प्रत्येकाला वाटते आपण दीर्घायुष्य जगावे. कारण वयाची शंभरी गाठल्याचा आनंद हा प्रत्येकालाच होतो. परंतु ऐवढी वर्ष अगदी ठणठणीत आणि उत्तम आयुष्य जगण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. कारण वयाच्या चाळीशीनंतर विविध व्याधी सुरु होऊ लागतात. मात्र तुम्ही योग्य वेळीच उपचार घेतलात तर नक्कीच वयाची शंभरी गाठू शकता. अशातच अशी काही ठिकाण आहेत तेथील लोक दीर्घायुष्यी होतातच. त्याचसोबत वयाचे शंभरी गाठण्यामागील सीक्रेट काय आहे त्याबद्दल पण आपण जाणून घेऊयात.(Age secrete)
ब्लू झोन काय आहे?
ब्लू झोन हे कोणते वैज्ञानिक नाव नाही आहे. परंतु ते काही खास भौगोलिक क्षेत्रांना दिले गेलेले एक नाव आहे. म्हणजे समजा ब्लू झोनमध्ये जगातील अशी काही ठिकाण आहेत तेथील राहणारी लोक ही सामान्य लोकांच्या तुलनेत अधिक काळ आयुष्य जगतात. या लोकांना जुनी दुखणी सुद्धा कमी त्रास देतात. ते दीर्घायुष्यी होतात. येथे राहणारी बहुतांश लोक ही वयाची शंभरी नक्कीच गाठतात. डब्लूएचओ यांच्या मते, २०१९ मध्ये जगभरातील एव्हरेज लाइफ एक्सपायरी ७३.४ वर्ष होती.
हे देखील वाचा- विचित्र गाव! जिथे जन्मल्यानंतर अंध होतात माणसांपासून ते जनावरापर्यंतची मुलं
ब्लू झोन असे का म्हटले गेले आहे?
ब्लू झोनचा वापर पहिल्यांदाच लेखक डॅन ब्युटनर यांनी केला होता. जो जगातील अशा ठिकाणांवर अभ्यास करत होते जेथए लोक असाधारण रुपात दीर्घकाळ आयुष्य जगतात. या ठिकाणांनाच ब्लू झोन असे म्हटले गेले, कारण जेव्हा ब्यूटनर यांन या ठिकाणांचा शोध घेतला.(Age secrete)
ब्लू झोनमध्ये कोणती ठिकाणं येतात?
ब्यूटनर यांनी आपले पुस्तक द ब्लू झोन मध्ये ५ ठिकाणांचा उल्लेख केला आहे.
-इकारिया (Icaria,Greece)
इकारिया हे ग्रीसमधील एक आयलँन्ड आहे. येथील लोक ऑलिव्ह ऑइल, वाइन आणि भाज्यांचा आपल्या आहारात भरपूर प्रमाणात वापर करतात. त्यांच्या डाएमध्ये सुद्धा या गोष्टींचा समावेश असतो.
-ऑग्लिआस्ट्रा, सार्डिनिया (Ogliastra,Sardinia)
येथे जगातील सर्वाधिक वृद्ध व्यक्ती राहाता. ते डोंगराळ भागात राहतात पण साधारपणे ते शेतात काम करतात. त्याचसोबत खुप रेड वाइन ही पितात.
-ओकिनावा (Okinawa, Japan)
ओकिनावा येथे जगातील सर्वाधिक वृद्ध महिला राहातात. त्या बहुतांश प्रमाणात सोयापासून बनलेले पदार्थ खातात. तसेच ताई ची चा अभ्यास करतात.
-निकोया पेनिनसुला (Nicoya Peninsula, Costa Rica)
येथे राहणारी लोक वृद्ध वयात सुद्धा खुप काम करता. निकोयन आहारात बीन्स आणि कॉर्नचा समावेश असतो.
-लोमा लिंडा (Loma linda, California)
येथे खासकरुन सेवन्थ डे एडवेंटिस्ट समूहाचे लोक दीर्घायुष्यी आहेत. तसेच ही लोक शाकाहारी आहेत.
दरम्यान, ब्लू झोन मधील राहणाऱ्या लोकांचे वय ९०-१०० वर्षादरम्यान असते. एका शोधानुसार दीर्घायुष्यासाठी अनुवांशिकी केवळ २०-३० टक्के जबाबदार आहेत. त्यासाठी आहार आणि जीवन शैली सुद्धा तुमच्या दीर्घायुष्यासाठी मोठी भुमिका निभावतात.