व्यक्तीला विविध आजार होतात. मात्र अशातच एक अनोखा आजार आहे ज्यामध्ये व्यक्तीचा चेहरा हा अस्वलासारखा दिसतो. यालाच वेयरवुल्फ सिंड्रोम (Werewolf Syndrome) असे म्हटले जाते. हा एक विचित्र आजार असून यामध्ये शरिरावर अस्वलासारखे केस येण्यास सुरुवात होते. नुकत्याच एमपी मध्ये एका मुलामध्ये या आजाराची लक्षणं दिसून आली आहेत. या आजाराला हायपरट्राइकोसिस सुद्धा म्हटले जाते. ही अत्यंत दुर्मिळ आणि असामान्य आजार आहे जो लिंग पाहून होत नाही. पुरुष किंवा महिलांना सुद्धा हा आजार होऊ शकतो.
वेयरवोल्फ सिंड्रोम काय आहे?
नुकत्याच एका व्यक्तीमध्ये या आजाराची लक्षण आढळून आली. त्यामध्ये त्याचा चेहरा अस्वलासारखा दिसू लागला होता कारण त्याच्या हातावर आणि चेहऱ्यावर खुप केस आली होती. वेयरवोल्फ सिंड्रोम हा जन्माच्या आधी सुद्धा होऊ शकतो आणि काळानुसार विकसित सुद्धा होऊ शकतो. तर या आजारबद्दल अधिक सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात. त्याची लक्षण आणि कारणं सुद्धा पाहूयात नक्की काय आहेत.
कारणं
या आजारामागे काही कारणं असल्याचे सांगितले जाते. जसे कुपोषण, योग्य पालनपोषण न होणे, औषधांचे रिअॅक्शन मात्र जेनेटिक हे यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

जेनेटिक असू शकतो आजार?
डेली स्टार युकेच्या रिपोर्ट्नुसार, काही लोकांमध्ये दुर्लभ सिंड्रोम का होतो याबद्दल अधिक स्पष्ट कारणं समोर आलेली नाहीत. मात्र काही तज्ञांच्या मते हा आजार अनुवांशिक संबंधित काहीच घेणे-देणे नाही. पण जर तुमच्या परिवारातील एखाद्याला हा आजार असेल तर तो तुम्हाला सुद्धा होऊ शकते. यामध्ये आपण जसे पाहिले आपला चेहरा अस्वलासारखा दिसण्यास सुरुवात होते.
तज्ञांचे असे ही मानणे आहे की, एक विशेष जीनच्या कारणास्तव केस अधिक वेगाने वाढू लागतात आणि चेहरा विचित्र दिसू लागतो. त्यानंतर तो व्यक्ती वेयरवोल्फ प्रमाणे दिसून लागते. वर्ष २०११ मध्ये अमेरिका आणि चीनच्या तज्ञांनी या आजारावर एक अभ्यास केला होता. त्यामध्ये असे आढळून आले होते की, या आजाराचा अनुवंशिकतेसह काही संबंध नाही. (Werewolf Syndrome)
किती प्रकारचा असतो हा आजार
जन्मजात हायपरट्रिचोसिया याला लैगुनिनोसा असे सुद्धा म्हटले जाते. यामध्ये जन्मलेल्या बाळाच्या शरिरावर काही महिन्यानंतर केस दिसून येतात. त्यानंतर शरिरावरील विविध ठिकाणचे केस अधिकाधिक वाढण्यास सुरुवात होते. मात्र एका मर्यादेनंतर त्याची वाढ होणे थांबते.
जन्मजात हायपरट्रिचोसिस टर्मिनलिस- या आजारात जन्म घेणाऱ्या मुलाच्या चेहऱ्यावर काही विचित्र प्रकारे केस येतात. जसे जसे ते मुल वाढते त्यांच्या केसांची लांबी अधिक वाढू लागते. नंतर हळूहळू संपूर्ण चेहरा हा केसांनी झाकला जातो.
लैगुनो- हे नवजात मुलाला होते आणि सामान्य जन्मानंतरच्या काही दिवसात ती संपुष्टात येते.
हे देखील वाचा- जन्मावेळी मुलं का रडते?
उपचार
आतापर्यंत यावर कोणताही उपचार नाही. २० लाखांपैकी काही लोकांना हा आजार होते. मात्र तरीसुद्धा यावर प्राथमिक उपचार म्हणून लेजर थेरपी, शेविंग, वॅक्सिंग आणि प्लकिंगचा वापर करुन चेहऱ्यावरील केस साफ केले जाऊ शकतात. तरीही सुद्धा हा आजार बरा होत नाही आणि केस सातत्याने येत राहतातच.