Home » अमेरिकेत जवळपास ५० वर्षांनंतर झाली UFO संदर्भात बैठक!

अमेरिकेत जवळपास ५० वर्षांनंतर झाली UFO संदर्भात बैठक!

by Team Gajawaja
0 comment
What is Area 51
Share

अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात… म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO… म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तू! अशा वस्तू ज्याचं मूळ बाहेरचं आहे, असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात, असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं.


अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अशा विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP, म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! (What is Area 51)


या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यंत जवळपास १४० अशा केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलट्सना विमान उडवत असताना UAV आढळून आले त्याची त्यांनी नोंद ठेवली.
अशा उडत्या गोष्टींसदर्भात कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण देता येऊ शकत नाही, अशा या गोष्टी होत्या. कुठे त्रिकोणी आकाराची वस्तू दिसली, तर कुठे गोल वस्तू उडताना दिसली अशाप्रकारच्या या सगळ्या केसेस आहेत.
विमान उडवताना विमानाला धोका उत्पन्न होऊ शकतो अथवा विमान उडवताना एखादी वस्तू मध्ये आली आणि त्यामुळे विमानाच्या मार्गात अडथळा आल्यास त्याची सुद्धा काळजी घ्यावी लागते आणि म्हणून वारंवार जर अशा गोष्टी घडत असतील, तर ते संबंधित एजेंसीला कळवणं आवश्यक आहे, ही त्यामागची भावना आहे. (What is Area 51)

=====

हे देखील वाचा – युक्रेनमध्ये चर्चा आहे या दोन लढवय्या महिलांची… 

=====


याचं रीतसर व्हिडिओ फुटेज पेंटयागॉनला आधी सादर करण्यात आलं होतं आणि त्याच संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली होती. अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अशा UFO किंवा काही वस्तू आढळल्यास पायलट्सनी त्वरित त्या घटना संरक्षण खात्याला किंवा संबंधित ऑथॉरिटीला कळवाव्यात जेणेकरून त्या संदर्भात संरक्षण विभागाकडे त्याची नोंद ठेवली जाईल. या संदर्भात हे दिशा निर्देश जारी करण्यात आले आहेत. संबंधित बैठक ही १७ मे २०२२ ला पार पडली. आंद्रे कार्सन या इंडियानाच्या हाऊस रिप्रेसेंटेटिव्हजनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. बैठकीआधी कार्सन यांनी ट्विट करत सांगितलं होतं की, अमेरिकन काँग्रेसमध्ये UFO संदर्भात अशी बैठक मागच्या ५० वर्षात झाली नव्हती. हे समीकरण आता बदलेल… या UAP मुळे काही धोका उत्पन्न होऊ शकतो का, तसंच या आकाशात उडणाऱ्या वस्तूंमुळे अमेरिकेच्या सुरक्षेला काही धोका उत्पन्न होऊ शकतो का, त्यामुळे काही नुकसान होऊ शकतं का, हा महत्वाचा मुद्दा यावेळी चर्चिला गेला. (What is Area 51)


अमेरिकेमध्ये नेवाडा प्रांतामद्धे ‘एरिया ५१’ नावाचा भाग आहे म्हणजे असं नाव त्याला दिलं गेलं आहे. तिथे एलियन्स, त्यानंतर समस्त UFO प्रकरणावर संशोधन चालतं… लोकांनी या एरियामध्ये जायला प्रशासनाने बंदी घातली आहे. अमेरिकेमध्ये अशा अनेक कम्युयनीटीजच आहेत ज्यांना वाटत आहे की, या एरिया ५१ मध्ये नक्की काहीतरी रहस्यमय संशोधन चालतं आणि त्याची माहिती अमेरिकन सरकारला सामान्य नागरिकांपासून दडवायची आहे किंवा सांगायची नाही. (What is Area 51)


अमेरिकेत अनेक कॉन्सपिरसी थीयरीज मानणाऱ्या या अनेक गटांची “या विश्वात आपण एकटे नाहीत, या विश्वात एलियन्स आहेतच”, अशी ठाम समजूत आहे.
अमेरिकेच्या इतिहासात मागच्या ५० वर्षात हे पाहिल्यादाच घडत आहे की, अमेरिकन प्रशासन पुढाकार घेऊन UFO संदर्भात बैठक घेत आहे, चौकशी करत आहे. मग प्रश्न उभा राहतो की, अमेरिकन प्रशासनाला खरंच याबद्दल काही ठोस स्वरूपात पुरावे मिळाले आहेत का? आणि मग असं असेल तर अमेरिकन प्रशासन यावर काय भूमिका घेईल? अनेक प्रश्न आहेत पण येणाऱ्या काळात याबद्दल खुलासे होतीलच. तोपर्यंत आपण एलियन्सबद्दलच्या सुरस आणि चुरस कथा ऐकत राहायचं.

– निखिल कासखेडीकर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.