आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेनंतर अंटार्क्टिका हा पृथ्वीवरील पाचवा सर्वात मोठा खंड आहे. अंटार्क्टिका हा जगातील सर्वात थंड, कोरडा आणि सर्वात जास्त वारा असलेला महाद्वीप आहे. सर्वात थंड असलेल्या या अंटार्क्टिका खंडावरील वातावरण हे महत्त्वपूर्ण आहे. कारण जगभरातील हवामान कसे राहील हे या अंटार्क्टिका खंडावरील हवामानावर अवलंबून असते. आता याच अंटार्क्टिकामधून एक धोक्याची घंटा वाजू लागली आहे. अंटार्क्टिकाच्या वरच्या भागात समुद्रावर फिरणाऱ्या थंड हवेच्या वस्तुमानाला अंटार्क्टिक ध्रुवीय भोवरा म्हणतात. याच भोव-याचे विघटन होऊ पहात आहे. याचाच परिणाम म्हणजे थंड हवेच्या अंटार्क्टिकामध्ये भीषण उष्मा वाढण्याची शक्यता आहे. असे झाले तर अंटार्क्टिकावरील बर्फाचा जाड थर कधीही वितळू शकतो. त्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अचानक मोठी वाढ होऊन समुद्रकिनारी असलेली शहऱे जलमग्न होण्याचा धोका आहे. तसेच जगभरात उष्णतेचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. यामुळे गेल्या काही वर्षापासून अंटार्क्टिकामध्ये अभ्यास करणा-या शास्त्रज्ञांनी संपूर्ण जगासाठी अलर्ट जारी केला आहे. (Antarctica)
अंटार्क्टिकामध्ये संशोधन करणा-या शास्त्रज्ञांनी संपूर्ण जगाला धोक्याचा इशारा दिला आहे. अंटार्क्टिकावरील ध्रुवीय भोवरा कमकुवत होत असून तो तुटण्याची शक्यता असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. समुद्रावर फिरणाऱ्या थंड हवेचे वस्तुमान म्हणजेच अंटार्क्टिक ध्रुवीय भोवरा. हा भोवरा कमकुवत झाल्यास सर्वच जगावर उष्णतेचे मोठे वादळ येण्याची शक्यता आहे. संपूर्ण जगाचे हवामान या घटनेमुळे बदलणार आहे. या घटनेनं अंटार्क्टिकामध्येही उष्णता वाढणार आहे. परिणामी जगभरातील समुद्रांची पातळी अचानक वाढण्याचा धोका आहे. अंटार्क्टिकावर थंड हवेच्या झोताने शास्त्रज्ञांमध्ये चिंता वाढवली आहे. अंटार्क्टिक ध्रुवीय भोवरा अभूतपूर्व अस्थिर झाला आहे. हा भोवरा प्रथमच फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही घटना झाल्यास त्याचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे अंटार्क्टिकामध्ये उष्णता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. याव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेतील हवामान असामान्यपणे गरम आणि कोरडे होण्याची शक्यता आहे. असे झाले तर या देशात रहाणेही मुश्किल होऊ शकते असा इशारा शास्त्रज्ञांतर्फे देण्यात आला आहे. (Antarctica)
गेल्या काही वर्षापासून या अंटार्क्टिक ध्रुवीय भोव-याचा अभ्यास शास्त्रज्ञांचा एक गट करीत आहे. त्यांच्या अभ्यासानुसार, अंटार्क्टिक ध्रुवीय भोवरा दरवर्षी स्थिर राहतो. पण, या वर्षभरात हा भोवरा कमालीचा कमकुवत झाल्याचे आढळून आले आहे. या भोव-याला नियंत्रित करणारा वाऱ्याचा वेग लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. त्यामुळे भोव-यातील थंड हवा बाहेर फेकली गेली आहे. तर गरम हवा अंटार्क्टिकामध्ये दाखल झाली आहे. परिणामी, भोव-याच्या फिरण्याच्या गतीवरही त्याचा परिणाम झाला आहे. भोवरा त्याच्या सामान्य स्थितीतून दुसरीकडे वळला आहे. याचा परिणाम म्हणजे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांमध्ये थंड हवामान आले आहे. पण याच्या विरुद्ध वातावरण अन्य देशात झाले आहे. यासंदर्भात शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, वा-याचा वेग अशाच कमी झाल्यास भोव-याची दिशा बदलत रहाणार आहे. या प्रक्रियेला स्ट्रॅटोस्फेरिक तापमान वाढ म्हणतात. यामुळे जगभरातील हवामानात बदल होणार आहे.
====================
हे देखील वाचा : जगातला सर्वात गरीब देश मंगळ ग्रहावर उतरणार होता !
===================
जे प्रदेश थंड प्रदेश म्हणून ओळखले जातात त्यांच्याकडे उष्णता वाढणार आहे. तर ज्या देशात वाळवंट आहे, तिथे बर्फाची चादर पसरली जाणार आहे. अंटार्क्टिक ध्रुवीय भोवरामध्ये जागतिक हवामानावर सर्वप्रकारे प्रभाव टाकण्याची क्षमता आहे. यासंदर्भातील निरिक्षणे जाहीर झाल्यावर जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या हवामान बदलाची सुरुवात झाल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. समुद्रातील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळू लागला आहे. तसेच हांगा टोंगा-हांगा हापाई ज्वालामुखीचा झालेला उद्रेक हे याच हवामान बदलांचे प्रतिक असल्याचे शास्त्रज्ञ मानत आहेत. या घटनेचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. अंटार्क्टिक खंडालाही विक्रमी उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. शिवाय ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेला तीव्र उष्णता आणि दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. असे झाल्यास या भागातील मनुष्य आणि प्राण्यांच्याही जीवनात कमालीची बदल होणार आहे. (Antarctica)
सई बने