भगवान शिवाच्या पूजेसाठी अनेक दिवस समर्पित आहेत. दर आठवड्याला येणार सोमवार हा शिवाचा वार म्हणून ओळखला जातो. यादिवशी शंकराच्या पूजेला मोठे महत्त्व आहे. यासोबतच संपूर्ण श्रावण महिना देखील शिवाचा समजला जातो. या पूर्ण महिन्यात भगवान महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. याशिवाय वर्षातून एकदा येणारी महाशिवरात्र देखील शिव पूजेसाठी खास मानली जाते. या सर्व विशेष दिवसांसोबतच अजून खास दिवस शिव पूजेसाठी महत्त्वाचा ठरतो आणि तो म्हणजे ‘प्रदोष’. प्रदोष व्रत भगवान शंकराला समर्पित आहे. प्रदोष व्रत महिन्यातून दोनदा केले जाते. प्रदोष हा प्रत्येक महिन्यातील त्रयोदशी तिथीला येतो. एक शुक्ल पक्षात आणि दुसरा कृष्ण पक्षात. प्रदोष व्रत पाळल्याने जीवनात समृद्धी येते. या दिवशी भगवान शंकराची उपासना केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात असे म्हणतात. प्रदोष व्रत सोमवार आणि शुक्रवारी आल्यास अधिक फलदायी असते. (Pradosh)
दर महिन्याच्या त्रयोदशी तिथीतील संध्याला प्रदोष काल असे म्हणतात. असे मानले जाते की प्रदोषच्या वेळी महादेव कैलास पर्वताच्या रजत भवनात नाचतात आणि देवता त्याच्या गुणांचे गुणगान करतात. आठवड्यातील सर्व सात दिवस पडणार्या प्रदोष व्रताचे नाव आणि महत्त्व वेगळे आहे. त्याचप्रमाणे सोमवारी पडणार्या प्रदोष व्रतास सोम प्रदोष व्रत म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भोलेनाथांचा उपवास आणि पूजा करणाऱ्या लोकांची सर्व पापं नष्ट होतात. (Lord Shiva)
जर प्रदोष सोमवारी आला असेल तर त्याला सोम प्रदोष म्हटले जाते. तर जर प्रदोष मंगळवारी येत असेल तर त्याला मंगळ प्रदोष असे म्हटले जाते. मंगळ प्रदोष व्रत हे ज्या लोकांना आजार आहे आणि आजारापासून मुक्ती हवी असेल तर त्यासाठी आपण मंगळ प्रदोष व्रत करू शकता. जर प्रदोष बुधवारी येत असेल तर त्याला बुध प्रदोष असे म्हटले जाते आपल्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण बुद्ध प्रदोष प्रत सुरुवात करू शकता. (Todays Marathi Headline)

जर प्रदोष गुरुवारी येत असेल तर त्याला गुरु प्रदोष असे म्हटले जाते. आपल्या जीवनातील शत्रू कायमस्वरूपी निघून जावे असे वाटत असेल तर त्यासाठी गुरु प्रदोष व्रत सुरू करावा. जर प्रदोष हा शुक्रवारी येत असेल तर त्याला शुक्र प्रदोष असे म्हटले जाते. जर प्रदोष शनिवारी येत असेल तर त्याला शनी प्रदोष असे म्हटले जाते. शनी प्रदोष व्रत हा ज्या लोकांना मूल होत नसेल अशा लोकांनी जर शनी प्रदोष व्रत केले तर शंकराची कृपादृष्टी होऊन त्यांना मूलप्राप्ती होण्यासाठी हा व्रत केला जातो. आणि जर प्रदोष रविवारी येत असेल तर त्याला रवी प्रदोष असे म्हटले जाते. (Marathi News)
मार्गशीर्ष महिन्यातील पहिले प्रदोष व्रत हे १७ नोव्हेंबर रोजी सोमवारी अर्थात आज आहे. प्रदोष व्रत सोमवारी आल्याने त्याला सोम प्रदोष व्रत असे म्हटले गेले आहे. मार्गशीर्ष महिना हा देवांचा प्रिय महिना मानला जातो. या दिवशी उपवास करणे खूप फायदेशीर ठरते. हा दिवस महादेव आणि देवी पार्वती यांच्या पूजेसाठी समर्पित आहे. आज सोम प्रदोषाचा दिवस आहे. आज सोमवार शिवाचा वार आणि त्यात प्रदोष त्यामुळे आजचा दिवस शिव पूजेसाठी अधिकच खास असणार आहे. (Marathi Trending News)
सूर्यास्तानंतर आणि रात्रीच्या आधीच्या वेळेला प्रदोष काल म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर या वेळेस कातळ वेळ देखील म्हणतात.सोम प्रदोष व्रताच्या दिवशी स्नान इत्यादीं आटोपल्यानंतर हलके लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालावे. यानंतर हळदीकुंकवाचे शिवलिंग बनवा आणि चांदी किंवा तांब्याच्या कळशातून शिवलिंगाला शुद्ध मधाचा प्रवाह द्या. त्यानंतर शुद्ध पाण्याच्या प्रवाहाने अभिषेक करा. (Latest Marathi Headline)
प्रदोष व्रत पूजा
प्रदोष व्रताचे पूजन सूर्यास्ताच्या आधी केले जाते. सोम प्रदोष व्रताच्या दिवशी स्नान इत्यादीं आटोपल्यानंतर हलके लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालावे. यानंतर पूजा घर स्वच्छ करावे आणि रेशमी कपडे चौरंगावर आथरावे. त्यावर हळदीकुंकवाचे शिवलिंग बनवा आणि चांदी किंवा तांब्याच्या कळशातून शिवलिंगाला शुद्ध मधाचा प्रवाह द्या. त्यानंतर शुद्ध पाण्याच्या प्रवाहाने अभिषेक करा. यानंतर ऊॅं सर्वसिद्धी प्रदाये नमः या मंत्राचा जप करा. यानंतर प्रदोष व्रत कथा, शिव चालीसा, महामृत्युंजय मंत्र आणि आरती पठण करा. (Top Marathi Headline)

तसेच, पूजेच्या शेवटी, भोलेनाथांकडून क्षमा प्रार्थना करा. भगवान शिवाला चंदनाचा लेप लावा आणि त्यांना बेलाची पाने, भांग, धतूरा, आक फुले आणि शमीची पाने अर्पण करा. देवी पार्वतीला सोळा श्रृंगार अर्पण करा. हंगामी फळे, मिठाई आणि खीर अर्पण करा. आसनावर बसून रुद्राक्ष माळेचा वापर करून “ॐ नमः शिवाय” हा मंत्र किमान १०८ वेळा उच्चार करा. त्यानंतर सोम प्रदोष व्रताची कथा वाचा किंवा ऐका. त्यानंतर महादेवांची आरती करावी. पूजा झाल्यानंतर सर्वामध्ये हा प्रसाद वाटावा. (Latest Marathi News)
सोम प्रदोषच्या दिवशी अभिषेक, रुद्राभिषेक आणि भोलेनाथ यांच्या शृंगारास विशेष महत्त्व आहे. या दिवशी खर्या मनाने भोलेनाथची उपासना केल्यास इच्छित फळ लाभते. मुलगा किंवा मुलगी यांच्या लग्नातील अडथळे दूर होतात. ज्या लोकांना संतती होणं अशी अपोक्षा वा इच्छा आहे त्यांनी या दिवशी पंचगव्यासह महादेवाचा अभिषेक करावा. दुसरीकडे ज्यांना आर्थिक वृद्धी आणि करियरमध्ये यश हवे आहे, त्यांनी दुधाचा अभिषेक केल्यावर शिवलिंगावर फुलांचा हार अर्पण करावा. असा विश्वास आहे की असे केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात. (Marathi Trending Headline)
सोम प्रदोष व्रताची अशी आख्ययिका
पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मणी राहत होती. तिच्या पतींचं निधन झालं होतं. तिला पोटापाण्यासाठी मुलासमवेत भीक मागण्यासाठी बाहेर जावं लागायचं. ती स्वत: आणि आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची. एक दिवस ब्राह्मणी घरी परतत असतांना तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विव्हळत असल्याचे आढळले. ब्राह्मणीने त्याला तिच्या घरी आणले. मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता. शत्रूच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते आणि राज्याचा ताबा घेतला होता, म्हणून तो इकडे-तिकडे फिरत होता. (Top Stories)
राजकुमार ब्राह्मणांच्या घरात ब्राह्मण-पुत्राबरोबर राहू लागला. मग एक दिवस अंशुमति नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमारला पाहिले आणि ती त्याला मोहित झाली. दुसर्या दिवशी अंशुमति तिच्या आईवडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली. त्यांना देखील राजपुत्र आवडला. काही दिवसांनंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आई-वडिलांना स्वप्नात आज्ञा केली की राजकुमार आणि अंशुमतीचे लग्न करावे. त्यांनीही तेच केले. (Top Trending News)
========
Ekadshi : जाणून घ्या चातुर्मास संपल्यानंतर येणाऱ्या उत्पत्ति एकादशीचे महत्त्व, पूजाविधी आणि कथा
Ekadshi : उत्पन्ना एकादशीच्या दिवशी जीवनात सुखसमृद्धी मिळवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
========
ब्राह्मणी प्रदोष व्रत करत असे. आपल्या मनोभावे उपवासाचा परिणामामुळे आणि गंधर्वराजांच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळवून लावले आणि आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले. राजकुमारने ब्राह्मण-मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनवीले. ज्याप्रमाणे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले, त्याचप्रमाणे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात. म्हणूनच, सोम प्रदोष यांचे उपवास ठेवणार्या सर्व भक्तांनी ही कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे. (Social News)
(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
