सध्या सगळीकडे चांगलीच थंडी पडायला सुरुवात झाली आहे. थंडीच्या दिवसात आपल्याला आजारांपासून दूर राहायचे असेल तर नक्कीच आपले शरीर उबदार आणि उष्ण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी सतत गॅस जवळ काम करणे, शेकोटी पेटवणे, उन्हात बसणे हे शक्य नाही. मग आपण आपले शरीर थंड कसे ठेऊ शकतो? तर आपल्या शरीराला उष्णता देणारे, शरीरात उब निर्माण करणारे पदार्थ खाऊन.
आपलीकडे ऋतूनुसार वातावरणात बदल होतात. त्यामुळे अशा बदलणाऱ्या ऋतूमुळे होणाऱ्या आजारांपासून शरीराला वाचवायचे असेल त्याची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर आपल्याला आपल्या आहारात बदल करणे आवश्यक आहे. ऋतूनुसार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे पदार्थ नेहमीच खाल्ले पाहिजे. आता हिवाळ्यामध्ये शरीराला उबेची गरज असते. म्हणून या दिवसांमध्ये उष्ण गुणधर्म असलेले पदार्थ खाण्याकडे आपला कल पाहिजे. जेणेकरून ते पदार्थ आपले शरीर आतून उबदार ठेवतील.
आता शरीराला उब देणारे, शरीरात उष्णता निर्माण करणारे अनेक गोष्टी आहेत. त्यातलाच एक उत्तम अतिशय पोषक आणि लाभदायक पदार्थ म्हणजे ‘उडिदाची डाळ’. ज्या घरांमध्ये वयस्कर लोकं असतात त्या घरांमध्ये हिवाळ्यात अनेकदा उडीद डाळ केली जाते. ही डाळ चवीला जेवढी रुचकर आहे, तेवढीच आरोग्यच्या दृष्टीने श्रेयस्कर आहे. हिवाळ्यात उडद डाळ आवडीने खाल्ली जाते. हे चवीसाठी चांगले नाही तर आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे.
उडदाची डाळ पचायला जड असल्याने शक्यतो हिवाळ्यामध्ये या डाळीचा समावेश आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात केला जातो. उडीद डाळीचे सेवन केल्याने तुमचे पचन सुधारण्यास मदत होते कारण त्यात फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. उडदाची डाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर आहे. तसेच, सांधेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते. चला जाणून घेऊया हिवाळ्यात उडीद डाळ खाण्याचे फायदे.
पचन सुधारणे
उडीद डाळ खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही डाळ आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हे पचनसंस्थेचे कार्य करण्यास अतिशय चांगली मदत करते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते.

प्रोटीनचा स्रोत
उडीद डाळीमध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने असतात. उडदाच्या डाळीमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. या डाळीमध्ये अंदाजे २५ ग्रॅम प्रथिने आढळतात. जे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा चांगला स्रोत आहे.
हिवाळ्यात खाणे फायदेशीर
उडदाच्या डाळीचा प्रभाव गरम असतो. त्यामुळे ही डाळ हिवाळ्यात खाण्याची परंपरा आहे. उडदाची डाळ महिलांचे हार्मोनल असंतुलन सुधारते आणि प्रजनन अवयवांना बळकट करते.
इरेक्टाइल डिसफंक्शनमध्ये आराम
उडदाची डाळ पुरुषांसाठी खाणे फायदेशीर असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन, शुक्राणूंची कमी संख्या आणि गतिशीलता यासारख्या समस्या दूर होतात.
ऊर्जा वाढवा
काळ्या उडीद डाळीमध्ये भरपूर लोह असते. त्यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते. लोह हे तुमच्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक तत्व आहे. लोह हे आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करते. या पेशी सर्व अवयवांना ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी मदत करतात. शरीरातील सर्व अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो तेव्हा शरीरातील उर्जेची पातळी सुधारते.
हाडे मजबुतीसाठी
काळ्या उडीद डाळीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम इत्यादी आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. हे सर्व पोषक आपल्या हाडांना मजबूत करतात.
मधुमेहामध्ये फायदेशीर
उडीद डाळ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते इंसुलिन सोडण्याचे नियमन करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.
त्वचा निरोगी बनवा
काळी उडीद डाळीमध्ये त्वचेसाठी आवश्यक सर्वच घटक मुबलक प्रमाणात आहे. या डाळीचे नियमित योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्वचेच्या सर्व तक्रारी दूर होतात.
हृदय निरोगी ठेवा
काळी उडीद डाळ हृदयासाठी उत्तम आहे. या डाळीमध्ये फायबर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असते, त्यामुळे ते तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला निरोगी ठेवण्यास मदत करून कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राखण्यास मदत करतात.
तणाव कमी करण्यास मदत
उडदाची डाळ ही बलवर्धक, शक्तीवर्धक आहे. जे कष्टकरी लोक असतात, जे शारीरिक श्रम करतात. त्यांनी आपल्या आहारात उडीद डाळीचा समावेश आवर्जून करावा. आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेला ताण हलका करण्यासाठी उडदाची डाळ उपयोगी आहे. ज्यामुळे उडदाच्या डाळीच्या नियमित सेवनाने आपले हृदय अतिशय उत्तम राहते.
(टीप : ही माहिती फक्त वाचनासाठी असून, कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
