उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने नुकत्याच लखनौ मध्ये एका टोळीतील चार सदस्यांना ४.१२ किलो एंबरग्रीससह पकडले. एंबरग्रीस खरंतर व्हेल माशाची उल्टी (Whale Vomit) असते आणि ती बाजारात करोडो रुपयांना विक्री केली जाते. देशभरात याची अनधिकृतपणे स्मगलिंग केली जाते. तर आता पोलिसांनी जी एंबरग्रीस ताब्यात घेतली आहे त्याची किंमत तब्बल १० कोटी रुपये आहे. तुम्ही किंमत ऐकून हैराण व्हाल कारण त्याच्या उल्टीमध्ये असे काय आहे जी ऐवढी महाग आहे? खरं सांगायचे झाल्यास आपल्या आयुष्यात व्हेल उल्टीचा कुठे ना कुठेतरी वापर केला जातो. त्यापासून काही प्रोडक्ट्स तयार केले जातात. ऐकून हे थोडे विचित्र वाटेल पण अखेर व्हेल माशाची उल्टी ठेवणे गुन्हा का आहे? यासह अन्य काही गोष्टींबद्दल अधिक जाणून घेऊयात.
कोणत्या कायद्याअंतर्गत ठेवणे अपराध आहे?
खरंतर एंबरग्रीस सुद्धा वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अक्ट १९७२ अंतर्गत येते. कायदा असे सांगतो की,, भारतात ते ठेवणे किंवा विक्री करणे बेकायदेशीर आहे. याची तस्करी करणे अपराध आहे. याचा वापर खरंतर परफ्यूम आणि काही प्रकारच्या गोष्टी तयार करण्यासाठी केला जातो. खासकरुन समुद्र तटावर ती मिळते. विदेशात त्याची विक्री करुन लोक करोडपती झाले आहेत असे खुप किस्से आहेत.
व्हेलच्या आसपास लोक का फिरतात?
जेथे व्हेल मासा दिसतो तेथे असे काही लोक दिसतात जी व्हेल माशाची उल्टी मिळवण्यासाठी फिरत असतात. कारण ती मिळाल्यानंतर त्याची बाजारात विक्री केल्यास बक्कळ कमाई करता येते. खरंतर समुद्रावर तटावर येणारे व्हेल मासे असा कचरा काढतात, परंतु बहुतांशवेळा समुद्राच्या पाण्यात अधिक कचरा काढून टाकतात, जो पाण्यासोबत वाहून जातो किंवा त्यात मिसळतो.
कोकणाच्या समुद्र किनाऱ्यावर ही आता येऊ लागलेत व्हेल
भारतातील कोकण किनारपट्टीवर ही गेल्या काही काळापासून व्हेल मासे येऊ लागले आहेत. त्यामुळे तेथे सुद्धा आसपास फिरणारे लोक व्हेल माशाच्या उल्टीच्या शोधात असतात. ते समुद्र किनाऱ्यापासून किंवा समुद्रतटापासून खाली खोल उडी मारत व्हेलची उल्टी शोधण्याचा प्रयत्न करतात. असे मानले जाते की, व्हेलची उल्टी (Whale Vomit) ही काही काळानंतर एका दगडाच्या रुपात निर्माण होते. तसेच जी जेवढी अधिक जुनी होते तेवढीच त्याची किंमत ही अधिक वाढली जाते.
हे देखील वाचा- कुत्र्यांच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रू उभे राहतात?
अखेर काळा दगडाचे रुप म्हणजे काय?
काही वैज्ञानिक त्याला व्हेलची उल्टी असे म्हणतात. व्हेल माशांच्या आतडांमधून निघाणारा कचरा असतो जो त्यांना पचवता येत नाही. काही वेळेस हा पदार्थ रेक्टमच्या माध्यमातून बाहेर योते. मात्र कधी कधी पदार्थ मोठा झाल्यास व्हेल मासे ते तोंडाच्या द्वारे बाहेर काढतात. वैज्ञानिक भाषेत त्याला एंबरग्रीस असे म्हटले जाते.
सुरुवातीला जेव्हा व्हेल मासा हे एंबरग्रीस बाहेर टाकतो तेव्हा त्याचा वास हा कचऱ्यासारखाच असतो. मात्र काही वर्षानंतर त्याचा वास हा हलका सुगंधी होते. त्याचा अत्तर बनवण्यासाठी सुद्धा वापर केला जात असल्याने ते अत्यंत महाग असते. याच कारणामुळे अत्तरचा सुगंध हा दीर्घकाळ टिकून राहतो. तर वैज्ञानिक याला तरंगणारे सोने असे सुद्धा म्हणतात. याचे वजन १५ ग्रॅम ते ५० किलो पर्यंत असू शकते.