अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ (Y) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मिडीयावर सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिने आपल्या सोशल मीडियावर ‘वाय’ चे पोस्टर धरलेला एक फोटो शेअर केला.
त्यापाठोपाठ मराठी सिनेसृष्टीतील स्वप्निल जोशी, नीना कुळकर्णी, प्राजक्ता माळी इत्यादी अनेक कलाकारांनीही ‘वाय’ चे पोस्टर हातात धरून त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर केला आहे! या सर्वच कलाकारांनी ” माझा पाठिंबा आहे ! आपला … ? ” अशी विचारणा चाहत्यांना केल्यामुळे, चाहत्यांमध्येही ‘वाय’ या नावाबद्दल आणि चित्रपटाबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे.
====
हे देखील वाचा: वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’
====
हे सर्व कलाकार ‘ वाय ‘ या चित्रपटांमध्ये आहेत का की यातील काही मोजकेच कलाकार ‘ वाय ‘ या चित्रपटामध्ये आहेत की आणखी यापेक्षा वेगळेच कलाकार चित्रपटामध्ये आहेत हे अजूनही गुलदस्त्यात आहे. शिवाय या पोस्टरमागचा अर्थ आणि नेमका उद्देश काय, याविषयीही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे आता ‘वाय’ विषयीची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणते, ” ‘वाय’ चा अर्थ काय हे चित्रपटातून कळेलच. ‘वाय’ हे केवळ एक अक्षर नसून त्यामागे स्त्रीचा माणूस म्हणून जगण्याचा लढा आहे.”
‘वाय’ चे दिग्दर्शक अजित वाडीकर म्हणतात, ”’ ‘वाय’ या अक्षरामागे मोठा संघर्ष दडलेला आहे. हाच संघर्ष प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही ‘वाय’ मधून करत आहोत आणि यात आम्हाला मराठी सिनेसृष्टीची साथ मिळतेय, ही आमच्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे.”
====
हे देखील वाचा: “सरसेनापती हंबीरराव”चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
====
कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित वास्तवाचा थरार दाखवणारा आणि कल्पनेच्या पलीकडील ‘ती’ च्या लढ्याची गोष्ठ सांगणारा ‘वाय’ २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.