Home » चीनच सरकार करतंय तरी काय?

चीनच सरकार करतंय तरी काय?

by Team Gajawaja
0 comment
Super Soldier
Share

चीनमध्ये सध्या कोरोनानं धुमाकूळ घातला आहे. नागरिकांकडे कोरोनाच्या औषधांचा तुटवडा आहे. रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी जागाच नाही.  तर स्मशानभूमीमध्ये मृत करोना रुग्णाच्या मृतदेहाचा खच पडल्याची माहिती आहे. देशात इतकी भयावह परिस्थिती असतांना चीनचे सरकार काय करत आहे.  तर चीनच्या सरकारला या सर्वांबरोबर काही देणेघेणेच नसल्याची जाणीव होतेय.  कारण देशात कोरोना महामारीनं पुन्हा भयावह रुप धारण केलं असताना चीनी सरकार आपल्या शेजारील राष्ट्रांवर वचक निर्माण करण्याच्या योजना तयार करतेय.  शेजारील राष्ट्रांबरोबर युद्धात विजय मिळवण्यासाठी चीनमध्ये चक्क सुपर सैनिक(Super Soldier) बनविण्यात येत आहे.  तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मानवी डिएनए मध्ये बदलाव करीत आहे. अत्यंत घातकी असलेली ही जीन एडिटिंग नावाची संकल्पना वापरुन चीन सरकार सैनिक तयार करीत आहे.  

चीनमध्ये सध्या कोरोना पाठोपाठ जीन एडिटींग या प्रकाराची खूप चर्चा होत आहे. या तंत्राच्या साहाय्याने निसर्गाने निर्माण केलेल्या सृष्टी बदल घडवून आणता येतात. जीन एडिटींग या तंत्राच्या मदतीने डीएनए बदलता येतो.त्याचा वापर अनेक प्राण्यांवरही करता येतो.  त्यातून नवीन प्राण्यांची उत्पत्तीही करता येते.  चीनमध्ये सध्या असे अनेक प्रकार चालू आहेत. त्यासाठी चीन सरकारनं लॅबना विशेष अनुदान दिले असून अनेक शास्त्रज्ञ यासाठी काम करत आहेत. पण हे सर्व प्राण्यांपर्यंत होतं तोपर्यंत त्याची फार चर्चा झाली नाही. आता मात्र यापुढचं पाऊल टाकत चीन सरकारनं मानवावरही असे प्रयोग चालू केले आहेत. चीन मधील सैनिकांवर हा जीन एडिटींगचा प्रयोग चालू असल्याची बातमी आहे.  याबाबत अमेरिकेतील गुप्तचर संघटनांनीही सूचना केली असून हा सर्वाधिक धोकादायक प्रयोग असल्याचा अहवाल दिला आहे. चीन आपल्या सैनिकांच्या(Super Soldier) डीएनएशी खेळतेय…त्यांच्यापासून सुपर सैनिक बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा अहवाल देण्यात आला आहे.  चीन जनुक संपादन तंत्रज्ञान वापरत असल्याचा दावा केला जात आहे.

सोशल मिडीयाच्या रिपोर्टनुसार चीन आपल्या सैनिकांवर(Super Soldier) जीन एडिटिंगचा वापर करत आहे. या तंत्राने, डीएनएमध्ये फेरफार करता येतो.  चीनी सैनिकांवर हा प्रयोग करत असून यामुळे युद्धभूमिवर वेगळे परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. जीन एडिटिंग हे तंत्रज्ञान जेवढे उपयोगी आहे. त्यापेक्षा ते जास्त घातक आहे.  या तंत्राच्या साहाय्याने निसर्गाने निर्माण केलेल्या सृष्टीत बदल घडवून आणता येतो.  या तंत्राच्या मदतीने डीएनए बदलता येतो.  त्याचा वापर अनेक प्राण्यांसोबत झाडे आणि वनस्पतींवरही या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. चीनमध्ये सुरु असलेल्या या जीन एडिटिंग मुळे सर्व जगाची मात्र चिंता वाढली आहे.चीन पाठोपाठ अनेक देशांनी एकमेकांवर आरोप केले आहेत की ते त्यांच्या सैनिकांवर जीन एडिटिंग तंत्र वापरत आहेत.अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दावा केला होता की चीन आपल्या सैनिकांचे जीन एडिटिंग करत आहे. ब्रिटननच्या गुप्तचर संघटनेचाही असाच अहवाल आहे. चीन महासत्ता बनण्यासाठी सैनिकांचा (Super Soldier) डीएनए बदलत असल्याचे ब्रिटनच्या गुप्तचर संघटनांचे म्हणणे आहे.  

=======

हे देखील वाचा : पाकिस्तान आणि तालिबान मधील संबंधात वाढतोय तणाव, ‘ही’ आहेत कारणं

======

अमेरिकेच्या मीडिया रिपोर्टनुसार चीन आता इंटेलिजन्स पद्धतीने जीन एडिटिंगवर काम करत आहे.  हे चीन जगाला दहशतीमध्ये ठेवण्यासाठी करत आहे.  चीन सर्वाधिक जनुक संपादन तंत्रज्ञान वापरत असून यामध्ये डीएनएचे काही भाग बदलले जात आहे.  पुढच्या काही वर्षातच चीनच्या या तंत्रज्ञानामुळे काय परिणाम होतात हे स्पष्ट होईल.  डीएनएमधील बदलांमुळे सैनिकांच्या (Super Soldier) शरीरातही बदल होत आहेत. मात्र, त्यांच्या शरीरात असे बदल का होत आहेत, याची कोणतीही माहिती सैनिकांकडे नाही. या तंत्रज्ञानामुळे माणूस यंत्रवत होईल.  हे यंत्रवत मनुष्य सैनिक (Super Soldier) मग चीनच्या सैनिकांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत.   चीनमधील हा प्रयोग अतिशय भयानक आहे.  मनुष्य जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे.  मात्र चीन सरकारला यातील धोके दिसत नाही.  वास्तविक आता चीनमध्ये कोरोनाने एकदा धुमाकूळ घातला आहे. सगळीकडे अराजकतेचे वातावरण आहे. बीजिंगमधील स्मशानभूमी मृतदेहांनी भरुन गेली आहे.  कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती बिकट झाली आहे.  बीजिंगमधील स्मशानभूमीबाहेर गाड्यांची लांबच लांब रांगा लागल्याचे फोटो व्हायरल होत आहे.  काही दिवसांपूर्वीच एक माणूस औषध मागतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  देशात एवढी भयानक परिस्थिती असतांना चीन सरकार मात्र अत्यंत घातक अशा तंत्रज्ञानाकडे लक्ष देत आहे.   

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.