stories
Share

आपल्या भारतामध्ये नानाविध परंपरा आणि रीती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक राज्यानुसार, गावानुसार, परिसरानुसार या रीती बदलत जातात. आजच्या आधुनिक काळात तर आपल्या जुन्या परंपरा रीती जास्त कोणीही पाळताना दिसत नाही. यामागे कारणं कोणतीही असली तरी या जुन्या गोष्टी आता कालबाह्य होताना दिसत आहे. असे असले तरी आजही अनेक ठिकाणी जुन्या गोष्टी, रीती मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने पाळल्या जातात. यातलीच एक मोठी आणि महत्वाची परंपरा म्हणजे ‘आषाढाचे तळण’. अनेकांसाठी हा शब्द नवीन असला तरी ज्यांच्याकडे ही प्रथा पाळली जाते त्यांना तर या प्रथेबद्दल माहिती असेल. (Ashadh)

आषाढ महिना लागला की वेध लागतात आषाढी एकादशीचे. मात्र या एकादशीसोबतच आषाढ महिना ओळखला जातो तो, आषाढाच्या तळणासाठी किंवा आखाड तळण साठी. प्रत्येक ऋतुमध्ये त्या त्या प्रांताच्या रिती रिवाजानुसार तसे खाद्यपदार्थ बनवून खाल्ले जातात. प्रत्येक ऋतुचे एक वेगळे महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांनी देखील या ऋतुंचे महत्त्व अधोरेखितही केले आहे. ऋतुनुसारच आपला आहार असावा असे कायम आपले पूर्वजही सांगायचे. आरोग्याच्या दृष्टीने याला खूप महत्त्व दिले गेले आहे. आषाढ महिना आला की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात. आषाढ महिना सुरु झाला की, गृहिणी एकमेकींना आषाढाचे तळण झाले का?, आषाढ तळला का? असे प्रश्न सर्रास विचारताना दिसतात. मग हे आषाढ तळण नक्की आहे तरी काय? काय आहे यामागचा विचार? जाणून घेऊया. (Marathi News)

आषाढ महिना सुरु झाला की, या दिवसात जास्तीज जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात. मे महिन्यात बनवलेल्या पापड आणि कुरड्या तळून अगदी आवर्जून खाल्ले जातात. आषाढ महिन्यात सर्वच लोकं बिधास्त कोणत्याही रोकटोक शिवाय तळलेले पदार्थ खाऊ शकता. आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असे म्हणतात. खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे. अनेक ठिकाणी या खास दिवशी जावयाला घरी बोलावून चमचमीत पदार्थ खाऊ घातले जातात. तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ खाऊ घातले जातात. तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात. (Todays Marathi News)

Ashadh

आषाढ महिन्यातील पाऊस हा जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे वातावरणातील आर्द्रता तसेच थंडावा वाढलेला असतो. यासाठीच आषाढ महिन्यात आपल्या शरीरास पचनास हलके असलेल्या पदार्थाचे सेवन करणे लाभदायक मानले जाते. आषाढात पचनशक्ती कमी झाल्यामुळे स्निग्ध पदार्थाचे अधिक सेवन केले जातात. त्यामुळे आषाढात तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात. आषाढ महिना लागल्या की नवीन लग्न झालेल्या मुलींना माहेरी आणले जाते. तिला तेलकट पदार्थ करुन दिले जातात. तिची चांगली बडदास्त ठेवली जाते. याला अजून एक पद्धत देखील जोडली गेली आहे. काही ठिकाणी आषाढ महिना लागला की सासूचा किंवा काही ठिकाणी पतीचा चेहरा बघत नाही. म्हणून देखील मुली आपल्या माहेरी जातात. (Marathi Latest NEws)

आषाढ महिन्यात पाऊस जास्त पडत असल्याने नदी-तलाव ओसंडून वाहतात. अशावेळी पाणी प्रदूषित होण्याची शक्यता अधिक असते. शरीरात दूषित पाणी गेले तर आरोग्य देखील खराब होऊ शकते. दूषित पाण्यामुळे अनेक आजार देखील होऊ शकतात. अशावेळी शरीराला अंतर्गत वंगण मिळावे यासाठी तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते. पावसाळ्यात हवेत गारवा असतो त्यामुळे तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीराला उष्णता पुरवण्याचे काम होते. त्यामुळंच या काळात पदार्थ तळले जातात. मे महिन्यात केलेले वाळणवणाचे पदार्थ आषाढापासून खाण्यास सुरुवात करतात. (Top Marathi Headline)

=========

हे देखील वाचा : Health Tips: शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे? तर सेवन करा ‘हे’ पदार्थ 

==========

श्रावणात अनेक व्रत वैकल्यांमुळे हे पदार्थ खाल्ले जात येत नाही, त्यामुळे आषाढात याची कसर भरुन काढली जाते. तळणीचे पदार्थ खावून अपचन होऊ नये यासाठी मूगाची खिचडीदेखील केली जाते. त्याचबरोबर, या काळात लहान मुलांना सर्दी-खोकला होऊ नये म्हणून आलेपाक वडी खाल्ली जाते. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मंगळवारी आणि शुक्रवारी आषाढ तळला जातो आणि देवीच्या मंदिरात याचा नैवेद्य देखील दाखवला जातो. या ठिकाणी देवीला तळणीच्या पदार्थांसोबतच दही भात आणि मेथीची भाजी देखील नैवेद्य म्हणून दाखवली जाते. आपल्या मुलांसाठी येणारे वर्ष उत्तम, आरोग्यदायी राहावी याची देवीकडे प्रार्थना केली जाते. (Top Trending News)

आषाढात केले जाणारे पदार्थ
आषाढ महिन्यात गोड पुऱ्या, तिखट मिठाच्या पुऱ्या, रव्याचे लाडू, नारळाचे लाडू, भाजणीचे थालीपीठ, खारे शंकरपाळे, चकल्या, शेव, कडबोळी, कापण्या, राजगिरा लाजू, थालीपीठ, मुगाची भजी, मेथीची भाजी असे पदार्थ केले जातात. आषाढात इतके सगळे पदार्थ केल्यानंतर त्याचा नैवेद्य अन्नपूर्णा देवीला दाखवला जातो.  (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.