आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती, झाडं असतात. मात्र आपण काही मोजक्या वनस्पती सोडल्या तर इतर झाडांच्या गुणधर्माबद्दल अनभिज्ञ असतो. तुळशी, कोरफड सोडल्या तर बऱ्याच लोकांना दुसऱ्या औषधी वनस्पतीच माहिती नसतील. असेच अतिशय औषधी आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले झाड म्हणजे, ‘औदुंबर’ अर्थात ‘उंबर’. औदुंबराचे झाड आपल्याला अगदी सहज पाहायला मिळते. भगवान दत्तांचा वास असलेल्या या झाडाला हिंदू धर्मामध्ये मोठे महत्त्व आहे. हे झाड जेवढे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, तेवढेच ते आरोग्याच्यादृष्टीने देखील फायदेशीर आहे. या झाडाचे आपल्या आरोग्यास अनेक लाभ होतात. मात्र तुम्हाला माहिती आहे औदुंबराच्या झाडासोबतच औदुंबराचे जल देखील अतिशय लाभदायक आहे. (Audumber)
औदुंबर जल वाचून अनेकांना आश्चर्य वाटले असेल. औदुंबर जलाबद्दल खूपच कमी लोकांना कमी माहिती आहे. इतर झाडांप्रमाणे औदुंबराच्या झाडाची मुळे देखील जमिनीखाली पाणी शोषून घेण्याचे काम करतात. मात्र औदुंबराच्या झाडाच्या मुळांनी शोषलेले पाणी हेच औदुंबराचे जल असते. याच पाण्याचे आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक उपयोग आहेत. औदुंबर जल हे आरोग्यच्या अनेक समस्यांवर रामबाण उपचार म्हणून वापरले जाते. आयुर्वेदामध्ये या जलाचे मोठे लाभ सांगण्यात आले आहेत. आज आपण याच जलाबद्दल आणि त्याच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया. (Health Care)
खरंतर उंबराच्या झाडालाच औदुंबर असेही म्हणतात. उंबराच्या झाडाचे उंबर आणि काकोडुंबर असे दोन प्रकार आहेत. तर उंबराचे झाड हे नदी काठावर किंवा जास्त पाणी असणाऱ्या ठिकाणी आढळते. उंबराच्या अर्थात औदुंबराच्या पाण्याबरोबरच झाडाची साल, फळ आणि काही प्रमाणात पानांचे देखील औषधी उपयोग आहेत. मात्र औदुंबराचे जल हे अनेक आजारांवर गुणकारी ठरते. औदुंबराचे जल नैसर्गिकरित्या काढले जाऊ शकते. यामध्ये झाडाला कोणत्याही प्रकारे हानी न पोहचवता झाडाच्या मुळांपासून पाणी काढले जाते. त्यासाठी योग्य अभ्यासाची गरज असते. या झाडाची मुळे हे अगदी खोलवर असल्यामुळे मुळांमधून पाणी काढणे अवघड असते. मात्र बरेच जण योग्य पद्धत वापरुन खोडाजवळून हे औदुंबर जल काढतात. (Todays Marathi Headline)

दाह कमी करते
औदुंबराचे जल हे नैसर्गिक थंडावा देणारे जल म्हणून वापरले जाते. शरीरातील उष्णता किंवा दाह कमी करण्यासाठी ते अत्यंत गुणकारी आहे.
डोळ्यांसाठी गुणकारी
डोळ्यांसाठी देखील हे औदुंबराचे जल उपयुक्त ठरू शकते. रात्री झोपताना डोळ्यांमध्ये दोन दोन थेंब टाकल्यास कोरडेपणा कमी होऊन डोळ्यांना शीतलता मिळते. (Top Marathi News)
स्त्री रोगावर फायदेशीर
औदुंबराचे जल हे विशेष करून स्त्रीरोगावर उपयोगी ठरू शकते. स्त्रीबीज तयार होत नसल्यास हे पाणी पिल्याने स्त्रीबीज तयार होण्यास मदत होते. तसेच स्त्रियांच्या मासिक पाळीच्या दिवसांतील काही तक्रारी देखील या पाण्याच्या सेवनाने कमी होतात. ज्या गरोदर महिलांना ७,८,९ महिना सुरु आहे, त्या महिलांनी गर्भाचे पोषण करण्याकरिता आणि गर्भातले पाणी वाढविण्याकरिता अत्यंत उपयुक्त. या जलाचे सेवन करणे लाभदायक ठरते. (Top Trending Headline)
कान, नाकातील रक्तस्रावासाठी लाभदायक
कान फुटला असताना कानामध्ये हे औदुंबर जल टाकल्यास नक्कीच गुणकारी ठरु शकते. तर कडक उन्हामुळे नाकातून रक्तस्त्राव होत असल्यासही हे औदुंबर जल नाकामध्ये टाकल्यास आराम मिळतो. (Top Stories)
========
Beauty Treatment : Botox ट्रीटमेंट म्हणजे नक्की काय? काय आहे याचे फायदे
========
इतर फायदे
डेंग्यूमध्ये औदुंबर जलाच्या सेवनाने फायदा होऊ शकतो. मूत्रपिंडासंबंधित आणि पोटाच्या अनेक विकारांवर, पचनक्रियाही नियंत्रित ठेवण्यासाठी, निरोगी हृदयासाठी तसेच मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणामांसाठी हे जल उपयोगी ठरते. तर हे औदुंबराचे जल अर्धशिशीवर देखील अतिशय उपयुक्त ठरू शकते. एकूणच हे औदुंबर जल हे गुणधर्माने शित असल्यामुळे याचे सेवन शरीरातील थंडावा टिकवून ठेवण्यास मदत करते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
