भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाणार आहेत. इस्लामाबादमध्ये 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी ही शिखर परिषद होणार असून नऊ वर्षांत पाकिस्तानला भेट देणारे पहिले जयशंकर हे भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री असतील. यापूर्वी सुषमा स्वराज यांनी 2015 मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. परराष्ट्रमंत्री जयशंकर पाकिस्तानात जाणार ही बातमी आली आणि हे SCO म्हणजे काय याची चौकशी सुरु झाली. पाकिस्तान हा असा देश आहे की ज्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. दहशतवाद्यांची शाळा असलेल्या या पाकिस्तानमध्ये सध्या वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झाकीर नाईकचा सरकारी पाहुणाचार केला जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ हे झाकीर नाईकचे स्वागत करत आहेत. याच पाकिस्तानमध्ये भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर कशाला जात आहेत, हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. यासाठी SCO म्हणजे काय आणि त्याची स्थापना कशासाठी झाली हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. (Shanghai Cooperation Organization)
SCO सदस्य देशांमध्ये भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे. SCO ची स्थापना 2001 मध्ये शांघाय येथे झालेल्या शिखर परिषदेत झाली. SCO ची स्थापना झाली तेव्हा कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे सोव्हिएत युनियनचा भाग होते. भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये या संघटनेत सामील झाले. 2023 मध्ये इराण SCO चा सदस्य झाला. अतिरेकी, फुटीरतावाद आणि अतिरेकी यांच्याशी लढा देणे हा या संघटनेचे प्रमुख लक्ष आहे. यासाठी SCO ने ‘प्रादेशिक अतिरेकी विरोधी फ्रेमवर्क’ तयार केले आहे. (International News)
या अंतर्गत दहशतवादविरोधी कारवाया करण्यासाठी गुप्तचर माहितीची देवाणघेवाण केली जाते. सदस्य देशांमधील संबंध मजबूत करण्यावर जोर दिला जातो. शिवाय राजकीय, आर्थिक, व्यापार, वैज्ञानिक-तांत्रिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाता. आपापसात ऊर्जा, वाहतूक, पर्यटन आणि पर्यावरण संरक्षणामध्ये सहकार्य वाढवणे हे सुद्धा SCO मधील सदस्य देशांचे प्रमुख काम आहे. याशिवाय प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्याला प्रोत्साहन देण्यात येते. यासोबतच युरेशियन प्रदेशात आर्थिक, लष्करी आणि राजकीय सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात येतो. SCO चे मुख्यालय बीजिंग येथे आहे. याच SCO च्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जात आहेत. पाकिस्तान आणि चीन या दोन देशाना SCO कडून अनेक अपेक्षा असतात. मात्र हे दोन देश यातील किती नियमांचे पालन करतात हा प्रश्न आहे. सध्या आशियामध्ये वाढत्या तणावासाठी चीनचे धोरण जबाबदार आहे. (Shanghai Cooperation Organization)
सोबतच पाकिस्तानमधील वाढत्या दहशतवादी कारवाया आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याचे पाकिस्तानचे धोरण या सर्वांवर जयशंकर पाकिस्तानात बसून काय सल्ला देणार याकडे सर्व जगाचे लक्ष आहे. शिवाय पाकिस्तानचा मित्र देश असलेल्या चीनलाही जयशंकर कशाप्रकारे उत्तर देतात याकडे लक्ष आहे. असे असले तरी पाकिस्तानात जाणा-या जयशंकर यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. यासाठी भारत जेवढी काळजी घेत आहे, त्यापेक्षा काळजी पाकिस्तानचे सरकार घेत असल्याची माहिती आहे. कारण दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणा-या या देशानं आता SCO शिखर परिषदेच्या आयोजनासाठी चक्क लष्काराची मदत घेतली आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेदरम्यान पाकिस्तान सरकारने राजधानी इस्लामाबादमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेतला. (International News)
======
हे देखील वाचा : अणुहल्ल्याच्या धमकीसह किम जोंगची युद्धात एन्ट्री !
======
15 आणि 16 ऑक्टोबर रोजी ही शिखर परिषद जिथे होत आहे, ती जागा लष्कराच्या ताब्यात देण्यात आली आहे. याचाच अर्थ पाकिस्तानला स्वतःच्या पोलीस सुरक्षेवरही विश्वास नाही. यावेळी अनेक देशांचे प्रतिनिधी पाकिस्तानमध्ये असणार आहेत. त्यामुळे यात काहीही विपरीत घटना झाली तर पाकिस्तानला जड जाणार आहे. असा परिस्थितीत पोलीस सुरक्षेवर भरवसा ठेवण्याऐवजी इस्लामाबादमधील महत्त्वाच्या सरकारी इमारती आणि संवेदनशील भागांच्या सुरक्षेची जबाबदारी लष्कराच्या ताब्यात दिली आहे. शिखर परिषदेत आठ SCO सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख आणि शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत. त्यात भारताचेही शिष्टमंडळ असणार आहे. एका दशकात भारतीय परराष्ट्रमंत्र्यांची ही पहिलीच पाकिस्तान भेट आहे. त्यांची सुरक्षा पाकिस्तानी लष्कराच्या हातात असणार आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या राजधानीचे लष्करी छावणीत रुपांतर होणार आहे. (Shanghai Cooperation Organization)
सई बने