आत्तापर्यंत मानवाला अनेक रोगांनी ग्रासलं आहे. मात्र आता या रोगांना निरोप देण्याची वेळ आली आहे, कारण नव्या वर्षात पृथ्वीवर सर्वात बुद्धिमान व्यक्तीचा जन्म होईल. या व्यक्तीला कोणताही रोग स्पर्श करू शकणार नाही, अशी भविष्यवाणी दिली आहे एथोस सलोमेने यांनी. ब्राझीलच्या (Brazil) या तरुणाला जिवंत नॉस्ट्रोडेमस म्हटले जाते. त्यांनी आत्तापर्यंत सांगितलेल्या भविष्यवाणी सत्यात उतरल्या आहेत. त्यात अमेरिकेच्या ट्विन्स टॉवरवरील हल्ला, कोरोना महामारी, ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितिय हिचा मृत्यू अशा काही ठळक घटनांचा समावेश आहे. य़ा अचूक भविष्यवाणीमुळे एथोस सलोमेनेला नॉस्ट्रोडेमस या जगप्रसिद्ध ज्योतिषवक्त्याच्या नावानं ओळखण्यात येतं. (Athos Salomene)
नवीन वर्ष सुरु होण्याआधी अनेक गोष्टींबाबत उत्सुकता असते, त्यातील एक गोष्ट म्हणजे आगामी वर्षाबाबत सांगितलेली भविष्यवाणी. नॉस्ट्रेडेमस, बाबा वेंगा यांच्यासारख्या भविष्यवेत्त्यांनी आपल्या भविष्यवाणींची नोंद करुन ठेवली आहे. त्याचा अर्थ काढून या भविष्यवाणी सांगितल्या जातात. मात्र ब्राझीलमधील एथोस सलोमेने यांना जिवंत नॉस्ट्रोडेमस म्हणून ओळखले जाते. एथोस यांनी आत्तापर्यंत केलेल्या अनेक भविष्यवाणी ख-या ठरल्या आहेत. कोरोनाचे संकट आणि रशिया युक्रेन युद्धाची भविष्यवाणीही एथोस सलोमेने यांनी केली होती. त्याच एथोस यांनी 2025 साठी अनेक आश्चर्यकारक अशी भविष्यवाणी केली आहे. (International News)
त्यांच्या मते 2025 हे वर्ष तंत्रज्ञानाचे वर्ष राहणार आहे. मानवी इतिहासातील सर्वात मोठी क्रांती याच 2025 पासून सुरु होणार आहे. माणूस या वर्षात क्लोनिंगचा आधार घेणार आहे. जगातील अनेक मान्यवर कंपन्यांमध्ये अशा माणसाची निर्मिती करण्यात येत आहे, की तो परिपूर्ण आहे. त्याला कुठल्याही रोगाची बाधा होणार नाही. हा माणूस प्रचंड हुशार असेल, त्याला प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान असेल. मुख्य म्हणजे, त्याच्यामध्ये कुठल्याही रोगांना लढा देण्याची क्षमता असेल, असा सूपरमनसारखा व्यक्ती क्लोनिंगच्या सहाय्यानं तयार होत असल्याची भविष्यवाणी एथोस सलोमेने यांनी केली आहे. 2025 च्या सुरुवातीला हा परफेक्ट मनुष्य सर्वासमोर येणार आहे. (Athos Salomene)
एथोस सलोमेने यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबतही भविष्यवाणी सांगितली आहे. एथोस सलोमेने यांच्या मते एआय तंत्रज्ञान मर्यादेपर्यंत पोहोचणार आहे. हे तंत्रज्ञान देशातील तळागाळापर्यंत पोहोचणार आहे. यामुळे सायबर सुरक्षा आणि वाहतूक क्षेत्रात अधिक लाभ मिळणार आहे. एथोसची 2025 बाबत सर्वात महत्त्वाची भविष्यवाणी म्हणजे, परग्रहींबाबत आहे. एथोसच्या मतानुसार 2025 मध्ये मानव आणि परग्रही यांच्यामधला खो – खो चा सामना संपणार आहे. परग्रहींचे वास्तव्य पृथ्वीवर आहे. मात्र काही देश त्यांचे अस्तित्व नाकारत आहेत. हा विरोध नव्या वर्षात कमी होणार असून, परग्रही मानवासमोर उभे राहणार आहेत. मानवालाही अंतराळ मोहिमांमध्ये मोठे यश मिळणार आहे. मंगळावर जाण्याचे मानवाचे स्वप्न साकर होणार असून मंगळावरील सुक्ष्मजीवांपर्यंत मानवाला पोहचता येणार असल्याचे एथोस सलोमेने यांनी सांगितले आहे. (International News)
यासोबत एथोस यांनी पृथ्वीवर येणा-या संकटाबाबतही भविष्य सांगितले आहे. एथोसच्या मते 2025 मध्ये पृथ्वीवर आत्तापर्यंतचे सर्वात मोठे उर्जा संकट निर्माण होणार आहे. हवामानात मोठे बदल होणार असून पाण्याचेही संकट जगासमोर उभे रहाणार आहे. हवामान बदलाचा मोठा फटका मानवी समाजव्यवस्थेला बसणार आहे. विशेषतः विकसनशील देशांवर या सर्व घटनांचा अधिक परिणाम होणार असल्याचे भाकीत एथोस सलोमेने यांनी केले आहे. आरोग्य क्षेत्रात क्रांतीकारक शोध लागणार असल्याचेही एथोस सलोमेने यांनी भाकीत केले आहे. त्यांचा मते असाध्य अशा रोगंवार लस येणार आहे. नुकतीच रशियानं कॅन्सरवर लस शोधल्याचा दावा केला आहे. तसेच 2025 पासूनच कॅम्प लावून या लसीचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे रशियाचे अध्यक्ष ब्लादेमिर पुतिन यांनी सांगितले आहे. (Athos Salomene)
=======
हे देखील वाचा : America : ट्रम्पना हवा आहे बर्फाचा देश !
Salman Rushdie : पुन्हा ‘सॅटनिक व्हर्सेस’ चे वादळ !
=======
2025 मध्ये ज्या घटनांनी खळबळ निर्माण होईल, ती एक घटना लष्कराच्या छावण्यांबाबत असणार आहे. 2025 या वर्षात जगातील सामर्थ्यशाली देश गुप्त लष्करी मोहीम सुरु करणार आहेत. यातून त्या देशातील नागरिकांमध्ये एकजूट तयार होईल. या सर्व विरोधात जनता रस्त्यावर उतरणार आहे. त्यामुळे काही देशांमध्ये सत्तांतरे होण्याचे भाकीत एथोस सलोमेने यांनी व्यक्त केले आहेत. आता नवं वर्ष सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवकाश बाकी आहे. त्यामुळे एथोसचे भविष्य किती खरे होईल, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. (International News)
सई बने