उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या बातमीमुळे सामान्यांपासून नेत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. २८ जानेवारी रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास अजित पवारांच्या चार्टर्ड प्लेनला भीषण अपघात झाला. त्यावेळी अजित पवार मुंबईहून बारामतीला जात होते. बारामतीत लँडिंग करताना विमान अपघातग्रस्त झाले. त्यांच्या निधनामुळे एक कर्तव्यतत्पर, वक्तशीर, दिलखुलास व्यक्तीमत्त्व हरपल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. अजित पवारांसोबतच विमानातील इतर पाच जणांचाही दुर्दैवी अंत झाला. (Plane crash)
पण या अपघाताने पुन्हा अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अजूनही अहमदाबाद विमान दुर्घटनेमधून आपण बाहेर पडत नव्हतो, तोवर हा मोठा विमान अपघात होणे हे केवळ दुर्दैव आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान काही सेकंदांपूर्वीच सुरक्षित लँडिंगच्या मार्गावर असल्याचे मानले जात होते, परंतु क्षणार्धात ते एका भयानक अपघातात रूपांतरित झाले. धावपट्टी दिसत असताना आणि लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतरही, शेवटच्या क्षणी असे काय घडले ज्यामुळे विमानाचे संतुलन बिघडले आणि अपघात झाला. याबात तपास यंत्रणा तपास करत आहेत. मात्र अनेकांना विमान क्रॅश होणे म्हणजे काय? याबाबत माहिती नसेल. याचीच माहिती आज आपण करून घेऊ. (Marathi)
आपण अनेकदा विमान अपघात लँडिंग आणि टेकऑफच्या वेळी जास्त होतात याबद्दल ऐकले असेल. हा उड्डाणाचा सर्वात महत्त्वाचा पिरेड असतो. कारण या काळात पायलटकडे येणाऱ्या परिस्थितीला हाताळण्यासाठी फारच कमी वेळ असतो. त्याला विचार करायला देखील वेळ नसतो. या काळात विमान कमी उंचीवर असते आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी फारच कमी वेळ असतो. विमान अपघातासाठी अनेक तांत्रिक आणि मानवी घटक जबाबदार आहेत. जसे की, विमानातील इंजिन, सेन्सर किंवा कंट्रोल सिस्टीममध्ये अचानक बिघाड झाल्यास अपघाताची शक्यता निर्माण होते. (Todays Marathi Headline)

लँडिंगच्यावेळी विमानाला योग्य वेग, योग्य दिशेत आणि धावपट्टीच्या योग्य स्थितीत उतरवावे लागते. पाऊस, धुके, जोरदार वारा आणि रात्रीची वेळ पायलटसाठी आव्हान वाढवते. एका छोट्याशा बिघाडामुळे विमान धावपट्टीवरून बाहेर पडू शकते. कधीकधी ऑटो-पायलट मोड किंवा इतर नेव्हिगेशन सिस्टममधील एक छोटीशी चूक देखील विमानाला असंतुलित बनवते. (Top Marathi News)
नियमित देखभाल असताना देखील विमानातील काही त्रुटी उड्डाणादरम्यान पायलटच्या समोर येतात. वैमानिक, एअर ट्रॅफिक कंट्रोल किंवा ग्राउंड स्टाफकडून झालेली लहानातली लहान चूकही मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते. चुकीचा निर्णय किंवा कम्युनिकेशनमध्ये राहिलेला गॅप देखील मोठा धोका निर्माण करू शकतो. शिवाय नैसर्गिक आव्हानं देखील असतात जसे की, जोरदार वादळ, मुसळधार पाऊस, दाट धुके किंवा वीज कोसळणे अशा परिस्थितीत विमान नियंत्रित करणे सामान्य वेळेपेक्षा अधिकच कठीण होऊन बसते. अनेक वेळा हवामान अचानक बदलल्याने देखील अपघात होतात. उड्डाण घेताना किंवा लँडिंग करताना पक्षी इंजिनमध्ये शिरल्यास इंजिन बंद पडू शकते. अशा घटना मोठ्या शहरांजवळ जास्त आढळतात. (Latest Marathi Headline)
पावसाळ्यामध्ये धावपट्टीवर जास्त पाणी साचणे, तांत्रिक वाहन धावपट्टीवर उभे असणे किंवा इतर अडथळे असल्यास देखील लँडिंग धोकादायक ठरू शकते. इंधनाची गळती, इंधनाबद्दल चुकीचा अंदाज किंवा त्याचे चुकीचे मोजमाप, दूषित इंधन यांमुळे देखील विमानाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. विमान हा उड्डाणादरम्यान किंवा लेंडिंग करताना दोन्ही वेळी क्रॅश होऊ शकते. विमानाची वेळेवर तपासणी न होणे किंवा सुट्या भागांची चुकीची बसवणूक अपघाताला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे एअरलाईन्सवर कडक नियम लागू असतात. (Top Stories)
========
Ajit Pawar : राजकारणातला ‘दादा’ माणूस गेला !
========
आता अनेकदा आपण विमानाची इमर्जन्सी लँडिंग किंवा क्रॅश लँडिंग केल्याच्या बातम्या ऐकतो किंवा वाचतो. मात्र या दोन्ही लँडिंग एकच असल्याचे बऱ्याच लोकांना वाटते. मात्र यात मोठा फरक आहे. हा फरक काय आहे जाणून घेऊया. इमर्जन्सी लँडिंग हे नियंत्रित असते. विमानात काही समस्या आली तरी वैमानिक सुरक्षितपणे विमानतळावर विमान उतरवू शकतो. यात जीवितहानीची शक्यता कमी असते. याउलट क्रॅश लँडिंग ही अनियंत्रित आणि अत्यंत धोकादायक असते. यात विमानाचा जमिनीशी होणारा संपर्क अत्यंत जोरात असतो, ज्यामुळे विमानाचे तुकडे होऊ शकतात किंवा आग लागू शकते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
